बेन 10

Submitted by कृतिक शैलेश पटेल on 15 May, 2021 - 10:22

इच्छा मागितली एकदा पाहून तुटता तारा।
माझ्या समोर पडला तो डौलवत अंबर धरा।।
त्यातून निघाले एक विचित्र यंत्र।
होते त्यात रूप बदलायचे तंत्र ।।१।।
मिळाले मला त्यानं अनेक रूप।
त्यामुळे झालो मी दश रूप।।
करून दृष्ट परग्रहिंचा संहार।
पृथ्वी वासिंसाठी झालो मी दशावतार।।२।।
फोरआर्म, ह्युमंगसॉर अवतार बलवान फार।
नवग्रह विजयी विलगॕक्स ला मिळाली हार।।
इंकर्शंसला आठवली त्यांची नानी।
जेव्हा स्वंफायर उतरला रणांगणी।।३।।
विश्व भयभीत ज्याला संपली हायब्रिडची कहाणी।
पाजले त्याला आॕम्निट्रीक्सरूपी तलवारीचे पाणी ।।
एलियन एक्स बनून करावा लागतो फक्त विचार।
सृष्टीचा करेल सेरीना निर्माण, मी संचालन व बेलिकस संहार ।।४।।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users