शेवट! (The End Of Relationship )-भाग ५

Submitted by रिना वाढई on 4 June, 2021 - 04:26

लग्नानंतर पायलला विवेकच्या समजूतदार स्वभावाने त्याच्याशी जुळवून घ्यायला फार अडचणी आल्या नाही. लग्न व्हायच्या आधीच तिने अर्जुनबद्दल विवेकला सांगितले . आपण पायलच्या आयुष्यात पहिल्या स्थानावर नाही याचे दुःख विवेकला झाले मात्र प्रत्येकच व्यक्तीच काहीतरी अतीत असतोच म्हणून त्याने पायलच्या अतितलाही मनातून स्वीकारलं.

विवेकशी एकनिष्ठ असली तरी अर्जुनला निश्चितच पायल विसरू शकली नाही . पण या गोष्टीचा परिणाम कुठेच ती त्यांच्या वैवाहिक जीवनावर पडू देत नव्हती .

एखाद्या चुकीच्या गोष्टीला माणूस विसरू पाहतो , पण प्रेम हे कधी चुकीचं गोष्ट कशी असू शकते . नक्कीच जर प्रेम चुकीच्या माणसावर झाला कि त्याचा त्रास आजन्म होतो . एखादयाने आपला विश्वासघात केला कि ती गोष्ट आपण नाही विसरू शकत . सगळ्यांसाठी प्रेमाच्या संकल्पनाही वेग-वेगळ्या असू शकतात . लग्नानंतर आपल्या भूतकाळाला आठवणे म्हणजे पाप करणे असे कित्येक लोकांनां वाटते . त्याच्याशी मैत्रीपूर्वक बोलणेही कित्येकाला पटत नाही , असे असूनही हेच लोक राधा-कृष्णा बद्दल केवढ्या आदराने बोलतात . कारण राधेने कृष्णावर केलेलं निस्मीम प्रेम हि चूक कशी असू शकते.

पायलनेही तेवढ्याच श्रद्धेने अर्जुनवर प्रेम केलं होत . त्याने तिच्या प्रेमाला नाकारलं त्याचे कारण खूप काही असू शकतात .केवळ फक्त त्याच्या नाकारल्याने तो चुकीचा व्यक्ती होता असे तर नाही ना . प्रत्येकाला आपआपल्या काही जबाबदाऱ्या असतात , त्या पूर्ण करतांना कित्येकदा आपल्याला आपल्या मनाचा बळी द्यावा लागतो . अखेर जिंकतो तोच ज्याने खूप काही गमवून खूप काही जिंकलं असेल . हा विजय केवळ कुठल्या वस्तूला मिळ्वण्याचंच नसेल तर , खूप जणांच्या भावना जपण्याचं , आपल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर चिरकाळ हसू टिकण्याचं. आणि महत्वाचं म्हणजे आपल्यामुळे कित्येक जणांची मान या समाजात ताठ असण्याचं . कुठे ना कुठे अर्जुनही याच प्रकारच्या बंधनात जखडलेला असेल ,म्हणून तो आपल्याशी असा वागला असेल , हे विचार करून पायल अर्जुनला माफ करत होती . चुकी अर्जुनची नसेलही पण तिला झालेल्या वेदना मात्र अर्जुनमुळे होत्या . खरतरं नियतीच आपल्याला एक खेळणा बनवते आणि सगळा खेळ तीच रचते . पण आपण मात्र दुखावलो जातो केवळ एका व्यक्तीच्या वागण्यामुळे .
लग्न झाल्यावर दोन वर्षांनी अर्जुन आणि पायल एका लग्नात भेटले , विवेकही होता तिथे . पायलने अर्जुनसोबत विवेकची भेट करून दिली. तेव्हाच नंबरांची देवाण-घेवाण झाली . काही दिवसाने अर्जुन चा बर्थडे आला.

तेव्हा मात्र पायलने निसंकोच अर्जुनला फोन केला . त्यांनतर ती त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला न चुकता फोन करत होती . कधी गावाकडे गेली कि अचानक झालेल्या भेटीने ती सुखावत होती .

कमीतकमी मनामध्ये आता तणाव जाणवत नव्हतं .

अर्जुनने एक दिवस अचानक पायलला फोन केला .

अर्जुन - पायल , कशी आहेस?

पायल - बरी आहे रे , तू अचानक कसा काय फोन केलास ?

अर्जुन - तुला एक सांगायचं होत , माझ्याआधी कुणा दुसऱ्यांकडून तुला कळेल तर तुला वाईट वाटेल म्हणून मलाच तुला सांगायचं .

पायल - सांग ना .

अर्जुन - माझं लग्न जमलं .

पायल - काँग्रॅच्युलेशन !!!!

छान झालं, तू हि आता लग्नबंधनात अडकशील . काय रे लग्न झाल्यावर विसरून तर नाही जाशील ना?

अर्जुन - तू विसरलीस?

अर्जुनच हे नेहमीच होत , कधी कोणत्या प्रश्नाचे साधे उत्तर न देता तो कोड्यातच बोलायचा .

लग्नाला येशील ना नक्की ?

पायल - तू आलास माझ्या लग्नाला .मी सुद्धा तुला इन्व्हाईट केलं होतच ना . मग?

अर्जुन - सुट्ट्या संपल्या म्हणून नाही येता आलं .

पायल - नक्की हे च कारण आहे .

अर्जुन - हो ना , अजून काय असेल .
अर्जुनशी बोलून झाल्यावर त्यादिवशीही तिला झोप लागली नाहीच .

आयुष्य म्हटलं कि जोडीदार आलाच , अर्जुनलाही त्याचा जोडीदार केव्हा ना केव्हा मिळणारच होत , हे जरी सत्य असलं तरी पायलला दुःख होत होते.

अर्जुनने पायलला पत्रिका पाठवली . त्याच्या लग्नात जाऊन त्याला दुसऱ्या व्यक्तीसोबत बघण्याचं सामर्थ्य तिच्यात नव्हताच ,म्हणून ती लग्नाला गेली नाहीच .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

आजपर्यंत कधीही तो बर्थडेच्या दिवशी फोन करत नव्हता . नेहमी दुसऱ्या दिवशी त्याचा फोन नाहीतर मॅसेज यायचा आणि सगळ्यात आधी तो "आताही तुझी बर्थडे डेट विसरलो म्हणून सॉरी म्हणायचा." त्याच्या सॉरीतही एक वेगळीच आत्मीयता होती .

त्याच्या लग्नानंतर पहिल्यांदा त्याने पायलच्या बर्थडे ला फोन केला .

अर्जुन - हैप्पी बर्थडे पायल .

पायल - थँक यू !

अर्जुन - मग आज काय स्पेशल ?

पायल - हो आज नक्कीच स्पेशल आहे , तू न विसरता पहिल्यांदा ऑन टाइम मला विश करतो आहेस .
तिच्या या वाक्यावर दोघेही हसले .

अर्जुन - अ गं आजपर्यंत तू मला न चुकता विश करत आलीस . मलाही तुला ऑन टाईमच विश करायचं असते ग पण ऐनवेळी मी विसरून जातो . मग दुसऱ्या दिवशी आठवण येते ,मग तुला फोन करतो .

पायल - चला मनामध्ये विश करायची इच्छा असते हे ऐकून छान वाटलं .

अर्जुन - का नसणार ग ? प्रत्येक गोष्ट व्यक्त केलीच पाहिजे का ?

पायल - प्रत्येक नाही तरी काही गोष्टीचं उत्तर मिळालं नाही कि मन टोचते रे आतून . तू नेहमी म्हणायचा मी स्पेशल आहे तुझ्यासाठी , पण फक्त आपण बोलून दाखवल्याने कोणी स्पेशल बनतो का रे . जर मी एवढीच स्पेशल असती तर तू माझा बर्थडे विसरला असतास का?

अर्जुन - विसरत नाही गं . पण काही गोष्टी बदलल्या त्यालाच असेप्ट करायचा प्रयत्न करतो .

पायल - गोष्टी कितीही बदलल्या तरी भावनांचं काय रे . वेड्या मनाला आस असते तुझ्या फोनची . आजच्या दिवशी तरी तू फोन करशील , मला शुभेच्छा देशील म्हणून सकाळपासूनच मन कासावीस असतो रे .
एकमेकांना फोन करायची पण मुभा नाही का आपल्या नात्यात.

अर्जुन - एवढी मुभा तर आहे अजून .सांगा मॅडम तुम्हाला काय हवं आमच्याकडून आज.

पायल - महिन्यातून एकदा तरी तू असल्याची जाणीव . तुझ्याकडून एकतरी मॅसेज , एकदातरी फोन करून तू बोलावे माझ्याशी . वर्षातून एकदातरी तुला डोळे भरून पाहता यावे . गावी कधी दिसल्यावर पाठ न फिरवता , चेहऱ्यावर अनोखीपणाचे भाव नकोत .

अर्जुन - नक्की , तुझी हि एक इच्छा तर मी नक्कीच पूर्ण करू शकतो .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users