चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची शंभरी - ०१

Submitted by Theurbannomad on 10 July, 2021 - 04:57

चायनीज कम्युनिस्ट पार्टीला ( CCP ) १ जुलैला १०० वर्ष पूर्ण झाली. चीनमध्ये याचं सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं. ट्विटरवर या सेलिब्रेशन विरोधात #100YearsOfDarkness हा हॅशटॅग जोरात चालला. चायनीज कम्युनिस्ट पार्टी विरुद्ध अनेक लोकांनी या हॅशटॅग अंतर्गत मोहीम चालवून या पार्टीची काळी बाजू जगासमोर मांडलीय. चायनीज कम्युनिस्ट पार्टीने या १०० वर्षात जगाला काय दिलं याचा आढावा या लेखमालेत घेऊया.

१९८९ मध्ये या पार्टीच्या अत्याचाराविरुद्ध लोकशाही आणि मानवाधिकार यासाठी तियानानमेन स्क्वेअरवर चीनमधील जवळपास ४०० शहरातील लाखोंच्या वर विद्यार्थी आंदोलन करण्यासाठी जमले. यांचे आंदोलन पार्टीला घातक असल्याने पार्टीने निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांची निर्घृणपणे हत्या करून हे आंदोलन चिरडले.

चीनमध्ये माणसाच्या अवयव प्रत्यारोपणाचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार चालतो. अवयव प्रत्यारोपणाची चीन ही मोठी बाजारपेठ आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात अवयव चीनकडे कसे काय उपलब्ध होतात? चीनमध्ये अनेक राजकीय कैदी आहेत. पण त्या कैद्यांचा पुढे काय होतं हे त्यांच्या नातेवाईकांना माहीतही नसतं. अनेक उयघूर मुस्लिम्स, ख्रिश्चन, तिबेटियन याना त्यांच्या अवयवांसाठी ठार मारले जाते. त्यांचे अवयव काढून घेतले जातात. केवळ चिनी नसलेल्या लोकांवरच असे अत्याचार होतात असं नाही तर चिनी फालुन गॉंग या आध्यात्मिक प्रथेमध्ये असलेल्या लोकांना अचानक गायब करण्यात येतं. पुढे त्यांचा शोध लागत नाही. या लोकांचे अवयव काढून घेऊन त्यांना मारून टाकण्यात येतं. चीनमध्ये दरवर्षी १ लाखाच्यावर इंद्रिय प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची नोंद आहे. शिवाय इंटरनॅशन मार्केट आहेच.

सीरिया आणि उत्तर कोरियाच्या बरोबरीने मानवी तस्करीमध्ये चीन अव्वल क्रमांकावर आहे. चीनमध्ये १२ वर्षाच्या आतील मुलांना उत्तर कोरिया, म्यानमार, व्हिएतनाम, मंगोलिया, पूर्व चीन इत्यादी अनेक देशांतून तस्करी करून आणले जाते आणि त्यांना जबरदस्तीने लैंगिक व्यापारात ढकलले जाते. यासाठी चीनमध्ये कोणताही कायदा केलेला नाही. १४ वर्षावरील मुलांना कायदेशीरपणे लैंगिक व्यापारात घेतले जाते. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने चीनला या कारणास्तव टियर-३ चा दर्जा दिलेला आहे. चीनमध्ये लैंगिक व्यापाराला आळा घालण्यासाठी कडक कायदे नाहीत.

समुद्रामध्ये अमर्याद मासेमारी करून तेथील जैवविविधतेला मोठा धोका चीन पोचवतंय. जगातील सर्वात मोठा, १७००० जहाजांचा ताफा समुद्रात उभारून बेकायदेशीरपणे अनियंत्रित मासेमारी करून सागरी संपत्तीचा ऱ्हास चीन करतंय. जगातील सगळ्यात मोठं आणि वाढतं अवैध व्यापाराचं वन्यजीव प्राणीमार्केट चीन चालवतं.

चीन उयघूर मुस्लिमांवर करत असलेले अत्याचार सर्वश्रुत आहेत. तरीही त्यावर एक नजर टाकूया.चीनमध्ये मुस्लिम धर्मियांना कोणतेही धार्मिक स्वातंत्र्य नाही. त्यांना त्यांच्या धर्माची ओळख असलेली टोपी घालण्यास सुद्धा मज्जाव आहे. लाखो लोकांना बंदी बनवून त्यांना सुधारणा छावणीत टाकण्यात येते. तिथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात. स्त्रियांवर सर्रास बलात्कार करण्यात येतात. त्यांना गर्भपात करण्यास भाग पाडले जाते. अनेकांना गुलाम म्हणून राबविण्यात येते. त्यांना आपले अवयव दान करण्यास जबरदस्ती केली जाते.
चीनची महासत्ता बनण्याची अभिलाषा आपण जाणतोच. त्यासाठी कोणत्याही थराला चीन जात आहे. हाँगकाँग, मकाऊ, मांचुरिया, पूर्व तुर्कस्तान, मंगोलिया, शॅक्सगम, अकसाई चीन, द पामीर व्हॅली, तिबेट या सर्व ठिकाणावर चीनने अतिक्रमण केले आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेशावर चीन आपला दावा केव्हापासून ठोकतोय. तैवान आणि साऊथ चायना सी वर सुद्धा चीन दावा करतोच आहे. तैवानला सतत हल्ल्याच्या धमक्या देऊन चीनने जेरीस आणलंय.
अनेक देशांना मोठ्या प्रमाणात कर्ज देऊन त्यांना आपले मांडलिक बनवलंय. बेल्ट अँड रोड प्रकल्पाच्या नावाखाली अनेक देशांमध्ये अधिकृत घुसखोरी करून त्यांची नैसर्गिक साधनसंपत्ती चीन लुटतंय. देशाचा विकास होईल या प्रलोभनाखाली अनेक देश चीनच्या अधीन झाले आहेत.

आपल्या शेजारील देशात वॉटर डिप्लोमसी करून कृत्रिमरीत्या ओला किंवा सुका दुष्काळ करण्यात चीन वाकबगार आहे. अंहुई, युनान आणि तिबेट मधील नैसर्गिक स्त्रोतांचे मोठ्या प्रमाणात शोषण करून तेथील पर्यावरणाला चीन खूप मोठा धोका पोचवतोय.अनेक देशांची महत्त्वाची आणि गुप्त माहिती नवीन तंत्रज्ञानाने हॅक करून चीनने आजवर त्या देशांना खूप मोठा धोका निर्माण केला आहे.

आणि....

चीनमुळे आलेलं महामारीचं संकट तर या सगळ्यावरचा कळस आहे.
१०० वर्षात चिनी कम्युनिस्ट पार्टीने केवळ हुकूमशाहीच केली आहे. मानवी हक्क, स्वातंत्र्य, स्वायतत्ता हे शब्दच चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या शब्ब्दकोशात नाहीयेत. अनेक गोष्टी इथे नमूद केल्या नाहीयेत. थोडक्यात सांगायचे तर चीन हा संपूर्ण जगाला धोका आहे.

यापुढे चीनच्या अनिर्बंध सत्तलालसेमुळे चीनी लोकांनी आणि बाहेरच्या लोकांनी जे काही भोगलं, ते आपण पुढच्या लेखांमधून बघणार आहे...तोवर अलविदा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा गुलमोहर ऐवजी राजकारण भारतात मध्ये हलवा .
आपल्या इथे चीन केलेल्या दुष्कृत्या कडे डोळेझाक करणारे भरपूर आहेत .
ते लगेच चीन चे वकीपपत्र घेऊन तुम्हाला सळो की पळो करतील .

आपल्या इथे चीन केलेल्या दुष्कृत्या कडे डोळेझाक करणारे भरपूर आहेत .
ते लगेच चीन चे वकीपपत्र घेऊन तुम्हाला सळो की पळो करतील .>>>>+१२३३४५

मागे जॉर्ज फर्नांडीस म्हणालेच होते की चीन आपला छुपा शत्रु आहे. त्यावर केवढा गोंधळ माजला होता.

<<<<<<चीनमध्ये माणसाच्या अवयव प्रत्यारोपणाचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार चालतो. अवयव प्रत्यारोपणाची चीन ही मोठी बाजारपेठ आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात अवयव चीनकडे कसे काय उपलब्ध होतात? चीनमध्ये अनेक राजकीय कैदी आहेत. पण त्या कैद्यांचा पुढे काय होतं हे त्यांच्या नातेवाईकांना माहीतही नसतं. अनेक उयघूर मुस्लिम्स, ख्रिश्चन, तिबेटियन याना त्यांच्या अवयवांसाठी ठार मारले जाते. त्यांचे अवयव काढून घेतले जातात. केवळ चिनी नसलेल्या लोकांवरच असे अत्याचार होतात असं नाही तर चिनी फालुन गॉंग या आध्यात्मिक प्रथेमध्ये असलेल्या लोकांना अचानक गायब करण्यात येतं. पुढे त्यांचा शोध लागत नाही. या लोकांचे अवयव काढून घेऊन त्यांना मारून टाकण्यात येतं. चीनमध्ये दरवर्षी १ लाखाच्यावर इंद्रिय प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची नोंद आहे. शिवाय इंटरनॅशन मार्केट आहेच.

सीरिया आणि उत्तर कोरियाच्या बरोबरीने मानवी तस्करीमध्ये चीन अव्वल क्रमांकावर आहे. चीनमध्ये १२ वर्षाच्या आतील मुलांना उत्तर कोरिया, म्यानमार, व्हिएतनाम, मंगोलिया, पूर्व चीन इत्यादी अनेक देशांतून तस्करी करून आणले जाते आणि त्यांना जबरदस्तीने लैंगिक व्यापारात ढकलले जाते. यासाठी चीनमध्ये कोणताही कायदा केलेला नाही. १४ वर्षावरील मुलांना कायदेशीरपणे लैंगिक व्यापारात घेतले जाते. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने चीनला या कारणास्तव टियर-३ चा दर्जा दिलेला आहे. चीनमध्ये लैंगिक व्यापाराला आळा घालण्यासाठी कडक कायदे नाहीत.

समुद्रामध्ये अमर्याद मासेमारी करून तेथील जैवविविधतेला मोठा धोका चीन पोचवतंय. जगातील सर्वात मोठा, १७००० जहाजांचा ताफा समुद्रात उभारून बेकायदेशीरपणे अनियंत्रित मासेमारी करून सागरी संपत्तीचा ऱ्हास चीन करतंय. जगातील सगळ्यात मोठं आणि वाढतं अवैध व्यापाराचं वन्यजीव प्राणीमार्केट चीन चालवतं.>>>>>>>>>>>नवीन माहिती समजली. धन्यवाद !

इथे मायबोली वर २०१४ साली एक धागा आला होता. त्यात भारताची आर्थिक वृद्धी किती कमी आहे, तेव्हा बदला बदला असा कल्ला केला होता. त्या धाग्यात चीनच्या प्रगतीचं कौतुक केलं होतं बहुतेक.

चीनसारखी हुकुमशाही आपल्याकडे यावी अशी अनेकांची इच्छा आहे .
चीनची अनेक धोरणं आजच्या सत्ताधारी पक्षाला आणि त्यांच्या पाठिराख्यांना आवडतात. लोकसंख्या नियंत्र णासाठी सक्ती, सरकार विरोधी निदर्शकांना चिरडणे, अल्पसंख्यकांना दुय्यम नागरिक म्हणून वागवणे.
नीति आयोगाचे प्रमुख म्हणाले होते की भारतात टू मच ऑफ डेमॉक्रसी आहे, त्यामुळे आर्थिक सुधारणा होत नाहीत, तेव्हा त्यांच्या समोर चीनचेच उदाहरण असावे.

आपले पंतप्रधाना आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या इतके जिव्हाळ्याचे संबंध , अशी केमिस्ट्री भारतातच काय जगभरात दोन राष्ट्र प्रमुखांच्या बाबतीत पाहायला मिळत नाही.

>>>>>>>>>>>>
चीनची अनेक धोरणं आजच्या सत्ताधारी पक्षाला आणि त्यांच्या पाठिराख्यांना आवडतात. लोकसंख्या नियंत्र णासाठी सक्ती, सरकार विरोधी निदर्शकांना चिरडणे, अल्पसंख्यकांना दुय्यम नागरिक म्हणून वागवणे.>>>>>>>>>>>>>>>>
लोकसंख्या नियंत्रण सक्ती कायदा अल्पसंख्याक विरोधी आहे हे कसे काय ?
आणि अल्पसंख्याक ना दुय्यम वागणुकीची एक दोन उदाहरणे दिली तर बरे होईल !!!!!
पण त्या निमित्ताने चीन मध्ये उगीर लोकांची गळचेपी होते मान्य झाले हे ही नसे थोडके .

चीन च्या अंतर्भागात नक्की काय चालले आहे ह्याची पक्की माहिती बाहेर येणे मुश्किल आहे.
भारताने स्वतः सर्व संकटाना तोंड देण्याची ताकत ठेवावी .
लष्करी ,आर्थिक सामर्थ्य वाढवावे.
पणं अमेरिकेच्या नादाला लागून चीनशी दुष्मनी घेवू नये.
अमेरिका हा विश्वास ठेवण्यास योग्य देश नाही

प्रगतशील देशांची नाकेबंदी करणे,दोन शेजारी राष्ट्रात भांडण लावणे ह्या मध्ये अमेरिका पटाईत आहे.
आणि त्या भांडणाचा फायदा घेवून स्वतचं स्वार्थ साधने.
चीन भारताचा शेजारी आहे. शक्य होत असेल तर प्रेमाने नाही तर लष्करी सामर्थ्य ने त्याच्या वर नियंत्रण ठेवावे.
पण लबाड राष्ट्रांच्या नादी लागू नये.

एक तर महा स्वार्थी देशांनी भारताला अडचणीत आणले आहे.
एक पण शेजारी भारताचा मित्र झाला नाही पाहिजे ह्याची पूर्ण काळजी घेतली आहे.
ह्या अशा देशा ना फाट्यावर मारून.
सर्व शेजारी देशांशी भारताने आपुलकीचे संबंध निर्माण करण्यात च भारताचा खरा फायदा आहे.
चीन,पाकिस्तान,बांगलादेश,नेपाल,श्री लंका,म्यानमार हे सर्व देश भारताचे मित्र असले पाहिजेत.
अमेरिका मित्र नको, ना कोणता युरोपियन देश.

<< पण त्या निमित्ताने चीन मध्ये उगीर लोकांची गळचेपी होते मान्य झाले हे ही नसे थोडके . >>

------ कित्ती कित्ती काळजी उगीर लोकांची. मानवतावादी भुमिकेला सलाम.

<< चीन च्या अंतर्भागात नक्की काय चालले आहे ह्याची पक्की माहिती बाहेर येणे मुश्किल आहे.
भारताने स्वतः सर्व संकटाना तोंड देण्याची ताकत ठेवावी .
लष्करी ,आर्थिक सामर्थ्य वाढवावे.
पणं अमेरिकेच्या नादाला लागून चीनशी दुष्मनी घेवू नये.
अमेरिका हा विश्वास ठेवण्यास योग्य देश नाही

प्रगतशील देशांची नाकेबंदी करणे,दोन शेजारी राष्ट्रात भांडण लावणे ह्या मध्ये अमेरिका पटाईत आहे.
आणि त्या भांडणाचा फायदा घेवून स्वतचं स्वार्थ साधने.
चीन भारताचा शेजारी आहे. शक्य होत असेल तर प्रेमाने नाही तर लष्करी सामर्थ्य ने त्याच्या वर नियंत्रण ठेवावे.
पण लबाड राष्ट्रांच्या नादी लागू नये.
>>

----- हेमंत दोन्ही प्रतिसादांशी सहमत...

चीन सोबत दोन हात करणे आजतरी अवघड आहे. अमेरिकेच्या भरवशावर बसण्यात काहीच अर्थ नाही.

फ्रान्स कडून राफेल मिळविले. आंतरराष्ट्रिय बाजारांत पैसा मोजल्यावर शस्त्रे विकत मिळतात. भ्रष्टाचारी व्यावहार करुन खरेदी केलेले पहिले विमान आल्यावर भक्त आनंदाने नाचायला लागले होते... (कतार, इजिप्त कडे पण राफेल आहे... Happy ) .

गलवान मधे झालेल्या समोरासमोरच्या मारामारीत आपले किमान २० जवान धारातीर्थी पडले (नक्की किती गेले असावेत हे कधीच कळणार नाही कारण सरकारला जवानांच्या मृत्यु पेक्षाही सत्ताधारी पक्षाची आणि नेत्याच्या प्रतिमेची काळजी आहे) . सर्वपक्षिय बैठकीत पंतप्रधानांनी चीनला क्लीन चिट दिली. कुणी घुसखोरी केली नाही, कुठल्याही चौकीवर त्यांनी कब्जा केलेला नाही....

या अत्यंत महत्वाच्या बैठकीत त्यांनी चीनचे थेट नाव घेण्याचे साधे धाडसही दाखविले नाही... जर घुसखोरी झाली नाही, त्यांनी सिमा ओलांडली नाही तर विस जवान गेले कसे? याचे उत्तर कुणाकडेही नाही.

गरिब जनतेचा कोट्यावधींचा पैसा वापरुन जगाच्या बाजारातून अव्वाच्या सव्वा भावात राफेल / शस्त्रसाठा विकत घेता येतो.... पण चीनचे नाव घेण्यासाठी लागणारे धाडस पंतप्रधान कुठून आणणार ?

गरिब जनतेचा कोट्यावधींचा पैसा वापरुन जगाच्या बाजारातून अव्वाच्या सव्वा भावात राफेल / शस्त्रसाठा विकत घेता येतो....

झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला चा उदय कसा होईल?

---- कित्ती कित्ती काळजी उगीर लोकांची. मानवतावादी भुमिकेला सलाम. >>>>>>>
आम्हाला काळजी वैगेरे काही नाही हो !
पण स्वार्थासाठी बांधवांच्या होणाऱ्या गळचेपी कडे दुर्लक्ष करणारे स्वयंघोषित मानवतावादी पाहिले की धन्य ! धन्य !! वाटते .

या अत्यंत महत्वाच्या बैठकीत त्यांनी चीनचे थेट नाव घेण्याचे साधे धाडसही दाखविले नाही... जर घुसखोरी झाली नाही, त्यांनी सिमा ओलांडली नाही तर विस जवान गेले कसे? याचे उत्तर कुणाकडेही नाही. >>>>>>>>>>
चीन चे नक्की किती जवान मारले गेले या बद्दल चीन खरी माहिती सांगेल याची शक्यता आहे का ?
Face 2 face झालेल्या हाणामारीत त्यांचे ही 20/25 गेले नसतील कशावरून ?
आपले 20 जवान शहीद झाले आणि त्यांची नावे मीडियात जाहीर केली गेली होती .
काही जणांची नावे लपवली गेली असतील तर त्यांचे कुटुंबीय इतक्या दिवस गप्प बसले असते का ?

नेहमीची सवय असल्यामुळे कोणत्याही विषयावर रुदाली करत बसण्याची काही लोकांना असते हे ही खरं !!!!

झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला चा उदय कसा होईल? >>>>>>>>>>>>>
सोंग घेणाऱ्यांची ही अजून काही लक्षणे - आपल्या सैनिकांच्या पराक्रमाबद्दल किंचितही अभिमान न बाळगता बालकोट मध्ये अतेरिकि मारले गेल्याच पुरावा यांना हवा असतो , येथील अतेरिकि अफगाण मध्ये बाटला हाऊस बद्दल बोंबलून सांगतोय तरी ती चकमक फेकच होती असा यांचा आरोप असतो

<< झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला चा उदय कसा होईल? >>>>>>>>>>>>>
सोंग घेणाऱ्यांची ही अजून काही लक्षणे - आपल्या सैनिकांच्या पराक्रमाबद्दल किंचितही अभिमान न बाळगता बालकोट मध्ये अतेरिकि मारले गेल्याच पुरावा यांना हवा असतो , येथील अतेरिकि अफगाण मध्ये बाटला हाऊस बद्दल बोंबलून सांगतोय तरी ती चकमक फेकच होती असा यांचा आरोप असतो. >>

----- आपल्या सैनिकां बद्दल थोडी जरी आत्मियता, प्रेम असते तर पुलवामा घडविलेच गेले नसते. अत्यंत नियोजन पद्धतीने घडविण्यात आले.
भारताचे ४४ जावान या घडविलेल्या " हत्याकांडात " मारल्या गेले तरी साधी चौकशी नाही किंवा चौकशी व्हावी यासाठी पाठपुरावा नाही, आणि आक्रोशही नाही. कित्ती कित्ती सैनिकांबद्दलचे प्रेम... अर्थात पुलवामा घडविले आणि निवडणूका जिंकल्या.

सखोल चौकशी झाली नाही तर पुलवामा कसे घडविले हे जनतेला कळणार कसे? भविष्यात असे हत्याकांड कसे थांबविता येईल?