...कविता ???...काय असते ति??

Submitted by kunjir.nilesh on 19 December, 2007 - 06:46

कविता... ???
काय असते ति...??
नेमके तिचे स्वरुप काय...???
ति मनाला का भिडते...??
ति आपलिशी का वाटते...???
नेमका याचा विचार कोणी करत नसेल. मी पण कधी केला नव्हता. पण आज सहज मनात आले म्हणुन लिहावेसे वाटते.
मी हे तुम्हाला सांगणे म्हणजे एका लहानग्याने आपल्या आईला अंगाई म्हणुन दाखवावी असे काहीसे आहे. तरी तुम्ही जाणकार नक्कीच समजून घेताल/सांगाल यात मात्र मला तीळमात्र शंका नाही.
कविता या एका शब्दातच इतके काही दडले आहे कि त्यावरुनच तिची व्याप्ति किती थोर आहे हे लगेचच समजते.
कविता सजिव-निर्जीव, सुख-दु:ख, विजय-पराजय, शरीर-आत्मा अशी सामान्य माणसाची गुंतागुंत सहज सोडविते.
कवितेत "कवि"ला जितके महत्व आहे तितकेच "ता" या एका अक्षराला ही आहे. कवि हा आपल्या कवितेत "ता" म्हणजे "तारुण्य, तारतम्य, ताकद, ताजेपणा, तान्हेपणा, तारकता, ताळमेळ" असे सप्तरंगी भाव उतरवतो.
कविता ही प्रत्येक कविला नेहेमीच एका निराळ्या आणि जादुई अशा दुनियेची सफर करविते. आपल्याला ति आपलिशी वाटते. ती आपल्या शरिराशी समरस न राहता मनातुन, आत्मरुपी अशा भावातुन प्रगट होते. काय छान असते ना ते जग...या जगात आपल्याला कसले बंधन नाही, आकाशी झेप घेण्यास पंखांची गरज नाही, सुंदरता न्याहाळन्यासाठी डोळ्यांची गरज नाही, जग हिडंण्यासाठी अवयवांची गरज नाही, कोणाच्या मनात घर करण्यासाठी परवानगीची गरज नाही, कोणाला काय वाटेल याची चिंता नाही, स्वप्न पुर्तिसाठी साधनांची गरज नाही आणि स्वत:ला समजण्यासाठी
माझेपणाची गरज नाही. खरंच आयुष्य म्हणजे काय?...सुंदर, सुख, आंनद, आपलेपणा या शब्दांचा अर्थ काय?... स्वप्न म्हणजे काय??... हे पहायचे असेल, हे समजायचे असेल, असे आयुष्य जगायचे असेल तर कविची नजर हवी.

क्रमशः

गुलमोहर: