कथा आणि व्यथा

Submitted by मिरिंडा on 23 May, 2021 - 01:43

प्रत्येकाचं गाणं असतं
प्रत्येकाचा सूर असतो
प्रत्येकाची कैफियत असते
व्यथेतून तो मांडत असतो

कधी कधी व्यथा सुद्धा
दगडासारखी बनत जाते
मग मात्र तिला
पाझर फोडणं
कठीण जातं

क्वचित कधी जखमेवरची
खपली नकळत निघत जाते
भळभळणारी जखम मात्र
आपल्याच वेगाने
वाहत राहते

अलगद पट्टी प्रेमाची
सारंच कसं भरुन नेते
प्रेम देणारा तो अन् ती
मात्र लपून सारे देत राहतो

म्हणून सांगतो मित्रानो
भेटलेल्याचे स्वागत करा
कुणी सांगावं प्रेम देणारा
क्वचित कधी दिसूही शकतो

अरुण कोर्डे ९००४८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users