Submitted by ॠचा गौरव on 16 May, 2021 - 11:37
नजरेस पडे अपूर्ण,
मृगजळ वा हिमनग जसे...
प्रत्येकच व्यक्ती असते
पुस्तक असंख्य पानांचे...
एकच व्यक्ती,
अनेक छटा...
कुणास भासे कादंबरी ती,
कुणास गूढ कथा...
व्यक्ती तितक्या प्रकृती,
अन तितकेच त्यांचे खुलासे...
काही पुस्तके फक्त न्याहाळावीत,
तर काहीना चाळावे हलकेसे...
काही व्यक्ती अतिशय मनस्वी
आणि वाटे आनंदी...
लक्षपूर्वक वाचावीत पुस्तके ही,
विचारधारा स्वच्छंदी...
काही व्यक्ती अतिशय जवळ,
तरी वाटे अपरिचीत...
वाचताना हे पुस्तक पाहावे,
सुटली का काही पाने कदाचीत...
काही नवीन ओळखी,
चटकन वाटे अपुल्याश्या...
पुस्तक हे असते खास,
पुन्हा पुन्हा वाचण्याचा ध्यास...
मी पण अशी एक व्यक्तीच आहे ,
असंख्य पानांचे पुस्तकच आहे...
काहींसाठी एकदम खुले,
तर काहींसाठी नवे कोरे आहे...
अनेक पुस्तके अशी,
मी वाचतच जावे...
आणि त्यांची टिपणे काढीत,
माझी पाने लिहीत राहवे...!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा