मायबोली सोडून जाताना ........

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 June, 2021 - 17:43

रात्रीच्या अंधारात धागे काढायचो,,,,
रात्रीच्या अंधारातच सोडून जातोय,,,,

जेव्हा एके दिवशी "कु ऋ शिवाय एक दिवस" धागा आला तेव्हा एक दिवस असा धागा येईल आणि एक दिवस माझ्यावर मायबोलीशिवाय राहायची वेळ येईल असे मला एका दिवशीही वाटले नव्हते.

अन्न आहे तोंडात खोटे नाही बोलणार, जेव्हा जेव्हा माझ्या धाग्यांची विडंबने बनली आहेत तेव्हा तेव्हा सर्वात जास्त मीच ती आवडीने वाचली आहेत.
ही काही पहिली वेळ नव्हती अशी विडंबने पचवायची, पण पारंबीचा आत्मा यांनी लिहिलेले खरेच खूप छान होते. जणू ऋन्मेष म्हणून मी जे काही जगलो त्याचे सारे सारच चारच पॅराग्राफमध्ये मांडले होते. जणू सारांशात माझीच बायोग्राफी वाचत आहे असे मला वाटले. आयुष्यात जेव्हा आत्मचरीत्र लिहायची वेळ येईल तेव्हा मी पहिली विनंती पारंबीचा आत्मा यांनाच करेन. जर त्यांनी ती धुडकावली तर नाईलाजाने मीच लिहेन. पण लिहेन जरूर. कारण प्रत्येकाचे आत्मचरीत्र लिहिले गेले पाहिजे असे मला नेहमीच वाटत आलेय. प्रत्येक माणूस स्पेशल असतो. प्रत्येकात निसर्गाने काहीतरी वेगळेपण बनवले आहे. प्रत्येकाने ते जपले पाहिजे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. प्रत्येकाने ते कागदावर ऊतरवले पाहिजेत. अन्यथा ते एक दिवस तुमच्यासोबतच नष्ट होऊन जातील. म्हटले तर ते अनुभव वरवर साधारण वाटणारे असतील. पण तरीही लिहावे. कदाचित येणार्‍या पिढीसाठी तो अनमोल ठेवा ठरू शकतो.

ईथे स्वानुभावांवर धागे काढण्यामागे माझा हाच हेतू होता. कोणाला आवडायचे, कोणाला नाही, कोणी तिथे प्रतिसाद देत व्यक्त व्हायचे, तर कोणी फक्त प्रतिसादच वाचायचे. राग लोभ, स्तुती निंदा, ऊपकार अपकार, फायदा तोटा, यातले कश्याचेही गणित न मांडता माझा धाग्यांचा कारखाना अविरत चालू होता. पण आज त्याला खीळ बसली. आणि ती खीळ मलाच घालावीशी वाटली. त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होताच मी मायबोली सोडून जाईल असे जाहीर केले.... आणि ज्याने मायबोलीवर ईयत्ता दुसरी पास केली आहे त्यालाही हे ठाऊक असावे की त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होणारच होते.

पण तरीही वाटले आता बस्स झाले !!

भले काळजात एकदम ठस्स झाले !!

कारण हा निर्णय मी कसा झेलणार, उद्या माझे काय होणार, ऊद्या मला पुन्हा मायबोलीची आठवण येईल का, ऊद्या मला पुन्हा ईथे काहीतरी लिहावेसे वाटेल का, किमान डोकावावेसे तरी वाटेल का, याच धाग्यावर काय प्रतिसाद येतील ते तरी उद्या बघावेसे वाटतील का, काय अवस्था होणार आहे उद्या माझी, याची मला आज जराही कल्पना नाही....

पण तरीही आता खरेच बस्स झाले.. धावता धावता कुठेतरी बसायची वेळ आता आली आहे. भले आपण माश्यासारखे पाण्यात पोहत असू, पण तेच पाणी माश्यासारखे पिता येत नाही. त्यासाठी कुठेतरी थांबावेच लागते. ते पाणी पिण्यासाठी थांबायची वेळ आता झाली आहे..
जर मायबोलीकरांनी कु ऋ शिवाय एक दिवस अनुभवला असेल तर आता मायबोली शिवाय एक दिवस अनुभवायची माझी वेळ आली आहे..

रजा घेतो मित्रांनो, काळ खराब आहे, जगलो वाचलोच,
तर परवा पुन्हा भेटूया .......!

अरे हो, जाता जाता, सर्वांचे मीम्स खरेच खूप छान होते. जाता जाता खरेच खूप हसवलेत सर्वांनी. मायबोली संयोजक मंडळाने यंदा मीम्स स्पर्धा घ्यायला हरकत नाही. जाता जाताही मायबोलीचा विचार सुटत नाहीये Happy

शुभ रात्री, शब्बाखैर, खुदा हाफिज ... लव्ह यू ऑल Happy
- ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकाच आठवड्यात दोन्ही चष्मे बाद झाले.
एक तुटला एक हरवला.
आता नवीन दोन यायला किमान चार दिवस जातील.
तोपर्यंत निरोप घेतो...

एक असा निरोपाचा धागा हवा माबो वर.. कुठे लिहीणार म्हणून इथेच लिहिले.

नवीन प्रतिसाद आला
पण हाय
दुर्दैवाने वाचता येत नाहीये
कोणी दिला ते सुद्धा समजत नाहीये
जे कोणी आयडी असतील प्लीज व्हॉईस मेसेज टाकता येईल का

माझ्या आग्यावर काही मेसे पडत आहेत
पण ते काय हेत आणि कोण करतेहे
काही दिसत नाही ये
इतका हत बल आयुष्यात कधी नव्हतो
पण त्यातल्या वयात एक चांगले आहे
बोलून टाईप करू शकतो य..

Pages