Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 21 May, 2009 - 02:47
सुटे बेभान हा वारा
फुले उरात शहारा
यावा अशात साजण
देत गुलाबी इशारा
हृदयाच्या सागरात
लाटा उठाव्या खट्याळ
प्रीतीशरांनी सख्याच्या
व्हावे पुरते घायाळ
सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा
निळाईने पसरावे
आकाशाच्या कुरणात
गाणी गावी अवखळ
द्वाड वा-याने कानात
खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात
नभदीप तारकांचे
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध
जयश्री अंबासकर
गुलमोहर:
शेअर करा
जया, तुमच्य
जया,
तुमच्या कविता इतक्या छान, लयबद्ध आणी गेय असतात की विडंबन करायचा मोह होतो.
क्या बात
क्या बात है !!! सुरेख..
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
ठीक.
ठीक.
जयन्ता५२
ओळखीची
ओळखीची कविता!
जयन्ता५२
नभदीप
नभदीप तारकांचे
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध
>>>>>>> ही जया श्टाइल आहे, बढिया!
वाह!! नेहमी
वाह!! नेहमी सारखाच... नविन अल्बची तयारी...?
पुन्हा
पुन्हा एकदा धन्यवाद
जयंत..... मला माहिती आहे....तुम्हाला काय म्हणायचंय

नाईलाज को क्या इलाज
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
यावा अशात
यावा अशात साजण - खुप आवडली...
खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात
नभदीप तारकांचे
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध
कित्ती सुंदर कल्पना.....
*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************
आवडली जया.
आवडली जया. गेय आहे! छान.
वाहऽऽ
वाहऽऽ जयश्री.. क्या बात है!!! सगळा दिवस आता मस्त जाईल... एक आग्रहाची विनंती, 'सारे तुझ्यात आहे' नंतर येणार्या अल्बम मधे हवंय हे गाणं... नक्की हवंय.... कितीही वेळा वाचलं तरी अजूनच वाचावंसं वाटतंय... असंच मस्त लिहीत रहा.
----------
टेक्सास ए.वे.ए.ठि. वृत्तांत : http://www.maayboli.com/node/7575
अव्यक्त : http://avipune.blogspot.com
गणॅश, उपास,
गणॅश, उपास, अवीकुमार ...... मनापासून धन्यवाद
अवी..... नक्की प्रयत्न करेन
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
खूप छान
खूप छान कविता!
असेच लिहित रहा!
खुप खुप
खुप खुप छान... वाहवा
जयाबाई...
जयाबाई... अर्रे क्या बात है..... हे तुझ्या कितव्या अल्बममधलं कितवं गाणं म्हणे?
जियो!
दाद..........
दाद..........:) आता बघूया काही जमतंय का ?
स्वर, श्री, दाद ...... मनापासून आभार
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
बर्याच दिवसांनी अशी बेभान
बर्याच दिवसांनी अशी बेभान कविता ऐकली. बहुत खूब!
गणेशोत्सव २०१५ मुळे वाचायला मिळाली. त्याबद्दल संयोजकांचे आभार!
Pages