संध्याकालीन वारा

Submitted by _आदित्य_ on 13 June, 2021 - 07:22

संध्याकालीन वारा नेतो आठवणींच्या गावा
तेव्हा कळते कुणी कुणाला अपुला रंग न द्यावा

नदीकिनारी शांत बसावे निरखत पाखरवेण्या
देवही जन्मा येतो शेवट वैकुंठास परतण्या

खोल आत प्राणात शिरावे आठवणीतील पाणी
अंतःकरणी उमलत जावी पुन्हा नव्याने गाणी

स्वप्नांच्याही पलीकडल्या आभासी जगात जावे
दिठी श्रवण चव स्पर्श नी गंधही तृप्तीने बहरावे

Group content visibility: 
Use group defaults