महामारी

Submitted by मिरिंडा on 23 May, 2021 - 01:36

कुटुंबे उध्वस्त झाली
प्रेम आता वाळले
कधी कुणी होते जवळी
ते माणूस आता हरपले

का असा नंगानाच हा
महामारीचा सुरु असे
पापे तर पृथ्वी जडावली
की मैत्र आता आटले ?

आशा धरावी ज्याच्या कृपेची
तोच संहारक जाहला
राक्षसाला बळ मिळाले
भ्रष्ट माणूस जाहला

जात, धर्म, गाव, संस्कृती
आता न ये कामी कुणाच्या
दवादारु दुर्मिळ झाली
बाजार काळा वाढला

लाटांवर लाटा आल्या
टाळ्या आता थांबल्या
होते कधी सोहळे जगी
आठव येतो कधीमधी

अरुण कोर्डे ९००४८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users