वटपोर्णिमेच्या शुभेच्छा

Submitted by सामो on 24 June, 2021 - 10:17

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/e0/Ficus-Benghalensis-Coral-Gables.JPG

वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून -

विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम|
वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा
महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६||

महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो. इंद्र त्याच्या समस्त देवगणांसमवेत या संहार समयी डोळे मीटतो. परंतु हे सती अशा महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो.

*कवीने पार्वतीच्या सौभाग्याची स्तुती वरील कडव्यात गायली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy देवकी अवघड आहेत पण फार सुंदर आहेत 'सौंदर्यलहरी' मधील श्लोक. आदि शंकराचार्य प्रकांडपंडीत होतेच पण तितकच रसिक कविहृदयही त्यांच्याजवळ होते. देवीचे वर्णन करताना बहर बहर आला आहे . थांब एक पाचूच्या करंडीचा श्लोक आहे देते.

देवीचे कटाक्ष बाणाच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण असून ते शंकरांच्या वैराग्यमूलक शांतरसाचा भेद करणारे आहेत.

आकाशातील चंद्रापेक्षा देवीच्या मुखचंद्राचे आस्वायत अधिक आहे हे सांगताना आचार्यांनी व्यतिरेकाचे एक उत्तम उदहरण दिले आहे.- चकोरपक्षी देवीच्या मुखाचे "स्मितज्योत्स्नाजल" नित्य पीत असतात. त्या माधुर्यातिरेकाने, त्यांच्या तोंडात जडत्व येते. त्यांना काहीतरी आंबट खावेसे वाटते. तेव्हा ते चंद्राच्या चांदण्याचे ती आंबट कांजी आहे असे समजून सेवन करीत असतात.

देवीचे वक्ष हे जणू काही अमृत रसाने भरलेल्यामाणिक रत्नाच्या कुप्याच आहेत.

देवीचे दोन्ही चरण लाक्षारसामुळे रक्तवर्ण झाले आहेत. प्रमदवनकंकेलित म्हणजे अशोकवृक्ष फुलाफळांचा बहर यावा या इच्छेने तुझ्या चरणाच्या आघाताची नेहमी आकांक्षा बाळगून असतो. त्यमुळे शंकर त्या अशोक वृक्षाची फार असूया करतात.

एका श्लोकात- शंकरांनी चुकून गंगेचे नाव घेतले, शंकरांना देवीच्या पादप्रहाराचा प्रसाद लाभला, व त्यामुळे मदनाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असे गमतीचे वर्णन आले आहे.

साध्या कमळात आणि देवीच्या चरण कमळात किती फरक आहे त्याचे वर्णन आचार्यांनी सूक्ष्म दृष्टीने केले आहे. निसर्ग कमलांना थंडी सहन होत नाही तर तुझे चरण हिमालयात निवास करतात. निसर्ग कमळे रात्री मिटून जातत, तर तुझे चरण अहोरात्र प्रसन्न असतात. साध्या कमळात फक्त लक्ष्मीच वास करते पण निष्ठेने उपासना करणार्‍या "समयी" जनांना तुझे चरण लक्ष्मी किंवा अतिस्पृहणीय निजानंदरुपी ऐश्वर्य स्मर्पित करतात. देवांगना ज्यावेळी तुझ्या चरणांना नमस्कार करतात त्यावेळी त्यांची करकमळे कळ्यांसारखी मुकुलित होतात. खरेच आहे, दिनविकासी कमळांवर चंद्रकिरणे पडली की ती मिटणारच. असा महीमा असणारे तुझे चरण कल्पवृक्षांना पाहून हसतात. कल्पवृक्ष स्वर्गात राहणार्‍या देवांचीच इच्छा पूर्ण करतो, पण तुझी चरणकमळे पृथ्वीवरच्या दरिद्री लोकांना देखील रात्रंदिवस समृद्धी देत असतात. तुझे चरण रत्नखचित नुपूरांनी सुशोभित झाले आहेत. त्यांची छुमछुम म्हणजे राजहंसांना सुंदर चालीचे धडे देत असताना त्यांनी केलेला मधुर ध्वनीच होय.

आचार्यांनी चंद्राचा देवीशी कसा अद्भुत संबंध जोडला आहे पहा. चंद्र हा एक पाचूचा करंडा आहे त्यात देवी आपली प्रसाधने ठेवीत असते. चंद्राचा कलंक ही कस्तुरी, जलांश म्हणजे गुलाबजल, पांढरा कलात्मक भाग हा कापूर आहे. जेव्हा देवी त्या वस्तूंचा उपयोग करते, तेव्हा त्या कमी होत जातात म्हणजे कृष्णपक्षात चंद्रकलांचा क्षय होतो. ब्रह्मदेव पुनः तो भरतात व शुक्लपक्षात पुनः चंद्रकलांची वृद्धी होत जाते.

वाह.... मस्त लिहीले आहेस.
(सारस उपक्रम ९०० दिवसाचा आहे = ~३ वर्ष. वाटेल तेव्हा ये शुभेच्छा द्यायला.)

खूपच सुरेख लेख व श्लोकांचे विश् लेषण . मला देवी देवतांच्या प्रतिमा वेगवेगळ्या मीडिअम मध्ये इमॅजिन करायचा व बांधायचा चित्रे करायचा छंद आहे त्यामुळे लगेच व्हिजुअलाइज करून बघितले. काल हपिसात नवोढा व सौभाग्यवती सुंदर्‍या छान पैकी साड्या व दागिने करून आल्या होत्या त्यामु ळे वातावर ण उत्सवी होते. नववधूंनी उपास धरले होते.

विधवा झाल्याव र काही वर्शे मला हे सौभाग्य केंद्रि त सण व सोपस्कार बघ णे अव्घड जायचे मग त्यानंतर स्त्रीवादी मानसिकतेतून हे सर्व फोल आहे ह्याची जाणीव झाली आता ते फार दूर जावुन व कोविड काळातील भावनिक डाउन फेज होउन गेल्या वर हे सर्व सोपस्कार एका मानवी जाणीवेतून आनंद देतात सुखी लोक्स बघून मस्त वाट्ते.

असे लेख अजून लिहा. तुम्हाला किती वेगळी माहिती आहे. लेखमालिका पण करता येइल.

>>>>सौभाग्य केंद्रि त सण व सोपस्कार बघ णे अव्घड जायचे मग त्यानंतर स्त्रीवादी मानसिकतेतून हे सर्व फोल आहे ह्याची जाणीव झाली

खरे आहे. हे लक्षात आले नाही या वेळेला.
हे सण फार डिस्क्रिमिनेटिंग आणि पुरुषसत्ताक आहेत खरे. पूर्वी चूल-मूल व्यापात स्त्रियांना नवरा-मुले यांशिवाय आयुष्यच अक्षरक्षः नसे जेव्हा हे 'घरच्या धन्याला उदंड आयुष्य दे' वगैरे प्रथा पडल्या असणार.

अमा कौतुकाबद्दल खूप आभार. अन्य सर्व वाचकांचेही आभार.

IMG_20210624_112828-1128x2000.jpg

पुजा वगैरे आहेच. पण दरवर्षी आमच्या या छोटुल्या वटवृक्षाचं कौतुक जास्त असतं. वटपौर्णिमेच्या हिरव्यागार शुभेच्छा.

सौभाग्य केंद्रित सण व सोपस्कार बघ णे अव्घड जायचे मग त्यानंतर स्त्रीवादी मानसिकतेतून हे सर्व फोल आहे ह्याची जाणीव झाली

>>> अमा प्रांजळ मत आवडलं.

मलाही हे सण फार आवडायचे नाहीत. कारण एखादीच्या वैवाहिक स्थितीवरून तिला आनंदाच्या प्रसंगी सामिल करून न घेणे मला फार क्रूरपणाचं वाटतं. पण मोठ्या शहरात का होईना हळूहळू बदल होत आहेत. हळदी कुंकू समारंभ आता तिळगुळ समारंभ होत आहेत. सगळ्यांना समाविष्ट करून हे सण साजरे केले जातात तेव्हा नक्कीच आनंददायक ठरतात.

मराठी सिरीअलनी मात्र गेल्या २ दिवसात मोस्ट रिग्रेसिव कोण आहे ची स्पर्धा लावल्यासारखे एपिसोड दाखवून वात आणला.

स्त्रियांनी सरसकट सर्व उत्सवात आनंदाने सहभागी व्हावे... जोडीदार हा निरंतर बरोबरच् असतो.
आपणच चुकिच्या प्रथा सुधारित करून पुढे जायचे !

धन्य्वाद,जिद्दु.

हळदी कुंकू समारंभ आता तिळगुळ समारंभ होत आहेत. >>>> अत्यल्प प्रमाण असावे.५-६ वर्षांपूर्वी ऑफिसच्या हळदीकुंकवात हळदीकुंकू लावणार्‍या बाईने ३-४ जणींना(जास्ती जास्त वय ३२) वगळले.तेव्हा मी त्यांना हळदीकुंकू लावले आणि त्यांनी मला लावले. लग्ना आधीपासून आपण टिकली लावतो,नंतर्ही लावतो.एका नवर्‍यानंतर सर्व काही खल्लास का?

खूप सुरेख लिहिले आहे. सर्वच उपमा अप्रतिम. Happy
शंकरांना देवीच्या पादप्रहाराचा प्रसाद लाभला,>>>> Lol

सौंदर्य लहरी विषयी मागे वाचलं होतं , पुन्हा काही सापडलं तर इथे देईन. बऱ्याच वर्षांपूर्वी 'महाषोडशी मंत्र' का 'श्री विद्या मंत्र'हाही सोळा अक्षरांचाच आहे हे शोधताना 'सौंदर्य लहरी' बद्दल कळाले होते. आचार्यांबद्दल काय म्हणणार, तेजस्वी, ओजस्वी ,दिव्य,पावरफुल ..... मागे मी इथेच लेख लिहिला होता. त्यांचे कनकधारा स्तोत्र पण फार सुरेख आहे(लक्ष्मीचे) . मला त्यांच्या सगळ्याच रचना आवडतात. एकप्रकारे मानसपूजेचा भाव मनात येतो.

सर्वांना शुभेच्छा !

तीनदा वाचला , आज आरामात उत्तर देणार होते. सॉरी उशीर झाला.

Lol असं कसं प्राणपणाने जपते मी... पुन्हापुन्हा वाचायला.

अरे हे मस्त आहे! अजून सौंदर्य लहरी मधले वाचायला आवडेल .मीही चुकून उघडला हा धागा. एरव्ही टायटल बघून स्किप केला असता. तेव्हा लेखाचे टायटल बदला! तसेही ते "पोर्णिमा" लिहिलेले डोळ्याला खटकते Happy

छानच आहे. अजूनपर्यंत वाचला नव्हता हा धागा.
सौंदर्य लहरी विवेकानंदांना आवडत असत असे काहीसे वाचले आहे.

सामो,
लेखाचे शीर्षक वट पौर्णिमेचे असूनही तुमचा धागा म्हणून उघडला आणि इतके छान वाचायला मिळाले. सौदर्य लहरी बद्दल अजून वाचायला आवडेल.

Happy स्वाती धन्यवाद.
हीरा विवेकानंदांनी काहीतरी अशा प्रकारचे रचलेले आहे बहुतेक. अमुकतमुक लहरी असेच - वाचल्याचे स्मरते.
हरचंद, मैत्रेयी, अस्मिता, देवकी, पशुपत, चिन्मयी सर्वांचे आभार.
चिन्मयी बॉन्साय आहे का ते?

छान लिहिलंय. आवडलं!
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती |
तस्माधी काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितं ||
हाच श्लोक आठवला तुमचं रसग्रहण वाचून! अजून असेच तुमच्या आवडत्या संस्कृत श्लोकांचे, काव्याचे रसग्रहण वाचायला आवडेल.

सामो,
तुमची ह्या विषयातील आवड आणि मेहनत जाणवते. छान!