शिक्षण क्षेत्र - शिक्षकांच्या यातना आणि प्रशासनाचा असुरी आनंद व त्यांची मुजोर गिरी !!!!

Submitted by डॉ_वि_ना_पवार on 13 June, 2021 - 01:38

अतिशय धोकादायक व वाईट पद्धतीने प्रशासन काम करीत आहे. १९९२- ९३ सालापसुन सेवेत असलेल्या , सेवनिव्रुत्त प्राध्यापकना मा.
सर्वोच्च व उच्च न्यायालाने पेन्शन देण्याचे आदेश देऊनही शासनाने पेन्शन नाकारली आहे. केसेस चा निकाल कोर्टात शिक्षकांकडून लागून सुद्धा, प्रश्न आणखी क्लिष्ट करून ठेवला आहे.
मंत्री पातळीवर वातावरण चांगले असले तरी प्रशासकीय पातळीवर सर्व प्राध्यापक वर्गाचे खाच्चिकरण करत आहेत......
मंत्रालयातले मुजोर अधिकारी माननीय मंत्रीमहोदयांची दिशाभूल करतात . निर्णय घेऊ देत नाहीत . न्यायालयाची भीती दाखवून होणाऱ्या कामात अडथळे आणतात . मंत्रीमंडळाचाही फारसा वचक अधिकाऱ्यांवर राहिलेला दिसत नाही . मंत्र्यांची स्वतःचीही कामे अधिकाऱ्यांकडे असल्याने तेही अधिकाऱ्यांवर दबाव टाकत नसावेत अशी शंका घायला जागा आहे .अलीकडच्या काळात "न्यायालयीन सक्रियता " ( Judicial Activism) खूपच वाढलेले दिसते . शासन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे .ताजे उदाहरण म्हणजे लसीकरणाच्या बाबतीत दोन्ही उच्च / सर्वोच्च न्यायालयाला रोज हस्तक्षेप करावा लागत आहे . मग सरकार कशासाठी आहे ? स्व. यशवंतराव म्हणायचे ; "पुढाऱ्याने (मंत्र्याने ) 'नाही' म्हटले पाहिजे आणि प्रशासनाने ( अधिकाऱ्याने ) 'हो' म्हटले पाहिजे तरच सामान्य जनतेला न्याय मिळेल .सध्या याच्या उलट परिस्थिती दिसते आहे . अधिकारी मुजोर झालेले आहेत .
यावर आपणच उपाय शोधला पाहिजे . न्यायालयीन लढाईसोबत आपण आता सनदशीर मार्गाने रस्त्यावरची लढाई केली पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे . प्राध्यापक वर्गाला संघटित करून जन आंदोलनाचा रेटा शासनाला दाखवला पाहिजे . वृत्तपत्रातून/ समाजमाध्यमातून जनजागृती करणे . शासकीय कार्यालयावर (जिल्हाधिकारी, शिक्षण संचालक , उपसंचालक ) धरणे/ मोर्चे/ उपोषण/ निवेदन या माध्यमातून आंदोलन करणे . माननीय मंत्री महोदयांना प्रकरणाची गंभीर दखल घायला लावण्यासाठी योग्य व्यूहरचना करणे आणि निर्णय घायला लावणे . शक्य झाल्यास माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालायला सांगणे .आपण आत्मविश्वास न गमावता , खचून न जाता ही लढाई यशस्वी कशी होईल यासाठी जोरदार प्रयत्न करूया .
डॉ विजय पवार अध्यक्ष, MUST

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाजपेयींने 2000 साली कायदा केल्याने पेन्शनची पाटी फुटली,

म्हणजे 2000 पूर्वी ज्यांची पेन्शन सुरू आहे , त्यांनाच पेन्शन सुरू रहाणार आणि इतरांची बंद ना ?

सामान्य मनुष्याला पगार , भत्ते , पेन्शन ह्यातून पैसा मिळत रहावा , असे माझेही मत आहे, जर आमदार खासदार खातात तर आम्हाला का नको ? हा प्रश्न अगदी उघडपणे मीही विचारतो. जर आपण नाही खाल्ले तर भ्रष्ट नेते आणि xxचे मश्रुम ह्यात ते जाणार , हे माझे मत आहे
पण सध्याचे म्हणजे भाजप सरकार ह्याबाबतीत हलकट आहे.
(आमचीही स्लॅब वाढ व पगार वाढ 2017 पासून बंद आहे. )

आणि गम्मत म्हणजे ह्याच हलकट सरकारने पेन्शन योजना सुरू करून त्याला अटल पेन्शन योजना नाव देऊन सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे, ज्यात आपणच पैसे घालायचे आहेत आणि त्या पेन्शणीतून 10 वर्षांनी एक वेळचा चहाही येणार नाही, इतकी ती कमी आहे

शिक्षक पण काही कमी नाहीत साहेब
सध्या परीक्षा ना देता विद्यार्थी पास होत आहेत
निकालाचे टेन्शन नाही
सरकारी नोकरीचा रुबाब

आमच्या शाळेत तर स्टाफ रूम मध्ये गादी होती झोपायला शिक्षकांना

"सर्वोच्च व उच्च न्यायालाने पेन्शन देण्याचे आदेश देऊनही शासनाने पेन्शन नाकारली आहे." हे काही समजलं नाही. हा न्यायालयाचा अवमान समजला जातो आणि हे अतिगंभीर ठरतं. त्यामुळं पेन्शन नाकारणं शक्य नाही. काही तरी घडामोडी असतील यामागं.

शिक्षक पण काही कमी नाहीत साहेब
सध्या परीक्षा ना देता विद्यार्थी पास होत आहेत
निकालाचे टेन्शन नाही
सरकारी नोकरीचा रुबाब>>>>

ओळखित कुणी शिक्षक असेल तर एकदा बोलुन घ्या त्यान्च्याशी.... तुम्हालाच टेन्शन येईल..

वर्क फ्रोम होम करणारे घरात बसुन काम करताहेत आणि फुल पगार पण सुरु.. कित्ति मज्जा असे वाटणारे कित्येकजण आहेत, तसेच आहे हे... जावे त्याच्या वन्शा तेव्हा कळे...

शिक्षक पण काही कमी नाहीत साहेब>> अत्यंत दुर्दैवी आणि कृतघ्न विधान.
अतिशय कमी पगारावर हालअपेष्टा सोसत तळमळीने आणि कळकळीने तळागाळात वर्षानुवर्षे समाजभिमुख सर्वसाधारणपणे भ्रष्टाचार विरहीत काम करणारा असा एक कुठला वर्ग असेल तर शिक्षक वर्ग. बाळासाहेब देसाईंनी पेन्शन सुरू करायच्या आधी प्रत्येक शिक्षकाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असे. पेन्शन मुळे त्या वर्गाला थोडा दिलासा मिळाला होता. आता खरच पेन्शन बंद होणार असेल तर कठीण आहे.
आपापल्या शाळेतील शिक्षकांची परिस्थिती घरी जाउन बघणे डोळे उघडणारे ठरेल.

शिक्षक प्रचंड स्ट्रेस मध्ये असतात.
ऑनलाईन वर्ग मॅनेज करताना होणारे समजुतींचे गोंधळ, पालक घरीच असल्याने असणारे लक्ष,एखाद्या आगाऊ विद्यार्थ्याला ओरडल्यास पालकांचे मीटिंग मध्ये ऑब्जेक्षन घेणे,शिक्षकांच्या घरातले इश्यूज,त्यांची लहान मुले,मोठ्या वर्गातल्या मुलांची मुद्दाम टवाळी/गोंधळ/वर्गात स्क्रीन प्रोजेक्ट करून काही आचरट व्हिडीओ लावणे इत्यादी इत्यादी.

मी, साधना, अनु आणी विक्रमसिंह यांच्याशी सहमत आहे. माझी मैत्रीण टिचरच आहे. करोनामुळे शाळा बंद पडल्यात. बर्‍याच जणांचे जॉब धोक्यात आहेत. तरी नव्या जुन्या टिचर्सनी नवीन तंत्रज्ञानाशी जुळवुन घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. गंमत म्हणजे एर्‍हवी उनाडक्या करणारे काही पालक वर्ग ऑनलाईन मध्ये फारच जागरुक आढळले. टिचर्सची चूक नसते असे नाही, पण त्यांचाही नाईलाज असतो. इथे घरी सुट्ट्यांमध्ये १ पोर हँडल करण्यात नाकी नऊ येते, तर या लोकांना ३० ते ५० लहान मोठ्या मुलांना सांभाळावे लागते.

आता ऑनलाईन मुले लहान मुलांना पण नको तेवढ्या अकला आल्यात. सेशन दरम्यान कॅमेरा बंद ठेवणे, नाहीतर मध्येच तो चालू करुन इतर मुलांना व टिचरला वाकुल्या दाखवणे असे सोशल मनोरंजनाचे लाईव्ह कार्यक्रम चालू असतात. नशीब माझी मुलगी सिरीय॑सली अटेन करतीय, नाहीतर तिच्या मैत्रिणी पण दिव्य आहेत.

जुन्या टिचर्स ना सतत स्क्रीन समोर रहावे लागल्याने मुलांबरोबर तेवढेच ताणाचे आहे. काही लहान मुलांना कंदिल लागलेत. ऑनलाईन मुळे इतर टिचर्सना घरी बसवुन बाकी टिचर्स वर लोड आणला जातोय. निगेटिव्ह कमेंट देणार्‍यांनी या दुसर्‍या बाजूचा पण विचार करावा.

परवा टिचर नी ४५ गुडमॉर्निंग ऐकायला नको म्हणून वैतागून 'न बोलता भारतीय संस्कृती प्रमाणे फक्त नमस्कार करा' सांगितले.
मुलांना 'तुमची उत्तर द्यायची वेळ आली कि मी सांगेन' असं रोज सांगून पण परत सगळे एकदम मी सांगू मी सांगू करत असतात.
टिचर ना सोडा, मलाच ऐकून मानसिक थकवा येतो.कॅमेरा बंद बद्दल आमच्या घरात सांगून सांगून मीच दमले.शाळा संपायला अर्धा तास असताना युनिफॉर्म भिरकावून टिशर्ट शॉर्ट्स घातली जाते.

टिचर ना नक्की रक्तदान केल्यासारखे वाटत असेल शाळा झाल्यावर.

इथे गावात शिक्षकान्वर ताण आहे तो वेगळाच. मुलान्कडे मोबाइल नाहीत, नेट धड नाही..

आता बोर्डाने महिन्याच्या अभ्यासाची पिडिएफ करुन सगळ्या शिक्षकाना पाठवली, पण ती डाउन्लोड होइल इतके नेट मुलान्कडे नाही. म्हणुन शिक्षक एकेका पानाचा फोटो घेउन तो पाठवताहेत. मुलान्कडे असे प्रत्येक विषयाचे फोटो गोळा होताहेत. वर्गात जी मुले अभ्यास करत नव्हती ती आता घरात बसुन शिकणारेत? इथे फार थोडे पालक अभ्यास घेउ शकतात, मुलाना जबरदस्तीने अभ्यासाला बसवु शकतात. कित्येक मुले आता शाळा सोडुन मिळेल ते काम करताहेत, त्यान्ची शाळा कायमची सम्पलि.

खरंच
हे खूप वाईट आहे.शाळा संपली, पोषक आहार, सुकडी, खिचडी अभावी काय करत असतील काय माहित.
बर्‍याच मुलांकडे फ्री मिळणारा गणवेष सोडून चांगले कपडेच नसतात घालायला.
देव करो सर्वांना लवकर मार्ग मिळो.

महिन्याचा कोरडा शिधा घरपोच केला जातोय सध्या.
त्यात डाळी कडधान्ये, मसाले, तेल वगैरे असते. घरचे या शिध्याचे काय करतात हा वेगळा विषय आहे.