टिपुर चांदणे

Submitted by अनन्त्_यात्री on 14 July, 2021 - 00:21

अज्ञाताच्या
ऐलतिरावर
ज्ञाताचे
ओझे खांद्यावर
वाहुनी थकण्या
आधी थोडे
पैलतिरा
घालीन उखाणे

नश्वरतेचे
लेवुनी लेणे
चिरंतनाचे
गाईन गाणे
शून्यत्वाच्या
नभातुनी मग
झरेल अविरत
कैवल्याचे
टिपुर चांदणे

Group content visibility: 
Use group defaults

अतिशय सुंदर. नेहमीप्रमाणेच.
मात्र " कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर" हे आठवलंच.