Submitted by द्वैत on 24 June, 2021 - 06:49
कोणता ऋतू असा
कोणता ऋतू असा फुलांत दुःख दाटले
का निराश पोकळीत पान पान गोठले
ओंजळीत ठेवला कुणी जपून काजवा
कोणत्या दिशेस हा उडून चालला थवा
अंगणात थांबली उदास सांज देखणी
मी मिटून घेतली तिच्या कुशीत पापणी
मंद मंद श्वास हा जरा जपून ठेवतो
भग्न मंदिरात रोज दीप एक पेटतो
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच सुंदर!
फारच सुंदर!
सुंदर..
सुंदर..
छान
छान
निव्वळ अप्रतिम !
निव्वळ अप्रतिम !
सुंदर!
सुंदर!
वाह!! सुंदर!
वाह!! सुंदर!
प्रतिसादांसाठी धन्यवाद
प्रतिसादांसाठी धन्यवाद
सुंदर कविता!
सुंदर कविता!
खरंतर कवितेत एक दु:खाची झालर
खरंतर कवितेत एक दु:खाची झालर चढलेली दिसते.या अंधातरी मनाच्या वाटेला हे दु:खच जाहले.
छान काव्य!
पुलेशु.
नेहमीप्रमाणे सूंदर शब्दरचना..
नेहमीप्रमाणे सूंदर शब्दरचना...!!
हरचंद, चंद्रमा, रुपाली जी खूप
हरचंद, चंद्रमा, रुपाली जी खूप खूप धन्यवाद
सुंदर लिहिलीय
सुंदर लिहिलीय
कोणत्या दिशेस हा उडून चालला
कोणत्या दिशेस हा उडून चालला थवा - सुंदर
गौरी, ज्योतिराम धन्यवाद
गौरी, ज्योतिराम धन्यवाद