बदला : भाग तीन

Submitted by kotwalsk on 26 June, 2021 - 23:32

ATT (अँटी टेरोरिस्ट टीम) दिल्ली कार्यालयात मीटिंग हॉल मध्ये कमालीची शांतता. कारणही तसेच होते. समोर स्क्रीन वर होता मोस्ट वॉन्टेड टेरोरिस्ट इरफानचा दोन महिने आधीच भारतातील फोटो शेजारी एक कोडेड मेल. आणि समोर आठ अधिकारी. समोरील माहितीवरून एकच समजत होते की इरफान भारतात आलाय. आणि ती मेल पूर्ण डेकोड नव्हती झालेली. त्यामुळे पूर्ण काही समजत नव्हते.
पण एव्हढं मात्र नक्की होत की काहीतरी मोठं कांड होणार होत भारतामध्ये. जो तो अधिकारी आपापलं डोकं लावत होता. पण निर्णय होत नव्हता. पांडे मात्र शांत होता. त्या केबिन मधला सर्वात कनिष्ठ कर्मचारी. म्हणूनच त्याला काही बोलता येत नव्हतं. पण जेव्हा सर्व अधिकारी विचार करून शांत झाले तेव्हा त्याने तोंड उघडले.
" मी काही बोलू का"
" हा बोला ना पांडे तुमच्या मनात काही योजना असेल तर नक्क्की बोला"
" सर जस की आपल्या सर्वांना आज पर्यंत वाटत होतं की इरफान मेलाय. अस आपल्याला वाटण्याला एक माणूस कारणीभूत होता तो म्हणजे 'गुरू'. कारण गुरुणेच त्या छत्तीस अतिरेक्यांना यमसदनी धाडलं होत आणि गुरूच्या म्हणण्यानुसार त्यात इरफान सुद्धा होता. हो त्या आधी इरफान ने आपले चोवीस एजंट शाहिद केले होते. पण त्याचाच बदला म्हणून गुरूने त्यावेळी छत्तीस अतिरेकी मारले होते. साहजिकच आहे की त्यावेळी इरफान पळून गेला. आणि गुरूला वाटले की इरफानही त्यावेळी मेला.
आणि आपण बदला घेतला पण आपल्या एका चुकी मुळे आपले चोवीस साथीदार शाहिद झाले म्हणून गुरू ने ATT मधून राजीनामा दिला"

" तुम्हाला नेमकं काय बोलायचंय पांडे, कारण हे सगळं आम्हालापन माहीत आहे"

"मला एकच म्हणायचंय सर की या इरफान सोबत आपले गुरू सर राहिलेले आहेत. इरफान ला त्यांच्या इतकं कोणाचं ओळखत नाही. यावेळी आपल्याला गुरू सरांची गरज आहे. एक गुरू सरच आहेत जे यातून मार्ग काढू शकतील."

" पांडे तुमचं म्हणणं पटतंय आम्हला. पण गुरू सध्या आहे कुठं. त्याला शोधायचं कुठं?? हे तर माहीत पाहिजे ना"

" इतकं काही अवघड नाहीये अस मला वाटत सर, गुरू सगळ्यांशी संपर्क तोडू शकेल पण एका माणसाशी कायम संपर्कात असतील अस मला वाटते. गुरू जेव्हा तेरा वर्षाचे होते तेव्हा इथे जे त्यांना घेऊन आले ते मेजर कुमार स्वामी यांच्याशी नक्कीच त्यांचा काहीतरी संपर्क असू शकतो. आपण कुमार स्वामींशी संपर्क करायला हवा."

" ओके लेट्स डू ईट, पांडे ही जबाबदारी तुमची, तुम्हीच गुरुशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, मला पोसिटीव्ह risult हवा आहे."

" नक्कीच सर"

सगळ्यांच्या मनात एकच होत 15 ऑगस्ट जवळ आला होता. त्याच दिवशी तर घात होणार नव्हता ना? पण मेल नुसार पाहिलं तर 51 दिवस दिसत होते. म्हणजे 15 ऑगस्ट नंतर खूप दिवस.......

पांडेनी गुरुची संपुर्ण कुंडली काढली. पण त्यात गुरूचा थेट कोणताच संपर्क नव्हता. मेजर चा मात्र एक फोन नंबर होता. पांडे नी त्या नंबर ला कॉल केला

" हॅलो मेजर कुमार स्वामी हेअर"
" मेजर पांडे फ्रॉम ATT हिअर, एक imargency आहे म्हणून कॉल केला. "
" बोला"
" सर इरफान जिवंत आहे आणि आम्हाला गुरुची गरज आहे, आम्हाला माहीत आहे गुरुशी संपर्क फक्त तुम्हीच करुन देऊ शकता प्लीज गुरुशी संपर्क करून द्या. देशावर खूप मोठं संकट आहे. हा माझा नंबर आहे....

पुढं बोलणं झालच नाही कारण मेजरनी कॉल कट केला.

मेजर विचार करू लागले की काय करावं. गुरू ला इरफान बद्दल कळाल तर तो स्वतःला थांबवू शकणार नाही. आणि त्याची तर लाईफ सध्या एकदम मस्त चाललीये. पण प्रश्न देशाचाही होता. मनाचा एक निर्धार करून त्यांनी गुरूचा नंबर डायल केला.

--------------------------------------------------------------

रविवार, विष्णूची सुट्टी. 11 वाजलेले. विष्णू निवांत हॉटेल च्या पुढे आपली दीड बिअर घेऊन बसलेला नेहमीप्रमाणे. दुपारी दीड बिअर मग जेवण, थोडी झोप, मग पुन्हा संध्याकाळी दीड बिअर आणि जेवण, हे दर रविवारचा त्याचा नित्यक्रम.
आजही तो असाच बिअर आणि एक मसाला पापड घेऊन बसलेला. जेम्स नेहमीप्रमाणे बापाशी भांडण करून पैसे घेऊन बाहेर गेलेला. मेरि चार दिवसांपूर्वी सुट्टी होती म्हणून परत आलेली. तिला का कुणास ठाऊक पण विष्णू जरापण आवडलेला नव्हता. आणि विष्णूला त्याच्याशी काहीएक घेणं देणं नव्हतं. जॉर्ज वरती जाऊन अराम करत होता.

आणि त्याच वेळी जेम्स धापा टाकत धावत पळत हॉटेल मध्ये आला तो थेट मेरी जवळ.
" मेरी मला वाचावं ते लोक मला मारून टाकतील. माझी चूक झाली. मी मायकल च्या मुलाला म्हणजे मार्क ला मारलं. पण चुकून झालं माझ्याकडून. मार्क माझ्या मागचं येतोय. तो मला मारून टाकेल. प्लीज मला वाचावं"

मेरी काही बोलणार तोपर्यंत हॉटेल समोर एक थोर येऊन थांबली. त्यातून मार्क आणि त्याचे तीन साथीदार उतरले. मार्कने गाडीच्या बोनट वर बसकण मांडली आणि एकाला इशारा केला. तो साथीदार हॉटेल मध्ये आला आणि जेम्स च मानगूट पकडून घेऊन निघाला. आणि जेम्स 'मला माफ करा माझी चुंक झाली' कळवळून बोलत होता. अजून तो चार पावलं पण निघाला नसेल तोच त्याच्या छातीत एक सणसणीत लाथ बसली. तो विष्णू होता. ज्याच्याकडे अजून कुणाचाच लक्ष नव्हतं.
"अरे यार पोरग माफी मागतय ना मग दे ना सोडून."
पण कोणच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं. मार्क चा दुसरा साथीदार विष्णुकडे धावला. पण हे जणू एक खेळ आहे विष्णू साठी असच विष्णूने त्याला खाली पडला आणि त्याच्या छातीवर बसून त्याच्या चेहऱ्यावर दोन चार पंच लावले. तो साथीदारही शांत झाला. आता तिसरा पुढे आला पण विष्णू ने त्याला कामरेतून उचलून जोरात खाली आदळला. आणि वरतून दोन लाथा कंबरेत मारल्या. तोपन शांत झाला. आता विष्णू ने आपला मोर्चा मार्क कडे वळवला. मार्क मनातून घाबरलेला. आपले तीन साथीदार काही सेकंदात गळीतप्राण झाले हे पाहून तो पुरता घाबरला होता. आणि विष्णू त्याच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला.
मार्क" हे बघ तुला माहीत नाही मी कोण आहे ते. माझे वडील मायकल इथले डॉन आहेत. मला जर काही केलं ना तर तू जिवंत नाही राहणार"
विष्णू" ए मच्छर बापाच्या जीवावर उड्या करतोस काय. जा तुला सोडून दिलं. पण तुझ्या बापाला घेऊन ये. इथंच बसलोय अजून. बिअर बाकी आहे माझी. तोपर्यंत घेऊन ये. जा निघ. आणि तुझे हे तीन कुत्रे पण घेऊन जा. त्यांना डॉक्टरची गरज आहे"
वाघाच्या तावडीतून सुटका व्हावी तस मार्क तिथून निघाला. पण मनात अपमान ठेऊनच. परत येण्यासाठी.

विष्णू परत येऊन आपल्या जागेवर बसला. जॉर्ज पण तोपर्यंत खाली आला होता. झालेला प्रकार पाहून तो अवाक झाला. तो विष्णूला म्हटला
" तू माझ्या मुलाचा जीव वाचवलास तुझे उपकार माझ्यावर. पण आता तो मायकल येईल तो खूप खतरनाक आहे. तू जा इथून पटकन. तो तुला मारून टाकेल"
" आणि जर मी त्याला इथे नाही भेटलो तर तो तुम्हा सगळ्यांना मारून टाकेल. तुम्ही तिघेही आत जा. मला काहीही होणार नाही."

जॉर्ज जड पावलाने आत वळला. तेव्हढ्यात बाहेर गाड्या थांबण्याचा आवाज आला. आणि पाठोपाठ मायकल चा आवाज
" कोण होता रे तो**"
मार्क ने विष्णू कडे इशारा केला.
मायकल हातात बंदूक घेऊनच आला . पहिली गोळी त्याने बिअर वर घातली. त्याला वाटलं विष्णू घाबरेल. पण विष्णू हलला सुद्धा नाही. शांतपणे त्याने मायकल कडे पाहिलं.नजरेला नजर भिडली. आणि मायकल चमकला.

मायकल हळू हळू विष्णू जवळ चालत येऊ लागला. जस जस अंतर कमी होऊ लागलं तस मायकल चे हावभाव बदलले. बंदूक केव्हाच हातातून निसटून गेलेली. चेहऱ्यावर भीती पसरली. आणि विष्णूच्या चेहऱ्यावर किलर स्माईल.

मायकल विष्णूच्या पायावर कोसळला.
"भाऊ माफ करा. माझ्या पोराला माहीत नाही तुम्ही कोण आहेत. चुकून तुम्हाला नडला तो. त्याला माफ करा. मीपण तुमच्यावर चुकून गोळी चालवली. माफ करा भाई माफ करा. ए मार्क इकडे ये भाईची माफी माग."
" हे बघ मायकल जॉर्ज आणि त्याची मुलं माझ्या फॅमिली सारखी आहेत. त्यांना काहीही झालं नाही पाहिजे. नाहीतर तुझं मी काय करेल मीसुद्धा सांगू शकत नाही. जा निघ आता. आणि हो एक बिअर सांगून जा. सगळी नशा घालवलीस तू"

जड पावलाने मायकल आणि मार्के तिथून परत निघाले. गाडीत बसल्यावर मार्क ने प्रश्न केला
"पप्पा तुम्ही त्याला का सोडलं. त्याला का मारून नाही टाकलं??"
सर्वात आधी काय झालं तर मार्कच्या गालावर मायकलचे बोट उमटले.
"तुला समजत नाही का कुणाशी नडाव ते. मरता मरता वाचलोय आपण आज. अरे सैतान आहे तो. नशीब समज तुझ्या माणसांना मुका मार दिलाय. नाहीतर हात पाय वेगळे करतो तो धडापासून. राक्षस आहे तो राक्षस. त्या फॅमिलीला काहीही झालं नाही पाहिजे. नाहीतर चार वर्षात जे इथं कमावलाय ना ते सगळं इथंच सोडून निघून जावं लागेल. समजलं का. आणि आता कोणताच विषय नको. माझ्या गोळ्या दे रे चिंधी."
गोळ्या घेऊन सीट मागे करून मायकलने डोळे मिटले. त्याला तो सारखा डोळ्यासमोर येत होता. आणि त्याचे विचार भूतकाळात गेले.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिखाण प्रकाशीत करण्या अगोदर एकदा वाचत जा.
" हे बघ मायकल, जॉर्ज आणि त्याची मुलं...
तोपर्यंत हॉटेल समोर एक थोर येऊन थांबली>>>>>> थोर ?????
मला पोसिटीव्ह risult हवा आहे>>>>>>>>>>
पॉसीटिव्ह, result

लिखाणात खूप चुका आहेत, दुरुस्त करून पुन्हा प्रकाशित करा.
तोपन-- तो पण
मायकलचे बोट उमटले- मायकल च्या हाताची पाचही बोटं उमटली.
कुणाचाच- कुणाचेच

अजून बर्याच चुका आहेत

ATT (अँटी टेरोरिस्ट टीम) दिल्ली कार्यालयात>>>>>

ATT .... ऐवजी
ATS असे हवे
(The Anti-Terrorism Squad (ATS) is a special police force in several states of India)

अहो तिथे ATS लिहीले तर त्या घटना खर्‍या आहेत असे नाही का वाटणार?

विष्णू हाच गुरु असावा किंवा इरफान .

माफ करा. माझं शिक्षण खूप कमी आहे. निव्वळ मी 9 वि पास आहे. आणि त्यामुळे शुले च्या चूका होत आहेत. पण मी त्या सुधारेल. माझ्या चूका मला नक्की सांगा. मी दुरुस्त करेन.