चीज - पौष्टीक की जंक फूड?

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2021 - 17:35

तू चीज बडी है मस्त मस्त असे एक जुने गाणे होते. पण तेव्हा आमच्याकडे तरी चीज खाण्याचे तितके फॅड नव्हते. बटर, तो सुद्धा ब्रेडबटर, मस्का पावभाजी ईतकीच आपली झेप होती. चीज नजरेस पडायची एक जागा म्हणून फक्त एक पिझ्झाच तेवढा माहीत होता. पण तो सुद्धा फुकटात मिळालेली पार्टी वगळता कधी खाणे व्हायचे नाही. कारण आपण तेव्हा वडापाववाले होतो.

पण आता वडापावमध्येही चीजची स्लाईस घालून खातात लोकं. सँडवीच असो वा फ्रँकी त्यावर चीज किसून घालायलाच हवे. घरी डोसे बनवले की पोरं त्यावरही बनवतानाच चीज किसून घालायला सांगतात. मॅगी व पास्त्यावरही चीजची गार्निशिंग करायला सांगतात. निव्वळ चीजच्या दोन तीन स्लाईस तर एकापाठोपाठ एक आंब्याची पोळी खावी तसे खातात. ओरडले तर एखादी स्लाईस चपातीत गुंडाळून खातात. चॉकलेट खावे तसे चीज क्यूब चावून चावून खातात. त्यामुळे हे चीज शरीराला घातक तर नाही ना हा प्रश्न बरेचदा पडतो. कारण ज्या खाद्यपदार्थात हे प्रामुख्याने वापरले जातात ते पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ जंक फूड म्हणून ओळखले जातात. माझ्या अंदाजाप्रमाणे, म्हणजे जे मी आजूबाजूंची घरे आणि मुलांचे मित्रमैत्रीण पाहतो त्यांच्यावरून असे वाटते की बरेच घरात लहान मुलांना चीज आवडत असावे, आणि ते जास्त प्रमाणात खाणे होत असावे. आणि आपली मुले एखादा पदार्थ अतिप्रमाणात खात असतील तर तो चांगला की वाईट हा प्रश्न आपल्याला पडतोच.

अर्थात कुठलाही पदार्थ अतिप्रमाणात खाणे वाईटच, पण ते प्रमाण काय हे मुळात माहीत असायला हवे.
मुलांनी किंवा आपणही जास्त चीज खाऊ नये म्हणून एकच करू शकतो ते म्हणजे घरात वारंवार चीज आणूच नये.
पण ते एक असते ना, शॉपिंगला गेले की चीजवर नजर पडताच, अरे हे आपली पोरे आवडीने खातात म्हणत आपणच ते पटकन बास्केटमध्ये टाकतो आणि मनाशी म्हणतो, काहीतरी चॉकलेट वा क्रीमची बिस्किटे खाण्यापेक्षा पोरं चीज खाताहेत तर चांगलेच आहे की Happy

असो, तर माहीती मिळवायला ओळखीच्यांतले जे जाणकार वाटतात त्यांच्याकडे चौकशी केली,
तर काही जण म्हणाले की चीज हे अत्यंत पौष्टिक आहे. उगाच ईतके महाग असते का ते? हे म्हणजे फुकट ते पौष्टीकच्या अगदी उलट झाले Happy
तर काही जणांनी निषेध नोंदवला. आपण या पाश्चात्य फॅड चीजच्या नादी लागून आपल्या पोरांना तूप लोणी देत नाही म्हणून चीडचीड केली Sad

गूगलवर सर्च केलेले तर एकीकडे कोणी याला असे म्हणालेले,
eating too much could lead to high cholesterol and high blood pressure, increasing your risk of cardiovascular disease (CVD)
तर कोणी याला तसे म्हणालेले,
eating a small amount of cheese every day may benefit heart health

आरोग्याबाबत गूगल करण्यात अर्थ नसतो हेच खरे Happy

मायबोलीवर सर्च केले तर चीजवर चर्चा आढळली नाही.
म्हणून मग नवीन धागा काढला.
चीज पौष्टिक की शरीराला अपायकारक? हे समजले तर बरे होईल.
एका प्रमाणात ठिक आहे, असे असल्यास ते प्रमाण कळले तर बरे होईल.

धन्यवाद,
....................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लागोपाठचा दुसरा धागा आवडला. पण शेवटचा पॅराच ठेवला असता तर अजून छान झाले असते. शक्य असल्यास संपादीत करावे. अशा विषयावर आपण जितके कमी लिहू तितके प्रतिसादात लोक लिहीतात. अन्यथा पार्श्वभूमी तयार झाली कि मग हवे तसे प्रतिसाद न येता वेगळे वळण लागते.

एका प्रमाणात ठिक आहे, असे असल्यास ते प्रमाण कळले तर बरे होईल.>>> असे काही एक प्रमाण नसते. तुम्ही आहारतद्न्याला भेटा. ते तुमची तपासणी करून तुमचा आताचा आहार, विहार, जीवनशैली बघून तुमच्यासाठी काय, किती योग्य ते सांगतील. तसेच ते जे काही प्रमाण सांगतील ते आयुष्यभरासाठी लागू होणार नाही हे ध्यानात ठेवा.

पौष्टिक म्हणजे काय हेच नक्की माहीत नाही, मग कसं उत्तर देणार?
आधी पौष्टिक म्हणजे काय ते सांग, किंवा तुला माहीत नसेल तर तसा धागा काढ.

चीज कॅल्शियम, प्रथिने, सोडियम, saturated fats, कॅलरी, b१२, कोलेस्टेरॉल चा सोर्स आहे. अर्थात त्याचं प्रमाण तुम्ही चेडर चीज खातात का ब्लू चीज खाताय का पामेजों का मोज्जरेला का ते पोरं दोरे काढून तासंतास खातात ते स्ट्रिंग चीज खाताय का बेगल वर घेतो ते क्रीम चीज खाताय का आणखी काही त्यावर ठरेल.
चीज हेच जेवण नक्की नसणारे, सो आहारात बाकी पदार्थामुळे किती आणि कशी पोषणमूल्ये मिळताहेत हे ही बघा, आणि ठरवा.

बाकी आरोग्याबाबत आणि कशाही बाबत गूगल करून फायदा हा असतोच, फक्त कुठली माहिती खरी आणि कुठली फापटपसारा हे शोधता आलं पाहिजे.

रच्याकने: फ्लेवर्ड/ स्मोकी चीज, ऑलिव्हज आणि वाईन फार भारी लागते. किंवा सॉफ्ट चीज क्रंची क्र्याकर आणि वाईन ही. असं आठवलं की हॉलिडे पार्टी आठवते एकदम. बाहेर स्नो पडतोय, टेबलावर भरपूर पदार्थ आहेत आणि आनंदी वातावरण आहे सगळीकडे.

मानव,जा त्या धाग्यावर (पौष्टिक sandwich) आणि विचारा पौष्टिक म्हणजे काय . मला तर त्या धाग्यावरच विचारावे का की परत इम्युनिटी बुस्टर धागा व्हायचा.
हा ऋ चा धागा अवांतर चलता नही दौडता है
बादवे गुगलइंडिकवर चंद्रबिंदू कसा देतात.

मंजूताई, तूमची कमेंट अजिबात आवडली नाही.
पौष्टिक कशाला आणि का म्हणायचे हे मी माझे आणि तूम्ही तूमचे ठरवायला मुखत्यार आहोत. माझ्या धाग्याचा reference कशाला?

चांगला आहे धागा
मलाही पनीर, चीज,बटर हे नक्की आरोग्यला उपयोगी की घातक ते समजत नाही आणि त्याच प्रमाण पण किती असावं ते ही माहीत नाही
गुगल केलं नाही

जंक फूड पोटात गेल्याबरोबर आपली रोगप्रतिकार शक्ती शत्रू शरीरात आल्यासारखी वागते.
आणि जंक फूड चा प्रतिकार केला जातो.
असा अभ्यास चा निष्कर्ष आहे.

कुठलीही गोष्ट अती खाल्ली, पिली / प्यायली की त्रासदायकच ठरणार. चीज मध्ये कॅल्शियम असल्याने दातांमधल्या फटी बुजण्यास मदत होतो असे वाचले होते. पण म्हणून ते सतत खाणे पण योग्य नाही. टिकवण्यासाठी मीठ पण वापरले जाते, मग अती मीठही शरीराला अपायकारक ठरेल. खरे तर लोणच्या मध्ये सुद्धा मीठ कमी असेल तर ते नासते. ( मी बाकी सगळे नमकीन वर्षातुन एकदा खाऊ शकेन, पण लोणचे मात्र रोज खाते )

नुसते चीज एकवेळ ठीक आहे, पण ते बर्गर, ब्रेड, पिझ्झा यात असेल तर डबल त्रास. कारण यात मैदा आहे.

ऋन्मेष , मुलांना रोज चीज देण्यापेक्षा ( तू रोज देतोस असे नाही मी म्हणत ) आठवड्यातुन दोन दा दे. म्हणजे ब्रेड सारखे पदार्थ जास्त खाल्ले जाणार नाही. ते परोठ्यावर किंवा आम्लेट वर किसुन देणे, सँडवीच मध्ये स्लाईस देणे असे ( मल्टीग्रेन ब्रेड चालेल ) करु शकतोस.

मूळ म्हणजे प्रक्रिया केली जाते जेव्हा व्यापारी तत्वावर जेव्हा ते बनते.मग ते चीज असू नाही तर दुसरा कोणता ही प्रॉडक्ट.
काही ना काही रासायनिक प्रक्रिया केली जातेच.
जंक फूड नी शरीरात प्रवेश केला की आपली immunie system हरकत मध्ये येते.
पण नॉर्मल आपण जास्त प्रक्रिया न केलेले अन्न घेतो .
तेव्हा immunie system ॲक्टिव hot नाही

मागच्या,लॉक्डाऊनमधे चीझ्,पनीर पराठे बरेच खाल्ले.त्यांचे इतरही पदार्थ व्हायचे.एक फायदा जरूर झाला. केस गळायचे फार कमी झाले आणि लांबही झाले.
ऋन्मेष, मुलांना जरुर चीझ खाऊ दे.चांगला प्रोटीन सोर्स आहे.त्याहीपेक्षा छान लागते.

भारत हा मधुमेह असणाऱ्या लोकांची राजधानी लवकर च होईल.
आताचा भारतात मधुमेह असणारी लोकसंख्या खूप प्रचंड आहे.
फक्त खाणे आणि आराम.
रोज नियमित व्यायामाच्या नावाने बोंब.
आणि भारतील gym
प्रोटीन suppliment, हार्मोन्स देवून फक्त शरीर फुगवय ला उत्तेजन देणारी स्थळ झाली आहेत .

चेरी चीज पायनॅपल मस्त लागते स्कॉच नंतर...
आणि आता स्कॉच पौष्टिक नाही म्हणू नका... Google करा.. भरपूर फायदे आहेत...

Scotch. फायदे-A
स्कॉच तोटे. -B
आणि ह्या दोघांची वजाबाकी केली तर फायदे जास्त असतील को तोटे?

जंक फूड पोटात गेल्याबरोबर आपली रोगप्रतिकार शक्ती शत्रू शरीरात आल्यासारखी वागते.
आणि जंक फूड चा प्रतिकार केला जातो
mhanje kay ? vomit hote ka? kahihi kay.. r u a Doctor?

जंक फूड म्हणजे काय?
पोषक तत्व कमी असणारे पण साखर,चरबी,salt, ह्याचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ.
जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न.
विविध cold drink.pizza,fried केलेले पदार्थ.

दूध दही ताक लोणी

फारफार तर श्रीखंड बासुंदी गुलाबजामुन पेढे बर्फी

इतर बटर पनीर चीज हे सर्व व्यर्थ आहे

बोगस लसीकरणवर धागा कोण काढणार >>> विषय महत्वाचा असेल तर धागा कोण काढणार याची वाट बघत बसू नका. बोलणारे बोलतील, तुम्ही काढा धागा.

धन्यवाद सर्व प्रतिसादांचे, बिजी असल्याने ईथे जास्त फिरकायला मिळाले नाही.

@ पारबीचा आत्मा
हा लागोपाठचा दुसरा धागा आवडला.
>>>
धन्यवाद

@ सियोना, प्रोसेस केलेले चीज म्हणजे चीज स्लाइस शक्यतो कमी प्रमाणात खावे. >>> आमच्याकडे हेच सर्वाधिक खाल्ले जाते Sad

@ हेमंत
https://www.sciencealert.com/bodies-may-treat-a-western-diet-like-a-dang...
जंक-food चे पाठीराखे वरील न्यूज वाचा.
>>>>>>
लिंकबद्दल धन्यवाद. मला जंक फूड आवडते. पण टाळायला हवे हे समजते. पुर्ण बंद नाही करू शकत. पण घरी वारंवार होतेय असे वाटले तर बडबड करतो.

@ अमितव
बाकी आरोग्याबाबत आणि कशाही बाबत गूगल करून फायदा हा असतोच, फक्त कुठली माहिती खरी आणि कुठली फापटपसारा हे शोधता आलं पाहिजे.
>>>
एक्झॅक्टली. ते काय खरे काय खोटे हे कसे शोधणार हेच मला समजत नाही. डॉकचा वा आपल्याला ठाऊक आहे जो जाणकार आहे त्याचा सल्ला सर्वोत्तम.
बाकी तुम्ही चीजची बरीच नावे दिलीत, मला मुळात चीज हा प्रकार फार आवडत नसल्याने हे प्रकार कळत नाही. पण घरी एक त्या अमूल वगैरेच्या चीज स्लाईस असतात, काही क्यूब असतात, आणि ते मोझेरेला चीजचा ठोकळा...

mhanje kay ? vomit hote ka? kahihi kay.. r u a Doctor?
>> हा प्रतिसाद ऋन्मेष साठी आहे पण राहवत नाही...डॉक्टर ना सगळे नॉलेज असते का? मेडिकल सायन्स अजून बऱ्याच गोष्टी माहीत करू शकला नाहीय... डॉक्टर म्हणेल ती पूर्व दिशा का?

अहो च्रप्स आशू२९ यांचा तो प्रतिसाद हेमंत३३ यांच्यासाठी होता, माझ्यासाठी नाही.

बाकी आपला मुद्दा योग्य आहे.
माझ्या आजाराचे निदान होत नव्हते तेव्हा मी डोक्टरांचे बरेच विविध अनुभव घेतलेत.

डॉक्टर हे आरोग्य विषयी ज्ञान असणाऱ्या साखळीत सर्वात खालच्या पातळीवर असतात.
D great कर्मचारी समजा.
संशोधक, microbiology वाले जे प्रतेक पेशींचा अभ्यास करतात.रसायन शास्त्र वाले जे मानवी शरीरात कशा biologically रासायनिक प्रक्रिया चालतात ह्याचा अभ्यास. करतात.आणि असे बरेच जे सुष्म स्वरूपात मानवी शरीर कसे काम करते ह्याचा अभ्यास करतात.
ते सर्वात वरच्या स्तरावर आहेत.
डॉक्टर लोक हे वरचे लोक जे निष्कर्ष काढत असतात त्याचाच अभ्यास करतात.

मी लॉकडाऊनच्या आधी चीज बर्‍याच प्रमाणात (नुसतेच.. किंवा चपातीवर कीसून) खाल्ले परंतू लॉकडाऊन नंतर चीज मिळणेच दुरापास्त झाले त्यामुळे ते खाणं अगदी बंदच झालं. परंतू मला तब्येतीत काही फरक जाणवला नाही.

cold drink.pizza,fried केलेले पदार्थ >> आपल्याकडे ह्याला सर्रास पाश्चिमात्य आहार म्हटले जाते. वरच्या लिंकमध्येही western diet शब्द दिसत आहेत. पाश्चिमात्य लोक नक्की हे खातात का रोजच्या रोज? (इथे अमेरिकेतील वाया गेलेल्या माणसांबद्दल मी विचारत नाहीये. सर्वसामान्य निरोगी पाश्चात्य लोक, ज्यांचं जीवनमान भारतीयांपेक्षा अधिक आहे, त्यांच्याबद्दल विचारतो आहे)

Harchand Palav >> It is similar to that of most of the non Indians think that every Indian eat Samosas, Chicken Tikka Massala, Paneer xxx, Biryanis, Dosas, etc. throughout the day!! Lol Lol Lol

Lol . आणि सगळे सॉफ्टवेअर मध्ये कोडिंग करणारे नर्ड असतात.
भारतात पण ट्रंपसारखा माणूस सत्तेवर आहे आणि भारतीयांना ट्रंप आणि तशीच लोकं आवडतात सांगितल्यावर प्रतिक्रिया मनोरंजक असते. ते परत कधीतरी. Wink

भारतात पण ट्रंपसारखा माणूस सत्तेवर आहे आणि भारतीयांना ट्रंप आणि तशीच लोकं आवडतात सांगितल्यावर प्रतिक्रिया मनोरंजक असते.
Biggrin

डॉक्टर हे आरोग्य विषयी ज्ञान असणाऱ्या साखळीत सर्वात खालच्या पातळीवर असतात.
D great कर्मचारी समजा.
संशोधक, microbiology वाले जे प्रतेक पेशींचा अभ्यास करतात.रसायन शास्त्र वाले जे मानवी शरीरात कशा biologically रासायनिक प्रक्रिया चालतात ह्याचा अभ्यास. करतात.आणि असे बरेच जे सुष्म स्वरूपात मानवी शरीर कसे काम करते ह्याचा अभ्यास करतात.
ते सर्वात वरच्या स्तरावर आहेत.
डॉक्टर लोक हे वरचे लोक जे निष्कर्ष काढत असतात त्याचाच अभ्यास करतात.
नवीन Submitted by Hemant 33 on 21 June, 2021 - 17:00

उपचार पद्धती,विविध जिवाणू,विषाणू,विविध अवयव ची काम .विविध औषध ,विविध लसी.विविध मेडिकल उपकरण ह्यांचा शोध घेणारे किती लोक पाच ,सहा वर्ष course करून स्वतः ल डॉक्टर पदवी लावणारे होते का?
ह्याचे उत्तर शोधायला गेला की सहज समजेल डॉक्टर हे आरोग्य व्यवस्था मधील सर्वात खालचे टोक आहे.
J

ब्लॅककॅट, तुमच्या ‘ इतर बटर पनीर चीज हे सर्व व्यर्थ आहे’ या वाक्यावर अजुन लिहाल का? कारण आम्ही शाकाहारी प्रोटीनसाठी पनीर खातो. हे वाचल्यावर तुम्हाला नक्की काय सांगायचंय ते कळेना.