मुलीचा बाप होणे फार अवघड असते ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2021 - 17:59

मुलीचा बाप होणे फार अवघड असते. आणि त्यात तुझ्या लेकीसारखीचा बाप होणे तर आणखी अवघड. येतील हळूहळू अनुभव तुला ..

लेक अगदी अडीच तीन वर्षाची झाल्यापासून हे ऐकतोय. आणि तेव्हापासून उत्सुक आहे, तयार आहे, ते अनुभव कधी येताहेत याची वाट बघत Happy

आज एक बहुधा त्यातलाच मजेशीर अनुभव आला, तो शेअर करावासा वाटतोय. तेवढीच विचारांची देवाणघेवाण...

तर झाले असे,
काल लेकीने आपली एक पँट दाखवली. जिला लेगिंग की काय म्हणतात. तिला गुडघ्याजवळ एक छानसे भोक पडले होते. म्हटले बाद झाली.
आज तिने गपचूप तिच्या दोन्ही पायांवर छान कातरकाम करत आणखी भोकं पाडली आणि मी एक बाद झालेली पँट कशी फॅशनच्या नावावर पुनर्जिवित केली असा आव आणू लागली.

आईबापच आहोत तिचे. सात वर्षे झाली तिच्यासोबत. तर तिनेच हा गेम केला हे आम्हाला समजले.
त्यात मी पडलो बाप, मला तर तिचे सारेच आवडते, हे सुद्धा आवडले. म्हणजे आता पुन्हा असे करू नकोस अशी ताकीद देऊन झाली. पण कौतुकाने तिचा एक फोटोही काढला. तिनेही छान दारातली सायकल घरात आणून त्यावर बसून छान पोज वगैरे देत फोटो काढून घेतला. त्यानंतर शास्त्रंच असते ते म्हणत मी तो फोटो छानसे कॅप्शन देत फेसबूक आणि व्हॉटसप स्टेटसवर शेअर केला... आणि कामाला लागलो.

तासाभराने लाईक्स कॉमेंट चेक केल्या. ज्यात व्हॉटसपवर मला एका शालेय मित्राची मजेशीर कॉमेंट आढळली.

थांबा, एक मिनिट, फोनच बघून सांगतो.. म्हणजे त्यापुढे आमच्यात घडलेल्या संवादाचा शब्दन शब्द डिट्टो देता येईल..

हम्म, तर मित्राची प्रतिसाद होता,
भिकारपणा आहे हा, आवरायला हवे..

मी - छे रे, बघण्याचा दृष्टीकोण Happy .. (तुटक उत्तर देऊन संवाद न वाढवता निसटणार होतो पण तो भाई काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हता)

मित्र - काय बघण्याचा दृष्टीकोण? तुला तुझा आणि ईतर लोकांचा पोरींकडे बघण्याचा दृष्टीकोण माहीत नाही का? की आता बदलला आहेस तू.. सर्वांचा दृष्टीकोण तोच असतो..
(मला उगाचच मी स्वत:ही शक्ती कपूर, रणजीत कॅटेगरी असल्यासारखे वाटू लागले)

मी - सर्वच लोकांचा दृष्टीकोण तसा आहे हे मानले तरी काय मग आपल्या पोरी बुरख्यात ठेवायच्या का?

मित्र - बुरख्यात कशाला, पण आहे ते नीट घालावे ना, फाडायचे कश्याला. लोकांना मुद्दाम फाडून दाखवावेच कश्याला?

मी - तसे तर साडीतही पोट दिसते, ब्लाऊजमध्ये पाठ दिसते. एखादा पाठ पोट बघून चेकाळत असेल तर मग आपले पारंपारीक वस्त्र साडीही नेसणे सोडायचे का आता?

मित्र - हे बघ मला ईतके गहन नाही जायचेय, काय दिसतेय काय नाही. याबाबत तू आईबाबांचा सल्ला घे.

मी - बाबा तर मीच आहे.

मित्र - अरे तुझ्या आईवडिलांचा सल्ला घे.

मी - त्यांचा काय ईथे संबंध?

मित्र - पोरगी लहान आहे. काही संस्कार जुन्या जाणत्या लोकांनी केले तर वाईट नाही. आणि संस्कार म्हणजे लगेच काही बुरखा नव्हे.

मी - एक्झॅक्टली. संस्कारांचा आणि पोशाखाचा काही एक संबंध नसतो. सर्वांशी प्रेमाने वागावे, शांततेत जगावे, समानता बाळगून राहावे हे शिकवतो तिला..

मित्र - This is westernization. Mad mimic of western culture

मी - असू दे ना वेस्टर्न कल्चर. हे मॅड आहे हे कोणी ठरवले?

मित्र - ते लोकं नागडे फिरतात, आपण फिरायचे का?

मी - मग बुरख्यात जायचे का? निसर्गानेच माणसाला नागडे जन्माला घातले आहे. कपड्यांचा शोध नंतरच लागला आहे.

मित्र - ते सोड, मी काय म्हणतो, घेऊन फाडायचे कश्याला. मग फाटकेच घ्यायचे ना?

मी - हो, हे बरोबर म्हणालास. तिलाही तेच सांगितलेय. कसेही फाडू नकोस. वाटल्यास तुला एखादी छानशी डिझायनर कटस असलेली जीन्स घेऊया.

मित्र - पण न फाडता वापरले तर चालणार नाही का? उगी तापू नको हा, nothing personal.

मी - छे रे, मी कूल आहे. तूच लोड घेत आहेस उगाच.

मित्र - नाही रे, लोड नाही घेत. विचार करतोय या मानसिकतेचा.

मी - तेच, उगाच जास्त विचार करू नकोस. आपले विचार वेगळे आहेत ईतकेच.

मित्र - नाही रे विचार नाही करत आहे जास्त. कोणाला कर्मदरीद्री व्हायचे असेल तर आपल्याला काय.

मी - बघ, पुन्हा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोणाचा फरक. आपल्या आनंदासाठी जगावे, जगाचा विचार करू नये. ईतका सिंपल फंडा आहे आमच्याकडे
(मला जेव्हा जेव्हा असली फिलॉसॉफी झाडायचा चान्स मिळतो तेव्हा मी तो सोडत नाही Happy )

मित्र - असू देत. compulsion नाही बाबा. कपडे फाडण्यात आनंद मिळतो तर मिळू देत. तुझ्याशी म्हणून बोललो मी. अन्यथा उगी तोंड उघडत नाही.

मी - एक्झॅक्टली ! हाच अ‍ॅटीट्यूड ठेवावा. मला काय. प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार द्यावा. जर त्याने आपले नुकसान नसेल..

मित्र - तू मित्र आहेस, म्हणून बोललो रे..

मी - जरूर बोलावे. विचारांची देवाणघेवाण झालीच पाहिजे. फक्त ते लादले जाऊ नयेत. कोणाला एखाददुसर्‍या गोष्टीवरून जज करू नये. हेच जर माझ्या मुलाने पँट फाडली असती तर कदाचित असे बोलला नसतास..

मित्र - मुलगी आहे म्हणूनच तर जास्त काळजी घ्यावी लागते.....
(फायनली !! ये सुनने के लिये मेरे कान तरस गये थे Happy )

मी - मी स्वतःही एक पोरगा आहे रे. मलाही कॉलेजला असताना अशी जीन्स फाडायची बरेचदा ईच्छा व्हायची. पण कधी हिंमत झाली नाही.

मित्र - आपले संस्कारच तसे होते.

मी - छे रे, संस्कारांनी हात बांधले नव्हते. माझ्यात ती फॅशन कॅरी करायची हिंमत नव्हती. त्यासाठी लागणारी बेफिकीरी, तो स्मार्टनेस नव्हता. पोरीत ते ऊपजत आहे.

मित्र - जेवलास का? काय होते स्पेशल आज? तुझी बायको केक करते ते आवड म्हणून की बिजनेस म्हणून? चल बाय ! Dont Take it personally ...

कटला मेला, ते सुद्धा जेव्हा मी छान रंगात आलेलो.. म्हणजे त्या डीडीएलजेच्या अनुपम खेर सारखे, "बस्स चौधरी साहब बस्स, मेरी बेटी मेरा गुरूर है, और मेरे गुरूर को मत ललकारो" वगैरे डायलॉग मारायच्या मूडमध्ये आलेलो तेवढ्यात तो शुभरात्री बोलून निसटला...
बाकी त्याला कोण समजवणार, मी पर्सनली बोललेले किती छान एंजॉय करतो ते Happy

जोक्स द अपार्ट,
मुलीचा बाप होणे फार अवघड असते. येतील हळूहळू अनुभव तुलाही...
येऊ देत Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त नागडे आदिवासी अन जैन साधू दिसले का माझ्या बोलण्यातले?
Submitted by आ.रा.रा. on 28 May, 2021 - 20:05
>>>>

छे, आफ्रिकेतील आदिवासी स्त्रियांच्या नग्नतेचाही उल्लेख केला आहे.
मला फक्त एक सांगा की हि तीनही उदाहरणे गुडघ्यावर फाडलेल्या जीन्सच्या फॅशनशी कसे रिलेट होतात?
हि फॅशन मुंबई नवी मुंबईसारख्या शहरात ईतकी जगावेगळी आहे का?
याचे ऊत्तर का टाळत आहात?

बरे तुमची ईतर उदाहरणे,
<<<<<<< बर्म्युडा अन स्लीवलेस टी शर्ट घालून माझे शेपली डोले शोले, अथवा ढेरी दाखवत मी दवाखान्यात पेशंट तपासू लागलो, तर लवकरच पेशंट येणे बंद होते.
स्वतः हापिसात जाता का फाटकी फ्याश्नेबल ५० हजाराची जीन घालून? किंवा हाफ बनियन वर्/टीशर्ट वर ऑनलाईन बिझिनेस मिटींग?
>>>>>>

हि तरी वरील केसमध्ये लागू आहेत का?
म्हणजे हे कपडे घालून शाळेत जाणे वा ऑनलाईन क्लासला बसणे वगैरे कुठे दिसले का आपल्याला?

@ रश्मी,
धागा नक्की कशावर आहे? Uhoh
>>>
जेव्हा तुमच्या मुलींच्या कपड्यांवर कोणी आक्षेप घेते तेव्हा एक पालक म्हणून तुमची भुमिका, तुमची प्रतिक्रिया काय असावी, ते प्रकरण तुम्ही कसे हॅन्डल करावे.. ?

बाकी तुमची मुले गोड आहेत >> धन्यवाद Happy

मी - छे रे, बघण्याचा दृष्टीकोण Happy .. (तुटक उत्तर देऊन संवाद न वाढवता निसटणार होतो पण तो भाई काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हता)

मित्र - काय बघण्याचा दृष्टीकोण? तुला तुझा आणि ईतर लोकांचा पोरींकडे बघण्याचा दृष्टीकोण माहीत नाही का? की आता बदलला आहेस तू.. सर्वांचा दृष्टीकोण तोच असतो..
(मला उगाचच मी स्वत:ही शक्ती कपूर, रणजीत कॅटेगरी असल्यासारखे वाटू लागले)

मी - सर्वच लोकांचा दृष्टीकोण तसा आहे हे मानले तरी काय मग आपल्या पोरी बुरख्यात ठेवायच्या का?

मित्र - बुरख्यात कशाला, पण आहे ते नीट घालावे ना, फाडायचे कश्याला. लोकांना मुद्दाम फाडून दाखवावेच कश्याला?

मी - तसे तर साडीतही पोट दिसते, ब्लाऊजमध्ये पाठ दिसते. एखादा पाठ पोट बघून चेकाळत असेल तर मग आपले पारंपारीक वस्त्र साडीही नेसणे सोडायचे का आता?

एक सूचना : धागा भरकटू नये ही तळमळ भिडली. त्यामुळे वर दिलेली ही वाक्ये मूळ धाग्यातून काढली तर तिथूनच भरकटायला झालेली सुरूवात बंद होईल. विषय फक्त गुडघ्यावर जीन्स फाटण्याचा ठेवावा. ठळक केलेली वाक्ये ही जुन्या धाग्यातली आहेत हे मागेच स्पष्ट केलेले आहे.

त्या पेक्षा .
फॅशन चे उगम स्थान कोणते असते असा धागा काढा.
1) सिनेमात काम करणाऱ्या नट , नट्ट्या जे कपडे सिनेमात वापरतात त्या प्रभावातून तसेच
कपडे वापरण्याची मनोवृत्ती फॅन लोकांची असते का?
२) बर्मुडा वापरणे ह्याला फॅशन म्हणता येणार नाही ते एक आरामदायक वस्त्र आहे.
ते गरज ,उपयोगी म्हणून वापरले जाते.
३),स्त्रिया चे नाईट gown किंवा night सूट ह्याला फॅशन म्हणता येणार नाही .त्या प्रकारची वस्त्र झोपताना वापरली की अवघडल्या सारखे होत नाही.
४)फिट जीन्स वापरल्या मुळे हालचाल करण्यास मर्यादा येते. Uncomfortable वाटतं तरी लोक वापरतात ते फॅशन म्हणून .
ही त्रास होत असून सुद्धा त्याच प्रकारची कपडे वापरण्याची वृत्ती नक्की कशा मुळे निर्माण होते.
५) कमी कपडे वापरल्या मुळे धूळ, सूर्याची त्रासदायक किरणे सरळ त्वचेवर पडतात आणि त्वचा खराब होण्याचीच जास्त शक्यता असते.
मिनी स्कर्ट परिधान करून चेहरा मात्र ओढणीने झाकून घेण्या मागे नक्की काय वृत्ती असते..
लिपस्टिक खराब होईल म्हणून मास्क न वापरणाऱ्या शिक्षित स्त्रिया सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
त्या मागे त्यांचा काय विचार असतो.
मुंबई मधील प्रचंड गर्मी मध्ये सूट वापरणारे पुरुष नक्की काय विचार करून तो वापरत असतील.
स्विमिंग सूट पोहताना वापरण्या मागे काही तरी शास्त्रीय कारण तरी आहे .त्याला फॅशन म्हणता येणार नाही.
पण जीन्स फाडण्यात नक्की काय फॅशन आहे.

स्विमिंग सूट पोहताना वापरण्या मागे काही तरी शास्त्रीय कारण तरी आहे .त्याला फॅशन म्हणता येणार नाही.
पण जीन्स फाडण्यात नक्की काय फॅशन आहे.
>>>>>>>

फॅशन आणि शास्त्रीय कारण याचा आपसात काही सबंध असलाच पाहिजे असे काही नसते असे मला वाटते.
उद्या दंडावर टॅटू काढण्यात काय नक्की फॅशन आहे, केसांचा स्पाईक कट वा साधना कट करण्यात काय नक्की फॅशन आहे, हातावर मेहंदी काढण्यात काय नक्की फॅशन आहे, नाका कानाला मुद्दाम होल पाडून तिथे रिंग घालण्यात काय नक्की फॅशन आहे, हातात बांगड्या घालण्यात काय नक्की फॅशन आहे असे काहीही आपण बोलू शकतो...

मिनी स्कर्ट परिधान करून चेहरा मात्र ओढणीने झाकून घेण्या मागे नक्की काय वृत्ती असते..
>>>
मला वाटते चेहर्‍याचे उन्हापासून रक्षण करायला असे करत असावेत. त्या ठराविक काळापुरते..

फिट जीन्स वापरल्या मुळे हालचाल करण्यास मर्यादा येते. Uncomfortable वाटतं तरी लोक वापरतात ते फॅशन म्हणून .
ही त्रास होत असून सुद्धा त्याच प्रकारची कपडे वापरण्याची वृत्ती नक्की कशा मुळे निर्माण होते.
>>>>>
अशी फॅशन करताना जीन्स चांगल्या ब्रांडची वापरावी. कम्फर्ट असतो त्यात.

अशी फॅशन करताना जीन्स चांगल्या ब्रांडची वापरावी. कम्फर्ट असतो त्यात.>>>>>>> हो बरोबर आहे.

लिपस्टिक खराब होईल म्हणून मास्क न वापरणाऱ्या शिक्षित स्त्रिया सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
त्या मागे त्यांचा काय विचार असतो.
>>>>>.

अत्यंत बेजबाबदारपणा आहे हा...
थोडक्यात आपली सगळी उदाहरणे एका माळेत रंगीबेरंगी मणी गुंफल्यासारखी आहेत. प्रत्येकाची कारणमीमांसा वेगळी आहे Happy

एका समंजस बाप आहे त्यांनी मुली ला कपडे चुझ करण्याचे स्वतंत्र दिले आहे असे समजा.
रात्री ची वेळ आहे ट्रेन नी दोघे प्रवास करत आहेत.चांगल्या लोकांची गर्दी कमी होवून दारुड्या,व्यसनी,लोकांची संख्या ट्रेन मध्ये जास्त आहे असे समजा ( असे पण मुंबई मध्ये 11 वाजून गेले की व्यसनी लोकं च ट्रेन मध्ये जास्त असतात सज्जन लोक घरी झोपलेली असतात.)
तर अशा ह्या प्रसंगी मुली नी अतिशय शॉर्ट कपडे परिधान केली असल्या मुळे ह्या व्यसनी प्रवासी लोक तिच्या कडे रोखून पाहत आहेत.
तेव्हा त्या मुलीचा बाप कोणाला दोष देईल मुली ला की त्या रोखून बघणाऱ्या लोकांना.
ही मनातील घालमेल असेल व्यक्त होणार नाही शक्यतो .
पण मनातच तो कोणाला दोष देईल.?

मला वाटते चेहर्‍याचे उन्हापासून रक्षण करायला असे करत असावेत. त्या ठराविक काळापुरते..

मग पायांनी कोणते पाप केले आहे त्यांना संरक्षण नको.

.चांगल्या लोकांची गर्दी कमी होवून दारुड्या,व्यसनी,लोकांची संख्या ट्रेन मध्ये जास्त आहे असे समजा
>>>>

ऊत्तर तुम्हीच दिलेत
ती लोकं चांगली नसून वाईट आहेत हे तुम्हीच म्हटलेत Happy

बाकी मद्य पिलेल्यांपासून नेहमी धोका असतो, यामुळेच मी नेहमी मद्याला विरोध करतो.
आपण आपली हि पोस्ट एखाद्या दारूच्या उदात्तीकरणाच्या धाग्यावर जरूर टाका. आवडेल.

फक्त नागडे आदिवासी अन जैन साधू दिसले का माझ्या बोलण्यातले?
Submitted by आ.रा.रा. on 28 May, 2021 - 20:05
>>>>

छे, आफ्रिकेतील आदिवासी स्त्रियांच्या नग्नतेचाही उल्लेख केला आहे.

<<

भाऊ,
आपण काही 'घेत' असता का उत्तरं लिहिताना?
माझं वाक्य आहे "फक्त नागडे आदिवासी अन जैन साधू दिसले का"

तुझं उत्तर आहे,
"अफ्रिकेतील आदिवासी स्त्रियांच्या नग्नतेचा उल्लेख"

काही लोक अध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी दिडकीची घेतात तसलं काही घेत नाहीस ना इथे लिहिताना?

***

बाकी उरलेला प्रतिसाद 'घालवेडेपणा' आहे. जा, अन मी मूळ काय लिहिलं ते वाच जरा.

ऊत्तर तुम्हीच दिलेत
ती लोकं चांगली नसून वाईट आहेत हे तुम्हीच म्हटलेत.

अशा प्रसंगी मुलीच्या बापाच्या मनात काय विचार येतील हा माझा प्रश्न आहे .तो मुलींनी कमी कपडे घातले म्हणून हा प्रसंग आला असा विचार करून मुलीला दोष देईल का?

@ आरारा
आपण काही 'घेत' असता का उत्तरं लिहिताना?
>>>>>
आपल्याला मद्य म्हणायचे आहे का? मी ते घेत नाही. आणि घेणार्‍यांनाही विरोध करतो. आपणही कराल तर आवडेल Happy

जा, अन मी मूळ काय लिहिलं ते वाच जरा.
>>>>>>
आपल्या पोस्टचा मी काहीच अर्थ लावला नाहीये. उलट आपल्यालाच विचारत आहे की आपण दिलेली उदाहरणे माझ्या लेखातील केसशी कशी रिलेट होत आहेत? तुम्हीच सांगा मला तो अर्थ..
तर आपण ते सांगायचे टाळत आहात Happy
मी तर ईन्फॅक्ट मनाची तयारी करूनच बसलो आहे की एखादा बाप आपल्या मुलीला सो कॉलड मॉडर्न फॅशन करायला आडकाठी करत नसेल तर त्याला समाजातून विरोध, टिका, टोमणे हे झेलावे लागणारच Happy

@ हेमंत
तो मुलींनी कमी कपडे घातले म्हणून हा प्रसंग आला असा विचार करून मुलीला दोष देईल का?
>>>>>>>

मला आधी सांगा तुम्हाला त्या प्रसंगात हे का लिहावे लागले?
""" चांगल्या लोकांची गर्दी कमी होवून दारुड्या,व्यसनी,लोकांची संख्या ट्रेन मध्ये जास्त आहे असे समजा """

जर तुम्ही याचे ऊत्तर शोधले तर तुम्हाला आपसूकच स्वतःच्या प्रश्नाचे ऊत्तर मिळून जाईल. मी सांगितलेले पटेल न पटेल. पण एकदा स्वतःशी विचार करा की तुम्हाला आपल्या उदाहरणात वरचे वाक्य लिहिणे गरजेचे का भासले? या विचारांच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला उत्तर मिळाले तर ते तुमचे तुम्हालाच पटेल Happy

Pages