मी अन तू

Submitted by विनोद इखणकर - श... on 5 June, 2021 - 07:29

मी अन तू.......

तुझ्यातला मी
माझ्यातली तू
कृष्णा मी
अन राधा तू

भाळली मला
भाळलो तुला
दोन जीवांचा
एकजीव झाला

हसते गालात
पाहतो मी
लाजेने गुलाबी
गाल करते तू

नभातला चंद्र
नभात इंद्रधनू
भासते मला
अप्सरा जणू

कोमल काया
तुझ्या यौवनाची
वीज चमकावी
माझ्या स्पर्शाची

हरवून गेलो
तुझ्यात मी
गुंतलो इतका
तुझ्यात मी

येती झुळूक
वाऱ्याची पुन्हा पुन्हा
सावरते बट तू
छान दिसतेस तू

अदाकारी तुझ्या
लाजण्यातली
वेगळीच जादू
तुझ्या असण्यातली

साथ अशी दे
सखे मला तू
एकाच जन्मात
सात जन्म तू

तुझे नसणे
एकटेपणाचा
कानी गुंजतो
आवाज पैंजणाचा

उचकी लागते मला
आठवण काढते तू
समजून घेतो मी
समजून जाते तू

लिहीन गझल
हो शब्द माझे तू
काफिया होईन मी
रदीफ मात्र तू

- विनोद इखणकर
(शब्दप्रेम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users