Crocodile Park Chennai

Submitted by जो on 20 May, 2009 - 03:43

मला मगर नावाचा प्राणी तसा फारसा आवडत नाही. लहानपणी कुठेतरी मगरेने माणसाला खाल्ले म्हणुन ऐकले होते त्यामुळे मला या प्राण्याबद्दल अतिशय धास्ती होती.आणि म्हणुनच मी Crocodile Park बघण्याकरिता अजिबात उत्सुक नव्हते.
लोकाग्रहास्तव मला Crocodile Park मध्ये जाणे भाग पडले आणि या अतिशय सुस्त प्राण्याबद्दल बरिचशी उपयुक्त अशी माहिती मिळाली. 7000 विविध प्राण्यांचं घर असलेल्या या मगर पेढीत कासव, करकोचे, विविध प्रकारच्या देशी विदेशी मगरींचा समावेश आहे.
ही मगर पेढी भारतातील एकमेव पेढी आहे. इथे मगरींसोबत किंग कोब्रा, पाण्यातील आणि जमिनीवरील कासव इ. चे breeding आणि संगोपन केल्या जाते.. पुढील काही प्रकाशचित्रे तिथली....

.P1030309.jpg

स्वस्थ पहुडलेल्या मगरी...

P1030314.jpg

मगर कुठे आहे? (the beauty of camouflaging)

P1030315.jpg

प्रतिबिंबं...

P1030330.jpg

कासव

P1030333.jpg

Camouflaging (मराठी शब्द सुचवा)

P1030319.jpg

मोठ्ठीजात जांभई...:)

P1030345.jpg

बका ऐशा ढोंगे....

P1030348.jpg

गुलमोहर: 

कुरूप प्राण्याचे फोटो सु-रूप आहेत.

आपल्या आवडण्यानावडण्याने त्यांना काय फरक पडतो?

कदाचित त्यांना सुद्धा आपण आवडत नसू.

पण हे प्राणी धारिष्ट्यवान असणारच. उगाच का त्यांनी जलचर राहण्यापेक्षा उभयचर होणे पसंद केले?

नंतर मग पक्षी जगताने तर पृथ्वी सुद्धा सोडून आकाशात भरारी घेण्याचे धारिष्ट्य केले.

बहुधा 'अ‍ॅलीगेटर' प्रकारचे प्राणी माणसांना खातात / खाउ शकतात.

मगरींबद्दल माहिती नाही. चु.भु.दे.घे.

" प्रतीबिंब " विशेष आवडला.

धन्यवाद !

छान ... विशेष करुन कासव, प्रतीबिंब छानच Happy

>>>> Camouflaging (मराठी शब्द सुचवा)
छद्मावेष हा शब्द चालू शकेल असे वाटते! Happy
बाकी फोटो मस्तच!
मगर अन सूसर यात फरक काय काय असतो? दोन्हीची इन्ग्रजी नावे काय?
सूसर मला वाटते की नर्मदे मधे आढळते
अन्यथा भारतात नैसर्गिकरित्या मगरी अन सुसरी कुठे आढळतात?

अरे मस्त आहेत फोटो.......... पण हे चेन्नईला कुठे आहे ?
माझी बहिण आहे चेन्नईला तिल पण सांगतो.....
----------------------------------
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या गम है जिसको छुपा रहे हो.

लिंबूटिंबू जी माझ्या माहिती प्रमाणे फरक -
Corodile, Gharial and Alligator मधला फरक त्यांच्या तोंडाच्या रचनेवरून लगेच कळून येतो.

Alligator -
alligator.jpg

मगर - इंग्रजी नाव crocodile. Alligator पेक्षा तोंड लहान. माणसांना खातात
crocodile.jpg

सुसर - इंग्रजी नाव gharial. हे बहुतेक हिंदी नावावरून आलाय कारण हा प्राणी फक्त इंडियन
सबकाँटिनेट मधे सापडतो. तोंड खुपच लांब आणि निमुळते. माणसांना खात नाहीत.
gharial.jpg

सही !

पहिला फोटो आणि प्रतिबिंब ...अगदी मस्त ! Happy

छान फोटो.
एकीचा चेहेरा ओळखीचा दिस्तोय. आमच्याइकडून गेल्यासारखी वाट्टेय. Happy

फोटो चंगले आहेत. सिंगापूरच्या क्रॉकोडाईल पार्कची आठवण आली.

सहीच, "सुप्रभात" माहितीबद्दल धन्यवाद Happy

***********************************
मनामधली कविता घेऊन, कागद माझा उडतो आहे,
उतरेल त्याच प्रदेशात, चंद्र जेथे बुडतो आहे !!

सुप्रभात, माहितीबद्दल धन्यवाद! Happy
सुसरीचे तोन्ड लाम्बीला जास्त व निमुळते होत जाते तर मगरीचे कमी लाम्बीचे व रुन्द जबड्याचे अस्ते! Happy
अलिगेटर ला देखिल मराठीत "मगरच" म्हणायला हवे ना?
निदान मला तरी मगर अन सुसर हे दोनच प्रकार माहीत आहेत मराठीत! Happy

<<<मगर - इंग्रजी नाव crocodile. Alligator पेक्षा तोंड लहान. माणसांना खा>>>
माहिती बद्दल धन्यवाद!
म्हणतात ना " घोडा, घास से दोस्ती करेगा, तो खायेगा क्या?"
तसेच " मगर, माणुस से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?"

घ--घ, म--म शून्य गूण जुळतात बहुतेक.

मस्त माहिती आणि छायाचित्र.
सुप्रभात- आपलेही रोचक माहितीसाठी धन्यवाद.

आपल्याकडे अलिगेटर सापडत नाहीत. त्यांचे वास्तव्य फक्त अमेरिका आणि चीन मधेच.
अलिगेटरला मराठीत काय म्हणतात ते मलाही नाही माहित. आपण मगरच म्हणू. Happy

संतोष - Proud
पूर्वीच्या काळी इजिप्त मधे लोक पूजा करायचे मगरीची.
मधे बातमी होती की कोणत्या तरी देशातले लोक मगरी असलेल्य नदीमधे आंघोळ/डुबकी मारतात. त्यांचा विश्वास आहे की अस केल्याने मगरींचा आशिर्वाद मिळतो.

हो...आपल्याला आशिर्वाद!! आणि मगरींना देवाचा प्रसाद...(माणसाच्या रुपात) ;)....

सगळ्यांचेच मनापासुन आभार.....प्रतिसादांकरिता....

विनयजी...हे पार्क East Coast Road (ECR) वर आहे...महाबलीपुरम ला जातांना लागतं.....