प्रतिसादांची संख्या वाढल्याने कोणाला काय फायदे तोटे होतात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 May, 2021 - 08:15

मायबोलीवरील धागाकर्त्यांवर एक आरोप मी कित्येक काळापासून बघत आलो आहे तो म्हणजे ते प्रतिसादांची संख्या वाढवतात.

एखाद्या नवीनच जन्म झालेल्या लेखकाने एखादी कथा लिहिली आणि सोशलसाईटवर प्रकाशित केली की त्याला कोणाचे काय प्रतिसाद येतात याची फार ऊत्सुकता असते. त्यामुळे दर पाच मिनिटांनी कोणाचा प्रतिसाद आला का हे ते चेक करत असतात. कोणाचा कौतुकाचा प्रतिसाद येताच लगेच तत्परतेने धन्यवाद बोलून मोकळे होतात. अश्यांना जुन्या जाणत्या सभासदांकडून एक सल्ला आवर्जून दिला जातो तो म्हणजे की सगळ्यांचे एकत्रित आभार माना, प्रत्येकाचे लगेच मानायची गरज नाही. अर्थात त्यांनी असे केल्याने त्यांचा धागा सतत वर येत राहतो जे काही सभासदांना रुचत नसावे. मी सुद्धा सुरुवातीला असे करायचो तेव्हा हा सल्ला मला वरचेवर मिळायचा. मी स्वतः कोणाला हा सल्ला दिला नाही कारण अश्या नवलेखकांची हुरहुर काय असते ते मी जाणतो.

अजून एक सल्ला वा आरोप मी माझ्यावरही बरेचदा अनुभवला आहे की मी चार लोकांना चार उत्तरे एकाच प्रतिसादात न देता तीन-चार वेगळ्या प्रतिसादात देतो. अर्थात जेव्हा माझी उत्तरे मोठी पॅराग्राफ टाईप्स असतात तेव्हा मी सुटसुटीतपणा यायला प्रत्येकाला वेगळ्या प्रतिसादात ऊत्तरे देतो. छोटी छोटी उत्तरे द्यायची असतील तर दोघातिघांच्या जोड्या करून त्यांना एकेका प्रतिसादात देतो.

आता हा आरोप किती धागाकर्त्यांवर होतो याची मला कल्पना नाही. पण जी काही उत्तरे आहेत ती सारी एकाच वेळी लागोपाठ देतो. त्यामुळे वरच्याप्रमाणे धागा चार वेळा वर आला असे होत नाही. वर एकदाच येतो. पण प्रतिसाद संख्या एकाच्या जागी चारने वाढते. आणि हे मी माझ्याच धाग्यावर नाही करत तर दुसर्‍यांच्या धाग्यावरही असेच करतो. हवे तर आयपीएलचा यंदाचा धागा चेक करू शकता. त्यामुळे मी असे करून माझ्याच धाग्याची प्रतिसादसंख्या वाढवतो असेही नाही, तर सगळीकडेच प्रतिसाद संख्या वाढवतो.

याउपर धाग्यावर कोणी अवांतर चर्चा करत असेल आणि त्याला रोखले नाही तर यालाही धाग्याची प्रतिसादसंख्या वाढवणेच समजले जाते. त्यात धागाकर्त्याने स्वतः एक अवांतर प्रतिसाद टाकला तर मग त्याला थेट आरोपीच्या पिंजर्‍यातच ऊभे केले जाते.

बहुधा यामुळे काही सभासदांचा असाही समज झाला आहे की यातून सदर धागाकर्त्याला काही आर्थिक कमाई वगैरे होते का? किमान मला तरी होत नाही. ईतरांची कल्पना नाही.
बरे यातून मायबोली प्रशासनाला काही फायदा तोटा होतो का याची कल्पना नाही, पण एखाद्या धाग्यावरचे प्रतिसाद वाढल्याने ईतर सभासदांना वा ईतर धागाकर्त्यांना काही नुकसान होत असेल असे मला वाटत नाही.

मग हि चर्चा का चघळली जाते नेहमी?

आजच नुकताच एका धाग्यावर हा आरोप तेविसशे पंचवीस वेळा झेलल्यावर अखेर हा धागा काढायचा ठरवले. उगाच याचे उत्तर तिथेच देत बसणे म्हणजे पुन्हा प्रतिसाद वाढवण्याचा तोच आरोप झेला. यापेक्षा एक स्वतंत्र धागा काढूया म्हटले. मायबोलीवर धागा काढणारा मी एकटाच नाही. हा धागा सर्व धागाकर्त्यांसाठी ज्यांना वरीलपैकी कुठलेही आरोप झेलावे लागतात...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहसा २-३ पी.एम पीसटी धागा काढता. आता काय हे असा भलत्या वेळेला धागा काढला. माझी तुमच्या धाग्यांवर पहिला प्रतिसाद द्यायची हॅटट्रीक हुकली ना भाऊ!! (कुणाचं काय तर कुणाचं काय...)
आमच्या हॅट्ट्रीक साठी तीन सलग धागे पाहिजेत असा काही नियम नाही. कुठल्याही तीन धाग्यांवर पहिला प्रतिसाद आला की झालं.

धागाकर्त्याच्या अंतरात्म्याचा आवाज पारंबीच्या आत्म्याला ऐकू आला. धागे भरकटवण्यावरून सदर धागाकर्त्याची झालेली तगमग आणि शिवाय मुद्दे सोडून प्रतिसाद येऊ नयेत म्हणून वेगळा धागा काढण्याचा कळवळा पाहून गहीवरून आलं.
सुबह का भुला अगर शाम को घर आये तो उसे भुला नही कहते !!!

मग हि चर्चा का चघळली जाते नेहमी?
<<
टाईमपास बरा असतो. तुला धागे काढणे हा टाइमपास, आम्हाला चघळणे हा टाईमपास. झोप आता.

इथे पण प्रत्येक प्रतिसाद वेगवेगळा देणार का प्रतिसाद वाढवायला Happy
मज्जाय बुवा, मी पण एक टाकलाय प्रतिसाद, त्याचे पैसे न विसरता पाठवा

काहीही तोटा / फायदा नाही प्रतिसाद संख्या वाढल्याने.
उलट प्रतिसाद दोन हजारच्या वर गेल्यास नविन धागा काढण्याची परंपरा आहे मायबोलीवर.

पहिल्या दिवशी समजा चारच प्रतिसाद आले धाग्यावर तर दुसऱ्या दिवशी आपण एकेका प्रतिसादात ५, ६, ७ .. असे करत ४९ पन्नासवर थांबावे.
४९ पन्नास आकडा बघितला की काही माबोकर लगेच ५० आकडा लिहायला धावून येतात. मग आपण ९९ पर्यन्त न्यावे, शंभर आकडा लिहायला परत माबोकर सरसावतात, तसे ते २००, ३००... असे लिहायला पण येतील. असे २००० झाले की नवीन धागा काढावा.

मायबोलीवरील धागाकर्त्यांवर एक आरोप मी कित्येक काळापासून बघत आलो आहे तो म्हणजे ते प्रतिसादांची संख्या वाढवतात.>> काही धागाकर्त्यांवर भिकार धागे काढतात असाही आरोप होतो. म्हणुन काय धागे काढणे सोडुन द्यायचे का?

सहसा २-३ पी.एम पीसटी धागा काढता. आता काय हे असा भलत्या वेळेला धागा काढला. माझी तुमच्या धाग्यांवर पहिला प्रतिसाद द्यायची हॅटट्रीक हुकली ना भाऊ!! (कुणाचं काय तर कुणाचं काय...)
>>>>>

हो, सीमंतिनी, मलाही जरासे वेगळेच वाटले. कारण रात्री धागा काढून झोपायची तयारी, अंथरून पांघरूण, चहा कॉफी, औषधपाणी, वॉशरूम बाथरूम सारे उरकून झोपायला जाण्याआधी धाग्यावर आलेला तुमचा पहिला वाचून मगच झोपावे अशी सवय लागलेली..
नाईलाजाने तात्कालिक धागा काढावा लागला ..

कॉल आला ऑफिसचा, ईतर प्रतिसादांना उत्तरे थोड्यावेळाने देतो...'क्रमशः

>>काहीही तोटा / फायदा नाही प्रतिसाद संख्या वाढल्याने.<<

मला वाटतं होत असावा. सॉर्ट ऑफ इन्टंट ग्रॅटिफिकेशन. म्हणजे सॅलरी डिपाझिट झाल्यावर येणार्‍या अलर्ट इतका नाहि, पण थोड्या लहान स्केलवर... Proud

Photo वर लाईक मिळवणे.मग त्या साठी चित्र विचित्र फोटो काढणे.
लेखनावर प्रतिसाद मिळवणे जास्त प्रमाणात.
असे विचार करणारी व्यक्ती ही मानसिक दृष्ट्या विकलांग असते.
असे माझे स्पष्ट मत आहे. समाज माध्यमावर किती ही कुरूप फोटो असला तरी ब्युटीफूल अशी कमेंट करणे हा रिती रीवज आहे.
खोटे असते सर्व.
तसे लिखाणावर जास्त प्रतिसाद येणे म्हणजे लिखाण उत्तम आहे असे काही नसते.

वैविध्य हवे. सारेच जण बध्द्कोष्ठी चेहरा करुन गंभीरच धागे प्रसवु लागले तर कंटाळा येइल. याउलट सगळेच थातुरमातूर किंवा विनोदी धागेच फक्त प्रसवु लागले तरीही कंटाळा येइल. तेव्हा व्हरायटी इज स्पाईस ऑफ लाईफ.
तुम्ही दुर्लक्ष करा व अधुनमधुन मजेमजेचे धागे काढत जा. ज्यांना हलक्या फुलक्या करमणुकीची गरज आहे ते प्रतिसाद देतील. बाकीचे नाही देणार.

इथे पण प्रत्येक प्रतिसाद वेगवेगळा देणार का प्रतिसाद वाढवायला Happy
>>>>
बिलकुल नाही, ईथे आपण फक्त कॉमेंट वाचणार Happy

मला वाटतं होत असावा. सॉर्ट ऑफ इन्टंट ग्रॅटिफिकेशन. म्हणजे सॅलरी डिपाझिट झाल्यावर येणार्‍या अलर्ट इतका नाहि, पण थोड्या लहान स्केलवर... Proud
>>>>>>>>>

कुठलाही धागा कधीच फुकट जात नाही. कोणाला ना कोणाला काही ना काही ज्ञान जरूर मिळते. आपली हि पोस्ट वाचून मी इन्टंट ग्रॅटिफिकेशन सर्च केले. एक नवीन टर्म कळली. सामान्य ज्ञानात भर पडली.

Instant gratification is the desire to experience pleasure or fulfillment without delay or deferment. Basically, it's when you want it; and you want it now.

Why is instant gratification good?
Satisfaction can make life easier—-for everyone!

Happiness via instant gratification can build motivation and momentum. It keeps you plugged in to an electric currant of creativity, stamina and strength. require heaps of energy, focus and discipline. Go Indulge in some instant gratification today!

हे सांगायला तुम्ही दहाव्या पानावर गेलेला धागा वर काढला Happy
आणि प्रतिसादांची संख्या चारने वाढवली ते वेगळेच Happy

मायबोलीची रया गेली आहे काही विशिष्ट आयडीज मुळे, लेख पण गाळून वाचावे लागतात. काही वेळा तर प्रतिसाद देऊन चांगल्या धाग्याची वाट सुद्धा लागलेली पाहिली आहे. काही दिवस/महिने दूर राहावे आणि मायबोली ऍप पण काढून टाकावे तर काही तरी नावीन्य जाणवेल, नाहीतर राम राम.