दु:ख

Submitted by Rudraa on 15 June, 2021 - 18:19

डोळ्यांच्या पापण्यांवर,
अश्रूंना विरुदे .....
भिजऱ्या पदरात मज ,
दुःख उधार दे ......

मनाच्या वाऱ्यावर,
थाप पडूदे विस्तवाची .....
सुखास तुच जरा ,
दुःखा घाल अडकाठी .......

अवेळी तुझे येणे,
जणु भूजंगच असे पाहुणा ......
अनुरक्ता तरिही तुझी मी,
भाळले मी तुझ्यातल्या अपक्षपातीपणाला.......

विरहात तुझ्या ,
अनंत सुख आठवे जगाला.....
किती मनोहर रूप तुझे
ना यातना कसल्या ना विरहाच्या वेदना दुःखा तुला.......

रुद्रा.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users