नुकत्याच आलेल्या अनुभवावरून सांगते: हे इन्जेक्शन सध्या सरकारी कन्ट्रोल मधे आहे. कुठेही प्रायव्हेट रीटेलर, फारमसिस्ट ना विकायला उपलब्ध नाही. भरपूर ओळखी वगैरे काढून ते काहीही करून मिळवण्याचा डेस्परेट प्रयत्न करून झाला, पण सगळ्या प्रयत्नांनंतर असे कळले की ते इन्जेक्शन मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हॉस्पिटल ने किंवा तुम्ही पेशन्ट ची नोन्द कलेक्टर ऑफिस मध्य करणे आणि कलेक्टर ऑफिस तर्फे त्या पेशन्ट च्या नावाने थेट त्या हॉस्पिटल ला ती इन्जेक्शन पाठवली जातात. तीही लागत असलेली सगळी मिळत नाहीत तर हळू हळू एक डोस एका वेळी अशी मिळत आहेत. पण हाच खात्रीशीर मार्ग आहे. थोडा स्लो वाटला तरी निदान मिळतात तरी. एखाद दोन डोसेस नंतर सुद्धा फंगस ग्रोथ स्लो डाउन व्हायला मदत नक्कीच होते (असे डॉक्टर्स नी सांगितले होते).
तुमच्या पेशन्ट ला लवकर बरे होण्यासाठी बेस्ट लक!
हो कलेक्टर ऑफिस तुम्हाला डायरेक्ट डोस हातात देत नाही. हॉस्पिटल ला पाठवतात. हॉस्पिटल ने त्यांच्य लिस्ट मधे कलेक्टर ऑफिस ला कळवले आहे का आणि त्यात पेशन्ट चे नाव आहे ना एवढे जमवता /विचारता येईल का?
ते असेल तर होपफुली मिळेल डोस तुम्हाला १-२ दिवसात का होईना. सगळ्या गावात, शहरात सध्या हीच सिस्टिम आहे. कुठेही कितीही ओळखी काढल्या तरी सगळीकडून हेच उत्तर येते आहे. तुम्हाला घाबरवण्याचा हेतू नाही पण अनुभवावरून सांगते की आपण आपल्या प्रियजनांसाठी काहीही करायला तयार होतो, जी मिळेल ती ओळख काढून कुठेही जाऊन ते औषध मिळवण्याचा प्रयत्न करतो साहजिकच. पण होते काय की याला मनुष्यबळ लागते, वेळ घालावा लागतो आणि हे सगळे प्रयत्न प्रचंड मेन्टली एक्झॉस्टिंग होतात. यानंतर सुद्धा ते औषध सरकारी यंत्रणेतूनच मिळेल हेच उत्तर मिळते. त्यामुळे सरकारी व्यवस्थेवरच तुमचा फोकस ठेवा एवढा सल्ला देईन. इतर ठिकाणाहून फक्त टाइम वेस्ट होतो आहे.
आपल्या रुग्णाचे आडनाव अ या अक्षारावरून सुरू होत असल्यास इंजेक्शनसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.
हॉस्पिटल रोज फॉर्म पाठवत आहे की नाही, याची कृपया खातरजमा करा.
आपला रुग्ण वेगळा असल्यास मला तपशील 9970842405 या क्रमांकावर मेसेज करा.
आपणास परिजनवियोगाचे दु:ख सहन करण्याची शक्ती लाभो..
अन खरं सांगू? @ धागाकर्ते.
या परिस्थितीत जर वाचले असते, तर पुढे काय होते ते अधिक वाईट अन केविलवाणे ठरते. त्या यातनांतून सुटले म्हणा अन विठ्ठलचरणी लीन झाले म्हणा..
**
लोकहो, हा प्रतिसाद अॅम्फोटेरेसिन बी शोधणार्या लोकांसाठी.
पहिला प्रतिसाद बरोबर होता. बाजारात हे इन्जेक्शन विकत घेणे शक्य नाही, कलेक्टर ऑफिसकडून कोटा प्रत्येक दवाखान्यास दिला जातो.
**
लोकहो, सगळ्यात आधी ते काढे ढोसणे अन अती वाफ घेणे बंद करा. म्युकर पेक्षा जास्त अॅस्परजिलस उर्फ पांढरी बुरशी जास्त आढळते आहे सध्या.
सर्दी, नाक बंद होणे, चावताना दात दुखणे, हे करोना होऊन गेल्या नंतर होत असेल, करोना झालेला असताना ऑक्सीजन प्लस खूप अधिक मेथिल प्रेडनिसोलोन दिले गेले असेल, डायबेटीस असेल, तर आधी डेन्टीस्ट्/नाक-कान-घसा तज्ञांना दाखवा. डोळ्यात/मेंदूत आजार पोहोचेपर्यंत बराच उशीर झालेला असतो.
ता.क. फक्त नाकात्/सायनसमधे बुरशी असेल तर 'FESS' नामक ऑपरेशन करून, जागेवर अॅम्फोटेरेसिन जेल लावून बराच उपचार होऊन जातो. तेव्हा वरील लक्षणे लक्षात घ्या. अन योग्य सल्ला घ्या. नाक किमान ६ तास 'बन्द' हवे. अधून मधून नॉर्मली १५-२० मिनिटे बंद होते..
काळजी घ्या, अंगावर आजार काढू नका. काढे, पुड्या, आयुष उपचार प्लीज करू नका. हा आजार जीव घेतो, पण त्या आधी घरदार धुवून नेतो. त्याला आम्ही काही करू शकत नाही. अॅम्फोटेरेसीन बी ची नॉर्मल किम्मत, एक कोर्स, हा आजार बळावण्याआधी किमान ५ लाख रुपये होती... काळजी घ्या.
आरारा, वाफेचे कळले, काढे घ्यायला काय प्रॉब्लेम आहे(म्हणजे मनातला प्रश्न: मग गरम चहा कॉफी घेण्यात पण धोका आहे का?)
जेन्यूईन प्रश्न विचारतेय.
आम्ही कधीकधी रात्री जिरे भिजवून सकाळी जिरे दालचिनी मीठ असा काढा पितो चहा ऐवजी.
धाग्यातील दु:खद बातमीशी सुसंगत नाही पण तरीही प्रतिसाद देणे क्रमप्राप्त आहे, म्हणून.
नाकाशी आजूबाजूच्या हाडातील पोकळ्या उर्फ सायनसेस जोडलेल्या असतात. यात म्युकोसा उर्फ तोंडाच्या आत असते तश्या ओल्या त्वचेचे आवरण असते, ज्याचे मूळ काम नाकातून घशात जाणारी हवा बॉडी टेंपरेचरला आणणे प्लस त्यातील जंतू, तंतू त्यातून स्रावलेल्या म्युकस नामक चिकट स्त्रावात अडकवून पोटातल्या अॅसिडमधे ढकलणे हे असते. ही निसर्गाची उत्सर्जनक्रीया आहे. सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम.
वाफ तुमच्या सायनसमधे जाऊन म्युकस पातळ करू शकते, अन तितकेच करू शकते. हे अधुन मधून सर्दीसाठी केलेले फायदेशीर आहे. म्युकस पुढे ढकलण्यासाठी त्या ओल्या त्वचेवर खूप छोट्या सिलिया नामक बोटासारख्या 'वस्तू' असतात.
पण करोना म्हणून विनाकारण अती गरम वाफ अन तीही रोज खूप लोक घेताहेत. आपल्याला सहन होईल त्या तापमानाच्या वाफेने करोना विषाणूंचे काहीही वाकडे होत नाही, पण सायनसमधील ह्युमिडीटी वाढते, अन रिपिटेड गरम तापमानाने म्युकोसा/उर्फ श्लेष्मल त्वचेच्या 'सिलिया' उर्फ पेशिंच्या वरचे उल्लुसे हात, जे ही म्युकस पोटाकडे ढकलत असतात, त्या डॅमेज होतात. सो म्युकस चा निचरा होत नाही.
आता म्युकस बेसिकली कार्बोहायड्रेट आहेत. जे बुरशीचे अन्न आहे. -> ही म्युकस पुढे ढकलली जाण्याची क्रिया तुम्ही अती वाफेने डॅमेज केली आहे. -> प्लस वाफ घेऊन सायनस मधे दमट वातावरण आहे. आता इथे बुरशी वाढणारच आहे.
याउपर तुम्ही करोनामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती गमावून बसला आहात, प्लस सायटोकायनीन स्टॉर्ममुळे तुमचा जीव जावू नये म्हणुन डॉक्टरांनी तुम्हाला स्टिरॉईड्स दिलेले आहेत, प्लस डायबेटीस. आता पुढे काय होईल?
सो,
वाफ.
नको.
प्लीजच. नो घरगुती उपचार. दोन्ही हात जोडून नको.
**
आता काढा.
या सगळ्या काढा प्रकरणात जे काय मसाले आहेत त्याने अॅसिडिटी वाढते. मग आपण काय करतो?
अँटासिड खातो.
मग काय होते?
तुमची म्युकोसा जे काय जंतू तंतू जठरात ढकलते, जिथे ते हायड्रोक्लोरिक अॅसिडमधे तडफडून मेले पाहिजेत, ते आनंदात तरंगत.. तरंगत.. पुढे जातात, जिथे पचनसंस्थेतील कण रक्तात खेचून घेणे नॉर्मल अस्ते...
जौद्या. इथे फिजॉलॉजी वगैरे शिकवायची जागा नाही, पण काये ना, आजकाल नुस्तं डॉक्टरने सांगितलं म्हणुन विश्वास ठेवण्यापेक्शा लोक गूगलवर ''रिसर्च" वगैरे करतात, प्लस, व्हॉट्सॅप युनिवर्सिटीच्या पदव्युत्तर डिग्र्याही असतात.
सो.
**
पुन्हा एकदा, एकुलता एक डॉन क्षमस्व, तुमच्या दु:खाच्या प्रसंगी इथे बडबडतो आहे.
आ.रा.रा. : तुम्ही अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली आहेत. ही माहिती परिचित लोकांना मायबोलीवरील एका क्वालिफाईड आणि अनुभवी डॉक्टरांनी (तुमचे खरे नाव माहिती नाही म्हणून) दिलेली माहिती म्हणून फॉरवर्ड करू का?
आता तशी लांबची मावशी पण जवळची होती
Submitted by एकुलता एक डॉन on 9 June, 2021 - 00:03 >>>>
आपली माणसं नजरेसमोर हवीत म्हणून हालात जगण्यापेक्षा, झालं ते 'त्यांच्यासाठी योग्य' म्हणावं.
आपल्या हातात फक्त प्रयत्न आणि प्रार्थना असतात. ते तुम्ही केलेत. सावरा, स्वतःलाही आणि त्यांच्या कुटुंबालाही.
Submitted by MazeMan on 9 June, 2021 - 09:41
<<
मायबोलीवर तोडलेले तारे अन उधळलेली विचारमौक्तिके, लोकार्पण आहेत, त्यावर माझा कोणताही कॉपीराईट नाही. बिनधास्त फॉर्वर्ड करा. टोपणनावाचा मूळ उद्देश नावावर टोपण घालणे हा आहे, तेव्हा टोपणनावच वापरा. धन्यवाद.
लोकहो, मित्रहो, मैत्रिणींनो. प्लीज, माझ्या प्रतिसादाचा उल्लेख इथे करून आभार वगैरे मानू नका. हा त्यांचा धागा आहे, शोकसंदेश आहे. सो.. _/|\_
नुकत्याच आलेल्या अनुभवावरून
नुकत्याच आलेल्या अनुभवावरून सांगते: हे इन्जेक्शन सध्या सरकारी कन्ट्रोल मधे आहे. कुठेही प्रायव्हेट रीटेलर, फारमसिस्ट ना विकायला उपलब्ध नाही. भरपूर ओळखी वगैरे काढून ते काहीही करून मिळवण्याचा डेस्परेट प्रयत्न करून झाला, पण सगळ्या प्रयत्नांनंतर असे कळले की ते इन्जेक्शन मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हॉस्पिटल ने किंवा तुम्ही पेशन्ट ची नोन्द कलेक्टर ऑफिस मध्य करणे आणि कलेक्टर ऑफिस तर्फे त्या पेशन्ट च्या नावाने थेट त्या हॉस्पिटल ला ती इन्जेक्शन पाठवली जातात. तीही लागत असलेली सगळी मिळत नाहीत तर हळू हळू एक डोस एका वेळी अशी मिळत आहेत. पण हाच खात्रीशीर मार्ग आहे. थोडा स्लो वाटला तरी निदान मिळतात तरी. एखाद दोन डोसेस नंतर सुद्धा फंगस ग्रोथ स्लो डाउन व्हायला मदत नक्कीच होते (असे डॉक्टर्स नी सांगितले होते).
तुमच्या पेशन्ट ला लवकर बरे होण्यासाठी बेस्ट लक!
तुम्हाला लवकर ही लस मिळो हीच
तुम्हाला लवकर ही लस मिळो हीच सदिच्छा
कलेक्टर ऑफिस मध्ये काल
कलेक्टर ऑफिस मध्ये काल सकाळीच जाऊन आले ,स्वतः एक्स सरकारी ऑफिसर असून पण परवानगी मिळली नाही ,तुटवडा आहे
सरकारी व्यवस्था आहे
सरकारी व्यवस्था आहे
सरकारी व्यवस्था आहे नाही
सरकारी व्यवस्था आहे
नाही
हो कलेक्टर ऑफिस तुम्हाला
हो कलेक्टर ऑफिस तुम्हाला डायरेक्ट डोस हातात देत नाही. हॉस्पिटल ला पाठवतात. हॉस्पिटल ने त्यांच्य लिस्ट मधे कलेक्टर ऑफिस ला कळवले आहे का आणि त्यात पेशन्ट चे नाव आहे ना एवढे जमवता /विचारता येईल का?
ते असेल तर होपफुली मिळेल डोस तुम्हाला १-२ दिवसात का होईना. सगळ्या गावात, शहरात सध्या हीच सिस्टिम आहे. कुठेही कितीही ओळखी काढल्या तरी सगळीकडून हेच उत्तर येते आहे. तुम्हाला घाबरवण्याचा हेतू नाही पण अनुभवावरून सांगते की आपण आपल्या प्रियजनांसाठी काहीही करायला तयार होतो, जी मिळेल ती ओळख काढून कुठेही जाऊन ते औषध मिळवण्याचा प्रयत्न करतो साहजिकच. पण होते काय की याला मनुष्यबळ लागते, वेळ घालावा लागतो आणि हे सगळे प्रयत्न प्रचंड मेन्टली एक्झॉस्टिंग होतात. यानंतर सुद्धा ते औषध सरकारी यंत्रणेतूनच मिळेल हेच उत्तर मिळते. त्यामुळे सरकारी व्यवस्थेवरच तुमचा फोकस ठेवा एवढा सल्ला देईन. इतर ठिकाणाहून फक्त टाइम वेस्ट होतो आहे.
आपल्या रुग्णाचे आडनाव अ या
आपल्या रुग्णाचे आडनाव अ या अक्षारावरून सुरू होत असल्यास इंजेक्शनसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.
हॉस्पिटल रोज फॉर्म पाठवत आहे की नाही, याची कृपया खातरजमा करा.
आपला रुग्ण वेगळा असल्यास मला तपशील 9970842405 या क्रमांकावर मेसेज करा.
क पासुन आडनाव आहे
क पासुन आडनाव आहे
मैत्रेयी जी - छान माहिती
मैत्रेयी जी - छान माहिती दिलीत.
धन्यवाद चिनूक्स
धन्यवाद चिनूक्स
पेशंट गेले
पेशंट गेले
चिनुक्स यांनी खूप मदत केली धन्यवाद
ओह सॉरी डॉन.
ओह सॉरी डॉन.
इतकी मदत उपयोगी पडायला हवी होती.
सर्व परीवाराला हे दु:ख सहन करण्याचं बळ मिळो.
इतकी मदत उपयोगी पडायला हवी
इतकी मदत उपयोगी पडायला हवी होती.
सर्व परीवाराला हे दु:ख सहन करण्याचं बळ मिळो.......+1.
व्हेरी सॉरी टु हिअर! तुम्ही
व्हेरी सॉरी टु हिअर!
तुम्ही आणि परिवाराला दु:खातून सावरण्याचे बळ मिळो ही सदिच्छा!
व्हेरी सॉरी टु हिअर! Sad
व्हेरी सॉरी टु हिअर! Sad तुम्ही आणि परिवाराला दु:खातून सावरण्याचे बळ मिळो ही सदिच्छा! +1
आपणास परिजनवियोगाचे दु:ख सहन
आपणास परिजनवियोगाचे दु:ख सहन करण्याची शक्ती लाभो..
अन खरं सांगू? @ धागाकर्ते.
या परिस्थितीत जर वाचले असते, तर पुढे काय होते ते अधिक वाईट अन केविलवाणे ठरते. त्या यातनांतून सुटले म्हणा अन विठ्ठलचरणी लीन झाले म्हणा..
**
लोकहो, हा प्रतिसाद अॅम्फोटेरेसिन बी शोधणार्या लोकांसाठी.
पहिला प्रतिसाद बरोबर होता. बाजारात हे इन्जेक्शन विकत घेणे शक्य नाही, कलेक्टर ऑफिसकडून कोटा प्रत्येक दवाखान्यास दिला जातो.
**
लोकहो, सगळ्यात आधी ते काढे ढोसणे अन अती वाफ घेणे बंद करा. म्युकर पेक्षा जास्त अॅस्परजिलस उर्फ पांढरी बुरशी जास्त आढळते आहे सध्या.
सर्दी, नाक बंद होणे, चावताना दात दुखणे, हे करोना होऊन गेल्या नंतर होत असेल, करोना झालेला असताना ऑक्सीजन प्लस खूप अधिक मेथिल प्रेडनिसोलोन दिले गेले असेल, डायबेटीस असेल, तर आधी डेन्टीस्ट्/नाक-कान-घसा तज्ञांना दाखवा. डोळ्यात/मेंदूत आजार पोहोचेपर्यंत बराच उशीर झालेला असतो.
ता.क. फक्त नाकात्/सायनसमधे बुरशी असेल तर 'FESS' नामक ऑपरेशन करून, जागेवर अॅम्फोटेरेसिन जेल लावून बराच उपचार होऊन जातो. तेव्हा वरील लक्षणे लक्षात घ्या. अन योग्य सल्ला घ्या. नाक किमान ६ तास 'बन्द' हवे. अधून मधून नॉर्मली १५-२० मिनिटे बंद होते..
काळजी घ्या, अंगावर आजार काढू नका. काढे, पुड्या, आयुष उपचार प्लीज करू नका. हा आजार जीव घेतो, पण त्या आधी घरदार धुवून नेतो. त्याला आम्ही काही करू शकत नाही. अॅम्फोटेरेसीन बी ची नॉर्मल किम्मत, एक कोर्स, हा आजार बळावण्याआधी किमान ५ लाख रुपये होती... काळजी घ्या.
अरेरे.
अरेरे.
सर्व कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याचं बळ मिळो.
ह्या दुःखद प्रसंगातही सर्वांनी काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करू नका.
आरारा, वाफेचे कळले, काढे
आरारा, वाफेचे कळले, काढे घ्यायला काय प्रॉब्लेम आहे(म्हणजे मनातला प्रश्न: मग गरम चहा कॉफी घेण्यात पण धोका आहे का?)
जेन्यूईन प्रश्न विचारतेय.
आम्ही कधीकधी रात्री जिरे भिजवून सकाळी जिरे दालचिनी मीठ असा काढा पितो चहा ऐवजी.
धाग्यातील दु:खद बातमीशी
धाग्यातील दु:खद बातमीशी सुसंगत नाही पण तरीही प्रतिसाद देणे क्रमप्राप्त आहे, म्हणून.
नाकाशी आजूबाजूच्या हाडातील पोकळ्या उर्फ सायनसेस जोडलेल्या असतात. यात म्युकोसा उर्फ तोंडाच्या आत असते तश्या ओल्या त्वचेचे आवरण असते, ज्याचे मूळ काम नाकातून घशात जाणारी हवा बॉडी टेंपरेचरला आणणे प्लस त्यातील जंतू, तंतू त्यातून स्रावलेल्या म्युकस नामक चिकट स्त्रावात अडकवून पोटातल्या अॅसिडमधे ढकलणे हे असते. ही निसर्गाची उत्सर्जनक्रीया आहे. सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम.
वाफ तुमच्या सायनसमधे जाऊन म्युकस पातळ करू शकते, अन तितकेच करू शकते. हे अधुन मधून सर्दीसाठी केलेले फायदेशीर आहे. म्युकस पुढे ढकलण्यासाठी त्या ओल्या त्वचेवर खूप छोट्या सिलिया नामक बोटासारख्या 'वस्तू' असतात.
पण करोना म्हणून विनाकारण अती गरम वाफ अन तीही रोज खूप लोक घेताहेत. आपल्याला सहन होईल त्या तापमानाच्या वाफेने करोना विषाणूंचे काहीही वाकडे होत नाही, पण सायनसमधील ह्युमिडीटी वाढते, अन रिपिटेड गरम तापमानाने म्युकोसा/उर्फ श्लेष्मल त्वचेच्या 'सिलिया' उर्फ पेशिंच्या वरचे उल्लुसे हात, जे ही म्युकस पोटाकडे ढकलत असतात, त्या डॅमेज होतात. सो म्युकस चा निचरा होत नाही.
आता म्युकस बेसिकली कार्बोहायड्रेट आहेत. जे बुरशीचे अन्न आहे. -> ही म्युकस पुढे ढकलली जाण्याची क्रिया तुम्ही अती वाफेने डॅमेज केली आहे. -> प्लस वाफ घेऊन सायनस मधे दमट वातावरण आहे. आता इथे बुरशी वाढणारच आहे.
याउपर तुम्ही करोनामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती गमावून बसला आहात, प्लस सायटोकायनीन स्टॉर्ममुळे तुमचा जीव जावू नये म्हणुन डॉक्टरांनी तुम्हाला स्टिरॉईड्स दिलेले आहेत, प्लस डायबेटीस. आता पुढे काय होईल?
सो,
वाफ.
नको.
प्लीजच. नो घरगुती उपचार. दोन्ही हात जोडून नको.
**
आता काढा.
या सगळ्या काढा प्रकरणात जे काय मसाले आहेत त्याने अॅसिडिटी वाढते. मग आपण काय करतो?
अँटासिड खातो.
मग काय होते?
तुमची म्युकोसा जे काय जंतू तंतू जठरात ढकलते, जिथे ते हायड्रोक्लोरिक अॅसिडमधे तडफडून मेले पाहिजेत, ते आनंदात तरंगत.. तरंगत.. पुढे जातात, जिथे पचनसंस्थेतील कण रक्तात खेचून घेणे नॉर्मल अस्ते...
जौद्या. इथे फिजॉलॉजी वगैरे शिकवायची जागा नाही, पण काये ना, आजकाल नुस्तं डॉक्टरने सांगितलं म्हणुन विश्वास ठेवण्यापेक्शा लोक गूगलवर ''रिसर्च" वगैरे करतात, प्लस, व्हॉट्सॅप युनिवर्सिटीच्या पदव्युत्तर डिग्र्याही असतात.
सो.
**
पुन्हा एकदा, एकुलता एक डॉन क्षमस्व, तुमच्या दु:खाच्या प्रसंगी इथे बडबडतो आहे.
ओके
ओके
धन्यवाद आरारा.
आणि सॉरी डॉन, हे विषयांतर माझ्याकडून या दुःख धाग्यावर झाले.
आता यापुढे विषयांतर वाले प्रतिसाद वाढवत नाही इथे.
आरारा, महत्त्वाची माहिती
आरारा, महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद!
आरारा, चांगली माहिती.
आरारा, चांगली माहिती.
डॉन, सॉरी मगाशी लिहायचे राहुन गेले. वाचून वाईट वाटले.
काही दिवसाआधी आजी गेली https:
काही दिवसाआधी आजी गेली https://www.maayboli.com/node/79134
आता तशी लांबची मावशी पण जवळची होती
सर्व परीवाराला हे दु:ख सहन
सर्व परीवाराला हे दु:ख सहन करण्याचं बळ मिळो>>>+१
वाईट वाटले. तुम्हाला सावरायचे
वाईट वाटले. तुम्हाला सावरायचे बळ मिळो.
>>महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद! >> +१
फार वाईट झालं डॉन. टेक केअर.
फार वाईट झालं डॉन. टेक केअर.
श्रद्धांजली. काढ्या बद्दल व
श्रद्धांजली. काढ्या बद्दल व वाफे बद्दल आरारांशी सहमती.
पेशंट गेले वाचून वाईट वाटले.
पेशंट गेले वाचून वाईट वाटले. आ रा रा म्हणतात तसे त्रासातून मुक्त झाले समजायचे. भावपूर्ण श्रद्धांजली
धागाकर्ते
धागाकर्ते
आपल्या माणसांच्या विरहाचे दुःख सहन करण्याची ताकद तुम्हाला मिळू देत....
डॉन :
डॉन :
तुमच्या रुग्णाविषयी वाचून वाईट वाटले. त्यांना सद्गती आणि हे दु:ख सहन करण्यासाठी तुम्हा कुटुंबियांना बळ मिळो.
आ.रा.रा. : तुम्ही अतिशय
आ.रा.रा. : तुम्ही अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली आहेत. ही माहिती परिचित लोकांना मायबोलीवरील एका क्वालिफाईड आणि अनुभवी डॉक्टरांनी (तुमचे खरे नाव माहिती नाही म्हणून) दिलेली माहिती म्हणून फॉरवर्ड करू का?
मलाही करायची आहे
मलाही करायची आहे
तुम्ही नावाबद्दल योग्य त्या सूचना आणि परवानगी द्या, मगच करेन.
डॉन, पेशंट विषयी वाचून वाईट
डॉन, पेशंट विषयी वाचून वाईट वाटले. आपल्या सर्वांना ह्या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो.
आपल्या रुग्णाला injection उपलब्ध झाले होते का ?( तुमच्या सवडीने लिहा).
((अॅम्फोटेरेसीन बी ची नॉर्मल किम्मत, एक कोर्स, हा आजार बळावण्याआधी किमान ५ लाख रुपये होती... ))
डॉ. आरारा ही injections इतकी महाग का आहेत?
आता तशी लांबची मावशी पण जवळची
आता तशी लांबची मावशी पण जवळची होती
Submitted by एकुलता एक डॉन on 9 June, 2021 - 00:03 >>>>
आपली माणसं नजरेसमोर हवीत म्हणून हालात जगण्यापेक्षा, झालं ते 'त्यांच्यासाठी योग्य' म्हणावं.
आपल्या हातात फक्त प्रयत्न आणि प्रार्थना असतात. ते तुम्ही केलेत. सावरा, स्वतःलाही आणि त्यांच्या कुटुंबालाही.
एकुलता एक डॉन - सॉरी
एकुलता एक डॉन - सॉरी
<< आरारा, महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद! >>
------- धन्यवाद आरारा... छान माहिती सोप्या शब्दात सांगितली.
<< मलाही करायची आहे तुम्ही नावाबद्दल योग्य त्या सूचना आणि परवानगी द्या, मगच करेन. >>
------- त्यांना धर्मसंकटात टाकू नका.
एकुलता एक डॉन, या दु:खातून
एकुलता एक डॉन, या दु:खातून सावरायचे बळ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मिळो.
आ.रा. रा. , सोप्या भाषेतील माहितीबद्दल धन्यवाद.
Submitted by MazeMan on 9
Submitted by MazeMan on 9 June, 2021 - 09:41
<<
मायबोलीवर तोडलेले तारे अन उधळलेली विचारमौक्तिके, लोकार्पण आहेत, त्यावर माझा कोणताही कॉपीराईट नाही. बिनधास्त फॉर्वर्ड करा. टोपणनावाचा मूळ उद्देश नावावर टोपण घालणे हा आहे, तेव्हा टोपणनावच वापरा. धन्यवाद.
लोकहो, मित्रहो, मैत्रिणींनो.
प्लीज, माझ्या प्रतिसादाचा उल्लेख इथे करून आभार वगैरे मानू नका. हा त्यांचा धागा आहे, शोकसंदेश आहे. सो.. _/|\_