शेवट! (The End Of Relationship )-भाग ४

Submitted by रिना वाढई on 3 June, 2021 - 04:59

पायल आणि अर्जुनमध्ये आता बोलणे खूप कमी झाले होते.पायललाच त्याची आठवण येऊन न राहवून ती स्वतः अर्जुनला फोन करायची.तो तिच्यापासून कितीही लांब असला तरी तिच्या मनात कायमच तो प्रथम स्थानावर होता.कधी कधी तर ती त्याच्या आठवणीत इतकी व्याकुळ होत होती , कि तिला खाणे-पिणेही जात नव्हते.सोनाली , तिची गावची मैत्रीण, तिच्यापासून हे लपलेलं नव्हतं .

सोनाली -पायल , तू अजून किती दिवस अर्जुनची अशीच वाट पाहणार आहेस.हे बघ अर्जुन तुझ्या नात्यातला असल्याने घरचे ओळखतात त्याला,तू एकदा घरी सांगून तर बघ.तुझे बाबा तुझ्यावर एवढं प्रेम करतात कि ते तुझ्यासाठी काहीही करतील.अगदी अर्जुनच्या घरच्यांशी बोलतील देखील .

पायल - काय सांगू मी सोनाली घरच्यांना, अ गं प्रेम म्हणजे फक्त मिळणेच असते का ? ते हि शक्य होत गं जर अर्जुनने कधी माझ्याबद्दल फील केलं असत तर ! पण त्याच्या मनात आता माझ्याबद्दल काहीच भावना नाहीत.घरच्यांच्या सांगण्यावरून बळजबरीने त्याच्याशी लग्न कस करू शकेल मी.तो नेहमी मला स्पेशल आहेस तू माझ्यासाठी म्हणतो.मग या स्पेशल व्यक्तीनेच त्याच्यासोबत असे वागावे ....का ? तर मी त्याच्याशिवाय नाही राहू शकणार म्हणून.

अ गं सोबत जगू नाही शकलो ना तरी चालेल मला पण त्याच्या नजरेत कुठेच कमी पडायचे नाही आहे ग मला. तो आयुष्यभर माझ्यासाठी खासच राहील, जरी माझं अस्तिव त्याच्या जीवनात नसेल तरीही .

पण त्याच्या डोळ्यात नेहमी मला काहीतरी जाणवते , ते काय आहे . तो कधीच स्पष्ट बोलत नाही. एकदा तो म्हणेल ना कि त्या भावना खोट्या नाहीत.तर आयुष्य पूर्ण होईल गं माझं .
त्या दिवसानंतर सोनालीने कधीच पायलला घरी सांगण्याचा आग्रह केला नाही.तिलाही कळले कि हि पूर्णपणे वेडी आहे ज्यात ती अर्जुनच्या सुखासाठी स्वतःच सुख दूर ढकलते .

पायलचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं,तशातच लग्नासाठी विवेकच स्थळ आलं .पायलने एक शब्द फक्त सोनालीला विचारलं ,

सोनाली माझ्याजागी तू असतीस तर या स्थळाला होकार दिला असता कि नकार .

सोनाली - नकार देण्यासारखं मलातरी या स्थळात काही दिसत नाही ग , पण तू तुझ्या मनानेच निर्णय घे .

पायल- तू होकार दिला असता ना तर ठीक आहे , मी सुद्धा तयार आहे .

पायलच्या घरच्यांनी पायलला व्यवस्थितपणे या स्थळाची माहिती दिली , खरंतर पायलचं काही लक्ष नव्हते त्यांच्या बोलण्याकडे कारण तिला , तो मुलगा काय करतो किंवा काय नाही. घर किती मोठा आहे हे जाणण्यात काही एक इंटरेस्ट नव्हता.आपण ज्याच्याशी लग्न करणार तो मुलगा अर्जुन नाही हे एकच तिच्या मनात घोळत होते.तिने घरच्यांना आपला होकार कळविला.

तरीही घरच्यांनी लग्न जोडायला एक महिन्याचा कालावधी घेतला.खरतरं तिच्याकडे तेव्हाही वेळ होता आपला निर्णय पुन्हा एकदा तपासून द्यायचा . पण जे नशिबात असेल त्याला आता समोर जायची तयारी तिने केली आणि विवेकसोबत लग्नासाठी तयार झाली.

लग्नाला ३ दिवस होते ,पायल उरलेल्या शॉपिंगसाठी सोनाली सोबत बाहेर जाणार होती . तिचा लग्न ठरल्यापासून अर्जुनशी एकदाही भेट झाली नव्हती.एकदा पायलने अर्जुनला फोन केला .

पायल - अर्जुन , लग्नाच्या आधी एकदा भेटशील मला .

अर्जुन - हो , सांग ना कुठे येऊ .

पायलने त्याला त्याच बस-स्टॉप वर यायला सांगितलं जिथे ते पहिल्यांदा भेटले होते . तिथेच पायलने आपल्या प्रेमाची प्रचिती अर्जुनला दिली होती .

अर्जुन ठरलेल्या वेळी तिथे पोहचला . सोनाली बाहेर गेली होती त्यामुळे ती जरा उशिराच त्यांना जॉईन करणार होती . पायललाही तिथे पोहचायला थोडा उशीरच झाला .

पायल - अर्जुनला पाहून ती त्याच्याकडे गेली , कधी आलास ? फार वेळ झाला का मला ?

अर्जुन- नाही गं , फक्त दोन-चार कॉफी संपवली आतापर्यंत. तो हसतच बोलला .

पायल - सॉरी रे.माझ्यामुळे तुला इतकं वाट पाहावं लागलं .

अर्जुन - असं काही नाही.

पायल - कदाचित हि शेवटची भेट असेल ना आपली ...यापुढे कधी भेटशील का रे तू मला ?म्हणजे चुकून मी दिसलेच तर ओळख तरी दाखवशील कि नाही?

तिचा हा प्रश्न अर्जुनमध्ये झालेल्या बदलांमुळे होता.पण त्यादिवशी परत तेच भाव त्याच्या डोळ्यात दिसत होते.त्याच्या मनाचा थांग घेणे इतके सोपे नव्हतेच त्यामुळे ती आता त्याला अजून तेच प्रश्न विचारणार नव्हती.लग्नाच्या आधी एकदा तिला अर्जुनला भेटून , त्याला डोळे भरून बघायचं होत . लग्नानंतर परिस्थिती कशी असेल , म्हणजे समोर त्याला कधी पाहता येईल कि नाही ? कधी तो दिसल्यावर त्याच्यासोबत बोलायला परवानगी मिळेल कि नाही हे तिला तेव्हा माहित नव्हतेचं आणि म्हणूनच एकदा त्याला भेटून , त्याला बघून आपल्या पुढच्या आयुष्याची सुरुवात करायची होती .

त्यादिवशी थोडा वेळ बोलून झाल्यावर सोनालीही आली.सोनालीने अर्जुनबद्दल फक्त ऐकलं होत , त्यादिवशी ती पहिल्यांदाच अर्जुनला प्रत्यक्षात बघत होती.

तिलाही अर्जुनच्या डोळ्यात पायलबद्दलच्या भावना सहज टिपता आल्या .

तिने पायलकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच , सगळं ठीक होईल म्हणून शास्वती दिली. अर्जुनने काहीतरी ऑर्डर करूया का विचारलं पण दोघींच्याही मनात एक वेगळाच वादळ होता.पायलने आता उशीर होतो म्हणून नाही म्हटलं आणि दोघीही शॉपिंगसाठी निघून गेल्या .अर्जुनला आपल्यामुळे होणारा त्रास पायलच्या डोळ्यात दिसून गेला.तिने लग्नाला ये असं आवर्जून म्हटलं होत.पण लग्नाला जायचं कि नाही ?हा प्रश्न अर्जुनला पडला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती पायल मूर्ख आहे >>>> अनिश्का ,तुम्हाला हि कथा आवडत आहे कि नाही, माहित नाही,परंतु तुमच्या प्रतिक्रियेवरून तुम्ही हि कथा वाचत आहात हे लक्षात आलं ,त्याबद्दल धन्यवाद !

मूर्ख नसली तर वेडी नक्कीच आहे..‌.. हे जे काही चाललंय ते सगळं एकतर्फी तरी आहे किंवा मग पायलचे केवळ इमॅजिनेशन आहे असं वाटतंय. कथेचे नाव फक्त शेवट आहे , कथेला शेवट आहे की नाही?
माफ करा पण जे वाटलं ते लिहीलं. थोडक्यात संपवलीत तर चांगली वाटेल.

कथा छान च आहे रीना , कृपया गैरसमज नसावा. पण पायल मला खरच मूर्ख वाटते आहे... प्रेम आहे तर तोंड उघडून बोल की बये असं म्हणवं वाटलं तीला...

आणि प्लीज शक्य असेल तर भाग लवकर टाकायचा प्रयत्न करा. मला माहित आहे हे तितकं सोपं नसेल. पण 2 भागांच्या मध्ये खुप कालावधी गेला की लिंक तुटते. आणि परत आधीचे भाग वाचून कढावे लागतात... पुलेशु

मूर्ख नसली तर वेडी नक्कीच आहे..‌.. हे जे काही चाललंय ते सगळं एकतर्फी तरी आहे किंवा मग पायलचे केवळ इमॅजिनेशन आहे असं वाटतंय. कथेचे नाव फक्त शेवट आहे , कथेला शेवट आहे की नाही?
माफ करा पण जे वाटलं ते लिहीलं. थोडक्यात संपवलीत तर चांगली वाटेल. भाग्यश्री१२३ >>>कथेच्या पहिल्या भागात वर्तमान काळ दाखवण्यात आलं आहे.त्यानंतरचे सगळे भाग हे पायलच्या भूतकाळाशी संबंधीत आहेत .तिला त्या नात्याचा शेवट करायचा आहे कि नाही ,करायचा असेल तर कशाप्रकारे हे सगळे द्वंद तिच्या मनात सुरु आहेत. हे या कथेतून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे . पहिल्या भागात हे सगळं अर्जुनच्या एका फोनवर अवलंबून राहणार होत....कोणत्याही गोष्टीचा शेवट हे एवढ्या सहजासहजी होत नसते,पायलच्या मनाचे खेळ चालू आहेत.एखाद्यावर एवढं प्रेम केल्यावर त्याचा शेवट करतांना काहीतरी आठवणी डोळ्यांसमोर येत असेलच ना...आणि त्यातूनच ती ठरवेल कि शेवट कसा आणि केव्हा करायचं आहे.

बाकी तुमच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !अपेक्षा करते कि पुढील भागांत हि आपला प्रतिसाद मिळेल.

कथा छान च आहे रीना , कृपया गैरसमज नसावा. पण पायल मला खरच मूर्ख वाटते आहे... प्रेम आहे तर तोंड उघडून बोल की बये असं म्हणवं वाटलं तीला...>> अनिश्का , पायल ने आपले प्रेम एकदा व्यक्त केले होते , हे हि सांगितलं आहे.अर्जुन तिच्या प्रेमाचा स्वीकार करू शकत नव्हता कारण त्याच्या काही आपल्या अडचणी असतील.

तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! पुढील भाग लवकरच .