शेवट! (The End Of Relationship )-भाग ३

Submitted by रिना वाढई on 2 June, 2021 - 06:25

आज लवकर संपले वाटते ऑफिस चे कामं,विवेक घरात येतच बोलला.

पायल-हो , आज जास्त काम नव्हते .

विवेक - ह्म्म्म म्हणून आज आल्याबरोबर चहाचा सुगंध येत आहे .

पायल - हम्म , म्हणजे मला ऑफिस चे काम जास्त असते तेव्हा चहा नाही देत मी तुम्हाला ? असं म्हणायचं आहे.पायल ने विवेक ला लूक देताच विवेक , नाही गं,असं म्हणायचं नव्हतं मला.पण रोज मी आल्यावर मग तू चहा ठेवतेस ना आणि आज बघ, मी आत येताच चहाचा सुगंध नाकात जातोय.विवेक हि थट्टा करतच बोलला.
दोघेही चहा घेतले , एरवी पायलला घरातले काम असल्याने ती सायंकाळला बाहेर फिरून येणे टाळायची.गेल्या काही दिवसांपासून मात्र ती न चुकता विवेकसोबत बाहेर फिरायला जाऊ लागली.मोकळ्या हवेत गेल्यावर मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळत होती .

संध्याकाळी फिरायला निघाल्यावर विवेकहि ऑफिस मधल्या काही गंमती जमती पायलला सांगायचा , ती हि दिवसभरात घडलेल्या गोष्टी विवेकसोबत शेअर करायची . म्हणायला नवरा-बायको असले तरीही त्यांच्यात एक घट्ट अशी मैत्री होती .

विवेक स्वभावाने गरीबच होता , त्याच्या बोलण्यात , वागण्यात कधीही कुणाला हमपणा जाणवत नव्हता . मनाने ह्ळवाचं होता तो . पायल ने हि लग्न झाल्यावर त्यालाच आपला विश्व् समजून त्यातच सुखी होती . कधी त्यांच्यात वाद व्हायचा विषयच नव्हता येत कारण वाद करण्यासाठी सुद्धा वेळ हवा असतो आणि हे दोघेही आपआपल्या ऑफिसच्या कामात मग्न असायचे . विवेकवर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या , त्यात पायलही त्याला सोबती होतीच.निस्वार्थ प्रेम करणारा नवरा आणि त्याचाच अंकुर असलेला गोंडस मुलगा यामुळे पायलही आपल्या संसारात सुखीच होती हे म्हणायला हरकत नाही.अगदी लक्झरी लाइफस्टाइल नाही तरी सगळ्या प्रकारचे भौतिक सुख विवेक देऊ शकत होता.एक चांगलं आयुष्य जगायला ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्याच होत्या .

तरीही पायल आपल्या भूतकाळाला पूर्णपणे विसरू शकत नव्हती.अर्जुन हा पायलच पहिलं प्रेम आणि आता एक चांगला मित्र आहे ,हे विवेकलाहि माहित होत.पण त्यांच्या लग्नाच्या ९ वर्षाच्या कालावधीत कधीच विवेकने तिला यावरून काही बोलले नाही.कारण त्याला आपल्या बायकोवर पूर्ण विश्वास होता.तीच प्रेम किती निस्वार्थी होत हे त्यालासुद्धा कळत होते.

जेव्हा पहिल्यांदा विवेक आणि पायलचा लग्न झाल्यावर अर्जुनचा बर्थडे आला होता,त्यादिवशी पायलच्या मनात येऊनही ती अर्जुनला फोन किंवा मॅसेज केली नव्हती .

दिवस कसातरी निघून गेला मात्र सायंकाळला जेव्हा विवेक घरी आला तेव्हा त्याच्या कुशीत शिरून ती रडू लागली.विवेकने विचारल्यावर त्याला सांगितलं कि आज अर्जुनचा बर्थडे आहे,आणि नियती बघा मी त्याला साधं एक विश सुद्धा करू शकत नाही.
त्यावेळेस विवेक तिला समजावत म्हणाला कि,तुला मी त्याच्याशी बोलायला कधीच नाही म्हणालो नाही आहे.तुमचं नातं समोर टिकलं असतं तर कदाचित मी नसतो तुझ्या जीवनात,पण मी आलो म्हणून तुमच्या मैत्रीला तुटावं लागेल असं काही नाही.तुम्ही दोघेही समजदार आहात,दोघांनाही तुमच्या मर्यादा माहित आहेत,त्यामुळे मी कधीही तुमच्यावर अविश्वास दाखवणार नाही.तू त्याला आजही फोन करून बर्थडे विश करू शकतेस.

त्याच्या अशा बोलण्याने पुन्हा एकदा पायल विवेकच्या प्रेमात पडली होती.

जेव्हा दोन जीव एकमेकांवर प्रेम करतात आणि काही कारणाने त्यांचे नाते समोर नाही जाऊ शकत .पण ते दोघेही एकमेकांना विसरू शकतात का ?
लग्न झाल्यावरही आपण आपल्या आयुष्यात कित्येक जणांना स्थान देत असतो,कितीतरी नवीन नाती जोडली जातात . प्रियकर -प्रेयसी सोडून कितीतरी नव-नवीन मित्र आपल्या आयुष्यात येत असतात.अगदी रक्ताच्या नात्यापेक्षाही जिवलग नात्यांचे बंध जुळतात.मग ज्या व्यक्तीला आपण कधीतरी आपल्या आयुष्यात सर्वात प्रथम स्थानावर ठेवलो होतो,अगदी त्याला ओळखही न दाखवावी लग्नानंतर .....असे का ?

ते दोघे सुद्धा एकमेकांचे तेवढेच घट्ट मित्र म्हणून नाही राहू शकत का? शरीर सुखाच्या पलीकडेही एक मानसिक सुख असते. प्रेमातही असतांना जर सुखाची व्याख्या फक्त शरीर सुख असेल तर ते केवळ एक वासना असेल , नाही का.....?

लग्नाआधी पायलने आपले प्रेम अर्जुनसमोर व्यक्त केले मात्र त्यावेळी अर्जुनचे ध्येय काही वेगळे होते. त्याला स्वतःला काहीतरी करायचं होत,म्हणून तो स्वतःला कधी प्रेमाच्या नात्यात गुंतवू शकला नाही. प्रेम तर खूप निरागस भावना आहे,पायलनेही अर्जुनवर केवळ निरागस प्रेमच केलं होत.त्याच्या जवळ असण्यानेच तिला एक मानसिक समाधान मिळत होते,जे शरीर सुखाच्या पलीकडे कितीतरी श्रेष्ठ स्थानावर होते.तो नेहमीच तिच्या दूर होता,पण कधीही तिला तो दुरावा एवढा मोठा वाटला नव्हता कि त्याला विसरून त्याचे स्थान दुसऱ्या कुणाला तरी द्यावे.

प्रेमाच्या नात्यात नाही मात्र मैत्रीच्या नात्यात ते बांधले गेले होते.अशेच २-३ वर्ष झाले,ती आपल्या कॉलेज लाईफ मध्ये आणि तो आपल्या जॉब मध्ये खुश होता.दोघेही एकमेकांपासून दूर होते,पण पायलला तो मनाने कधीच दूर जाणवला नाही .

पायल जेव्हाही अर्जुनला भेटायची, तेव्हा तिला त्याच्या नजरेत स्वतःसाठी त्याच भावना दिसायच्या... ज्या तिच्या मनात अर्जुनबद्दल होत्या.त्यामुळे आज ना उद्या तो आपलं ध्येय गाठल्यावर आपल्याला नक्कीच स्वीकारेल या गोड भ्रमातच ती होती.अर्जुन तिला नेहमी म्हणायचा.."पायल, तू माझ्यासाठी स्पेशल आहेस आणि नेहमी राहशील ."

त्याच्या या एका वाक्यातच पायलला जगातला सगळा आनंद मिळत होता,त्यामुळे नंतर कधी तिने अर्जुनला आपल्या भावना व्यक्त करायला आग्रह केला नाही. अर्जुन जेव्हा कधी गावी यायचा तेव्हा तो पायलला भेटल्याशिवाय जात नव्हता .

अशेच काही दिवस गेले.अर्जुनने फक्त एकदाच पायलला स्वतःच्या प्रेमाची कबुली दिली होती,त्यानंतर मात्र तो आपल्याला त्याच्यात गुंतायला नको म्हणून स्वतःला दूर करत होता.पायलच्या भावना त्याच्यापासून कधीच लपलेल्या नव्हत्या,मात्र तो त्यांनतर कधीच व्यक्त होत नव्हता .

एके दिवशी अर्जुन फोनवर बोलतांना पायलला म्हणाला,"पायल,दूर राहून कोणी प्रेम करू शकते का ग ?"

त्याच्या या प्रश्नाने पायलही थोडी गोंधळली,तिला वाटले अर्जुनने असे का विचारले असेल ? त्याला माझ्यावर विश्वास नाही आहे का? त्यावेळेस तिने त्याला आपल्या प्रेमाची प्रचितीही करून दिली.पण अर्जुनच्या मनात काय चाललं हे तिला जाणता आले नाही.अर्जुनने तेव्हा एक वाक्य बोललं होत,कि पायल आपण नेहमीच एक चांगले मित्र म्हणून राहू . आयुष्यभर तू माझ्यासाठी स्पेशल राहशील , मात्र मैत्रीच्या पलीकडे आपल्यात काही असू शकणार नाही.

त्या रात्री पायलला कळत नव्हते कि अर्जुन असा का बोलतोय ? मी तर कधी त्याला लग्नासाठी फोर्स नाहीच करणार , आणि ज्यावेळेस पहिल्यांदा मी त्याला माझं प्रेम कॉन्फेस केली होती तेव्हासुद्धा त्याचा एक प्रश्न होता , "प्रेम केल्यावर लग्न नाही झालं तर ....?" त्यावेळेसही मी त्याला बोलले होते कि आपल्या घरच्यांना मान्य असेल तरच आपलं लग्न होईल.

कारण कोणावर कितीही प्रेम केलं तरी घरच्यांच्या विरोधात जाणे तिला पटले नसते . आणि आपल्यामुळे अर्जुनने असे काही करावे ,हे तिला कधीच मान्य नव्हते. ती रात्र तिच्यासाठी खूप वेगळी होती, मनात नको-नको ते विचार येत होते . अर्जुन दूर आहे म्हणून तो आपल्यावर प्रेम नाही करू शकत ...? दूर असल्याने एखाद्याबद्दलचे भावना बदलतात का? मग माझ्या मनातल्या भावना का कमी होत नाहीत ...?पिंकी म्हणते तस कोणी दुसरी व्यक्ती तर नसेल आली ना त्याच्या जीवनात ...?

असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते . डायरी घेऊन तिने अजून अर्जुनचे शब्द वाचले ,

"किती छान लिहितोस रे तू जीवनाबद्दल ", काश आपण रेखाटलेले शब्दच आपली नियती बनली असती तर!!!!! त्याच्याच विचारात ती झोपी गेली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

त्यांनतर न जाणो कुणाची नजर लागली असेल त्यांच्या नात्याला पण त्यांच्यात आता आधीसारखे बोलणे होत नव्हते . पायलही ग्रॅजुएशन साठी शहरात गेली,त्यामुळे अर्जुनला भेटणेही होत नव्हते.सणासुदीला कधी दोघे गावी गेले तर पायल अर्जुनला फोन करायची,तो हि तिला न टाळता भेटत होता.त्याला भेटण्यासाठी तिच्या हृदयाची धडधड कधी कमी झाली नव्हती,पण तो आता बदलला होता.त्याच्या वागण्यातून पायलला हे सहज जाणवले .

पायलने कधीच अर्जुनकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा केली नव्हती,पण त्याच आपल्याबद्दल वागणं बदलावं असंही कधी तिला वाटलं नव्हतं .

आधी गावी आला कि वेळ कमी असली तरी न चुकता तिला भेटायचा ,त्या भेटीसाठी वेळेची काहीच मर्यादा नव्हती . दिवस असो नाहीतर रात्रीचे १० वाजले असो,तिच्या घरी जाऊन समोरच्या अंगणात खुर्चीवर बसून चंद्राचे निरीक्षण करायला कधीच त्याच्या मनाने कच खाल्ले नव्हते मात्र आता त्याला दिवसाही आपण बोलत असलो कि कुणी काय म्हणेल याची भीती वाटत होती.पायलला जे समजायचं होत ती समजून गेली.२ वर्ष झाले असतील ,अर्जुनच्या बहिणीचं लग्न होत.त्याची बहीण पायलची मैत्रीण असल्यामुळे पायलही लग्नाला जाणार होती.ऐनवेळी तिचा शेवटचा पेपर लग्नाच्या आदल्या दिवशी होता. त्यामुळे ती लग्नाला पोहचू शकेल कि नाही याची शंका होती.लग्नाच्या दिवशी सकाळीच उठून तिने आपली पॅकिंग केली आणि ४-५ घंट्याचा प्रवास करून आधी ती घरी गेली .

एवढ्या दिवसांनी ती घरी आल्यामुळे घरच्यांनाही आनंद झाला होता , पण आल्याआल्याच ती लग्नाला जायची तयारी करत असल्याने घरच्यांनी तिला , तू आराम कर , लग्नाला कोणीही एकजण गेलं तरी चालेल म्हणून म्हणत होते.ती त्यांचे शब्द फक्त ऐकत होती , पण तिच्या हृदयापर्यंत त्यांचे शब्द पोहचू शकले नाही.कारण ती अर्जुनला चक्क १-२ वर्षांनी बघणार होती . त्यामुळे तिला प्रवासाचा असो कि कुठल्याही गोष्टीचा थकवा जाणवत नव्हता.तयारी करून ती लग्नाला पोहचली . वरातीकडून आलेल्या पाहुण्यांमध्ये तिचा एक कॉलेज चा मित्र होता,त्यामुळे त्या लग्नात तिला एकटेपणा जाणवला नाही . जाणूनबुजून ती अर्जुनसोबत बोलायला जात नव्हती,कुठेतरी तिचे गट फीलिंग्स सांगत होते कि येईल तो तुझ्या जवळ आणि बोलेल स्वतःहून.लग्न आटोपले , ती हि आता घरी जायच्या तयारीत होती आणि त्याक्षणी अर्जुन आला तिच्यासमोर.

अर्जुन - पायल, कधी आलीस लग्नात ?

पायल - थोडा वेळ झाला असेल .

अर्जुन - हो , थोड्यावेळापूर्वी दिसली होतीस , मग नंतर कुठे गायब झालीस कि दिसलीच नाही .

पायल - माझा एक मित्र पण आला आहे , सो त्याच्यासोबत एका रिलेटिव्ह च्या घरी गेले होते , खूप दिवसांनी आली इथे तर म्हटलं भेटून यावं त्यांना.

पायल त्या मित्राबद्दल जाणूनच अर्जुनला सांगत होती कि जेणेकरून अर्जुनला थोडी जळण होईल .

थोड्याप्रमाणात अर्जुनच्या मनात जेलस वाटलंहि पण तो तस रिऍक्ट करेल तर अर्जुन कसला ...

आपसूकच बोलून झाल्यावर पायल घरी गेली .
इकडे अर्जुनच्या मनात थोड्यावेळासाठी काही विचार आले देखील कि पायल किती बदलली आता, आणि तो मुलगा सारखा तिच्या मागे पुढे करत होता...फक्त मित्रच आहे म्हणाली...खरचं फक्त मित्र असेल काय? अशी कशी ती कोणत्याही मुलासोबत फिरू शकते...जाऊ दे शेवटी तीच आयुष्य आहे , कस जगायचं हे तीच ठरवणार . मी कशाला उगाच तिचा विचार करू .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users