आवाज

Submitted by _आदित्य_ on 13 June, 2021 - 07:14

माझ्याच अंगणामधले, ती मलाच देते पाणी !
अंधार खरा कि ज्योती, हे कधी पाहिले कोणी?

माझ्या एकांताकाठी, एकांत तिचा दरवळतो !
चाहूल लागल्यावरती, मग कोण कुणाला बघतो?

मी चंद्र धुक्याच्या मागील, ती संध्या केविलवाणी !
का मौन माझीया ओठी, अन तिच्याच ओठी गाणी?

कधी राग कुणाला येतो, कधी कुणास कुतूहल वाटे !
पण तरी तिच्या शब्दांचे, का तिलाच रुतले काटे?

तो जुनाचं होता खेळं, जो आज नव्याने सजला !
ती गेल्यावरती हलका आवाज कशाचा आला?

Group content visibility: 
Use group defaults