राधे ,पेन्शन योजना

Submitted by हस्तर on 14 May, 2021 - 10:05

राधे ,पेन्शन योजना
नोंद सपरिवार बघू नका

सलमान खान ,दिशा पाटणी त्याच्या मुलीच्या वयाची ,आणि हे ह्या चित्रपट प्रकर्षाने दिसते ,निदान आधी तरी तरुण वाटायचा
दिशा टायगर श्रॉफ ला डेट करतेय ,त्याचा बाप जॅकी तिचा भाऊ दाखवलाय
दुसरी जॅकी ( फडणवीस) फक्त एका गाण्यात दिसतेय पण जॅकी श्रॉफ पण मिनी फ्रॉक कि काय म्हणता त्यात आहेत,चित्र डंकावले आहे

एक सुस्पेंड झालेला एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट परत घेतायत तेव्हा वाझे ह्यांचीच आठवण येते पण इथे अर्णव गोस्वामी वाझे ह्यांना घाबरला होता
तिथे मात्र सलमान ला रणदीप हुंडा धोपटून बाथरूम मध्ये बंद करतो आणि पुरा पोलीस हेड quarter मध्ये त्याची टर उडवली जाते
ह्या सगळ्या पेन्शनर लोंकांमध्ये दिशा अशी वाटतेय जणू मराठी संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेल्याला आयडी
https://imgur.com/49VVjNs

पूर्ण चित्रपट ४ थीत लया मुलांसाठी आहे एवढा बालबोध आहे
१) जॅकी सलमान ला म्हणतो I आम two dangerous तेव्हा त्याला हाताची २ बोटे पण दाखवावी लागतात मग जोक कळतो
२) सलमान खान जो उकडलेला ऑक्टोपस चा चेहेरा आणि गेंड्याची बॉडी घेऊन असतो त्याला छोटी दिशा म्हणते तुला बॉडी वर काम करावे लागेल
३) पोलीस फक्त मार खाण्यासाठीच असतात का ?
४) हॉटेलमध्ये २ मर्डर,लगेच रात्री राधे चा आयटम सोंग पोलीस चा इन्फॉर्मेर मेला लगेच गाणे
५) सलमान खान चक्क dc चा फ्लॅश आणि marvel चा quicksilver दाखवला आहे

६) मुख्य व्हिलन कडे फक्त २ गुंड असतात आणि प्रविंद तरडे इत्यादी छोट्या भाई लोंकांकडे फौज
७) टॉप ची मॉडेल एकाला लिफ्ट देते आणि लगेच मैत्री होते प्रेम होते,मला आख्या भारतात एक अशी मुलगी दाखवा जी अनोळख्या माणसाला लिफ्ट देईल

बाकी सलमान आपल्या फ्यान च्या अपेक्षा पूर्ण करतो
शर्ट काढतो ,डान्स कसा बस(?) करतो ,गाडी चालवून लोंकाना तुडवतो

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ट्रेलरमधे बघवत नव्हता आता खरंच म्हातारा झालाय. तेही मुलीच्या वयाच्या हीरवीण सोबत. आवर बाबा आता सावर स्वत:ला नाहीतर शाखा आणि अखा सारखा तुझाही सिनेमा आपटेल लवकरच. झी तर नाहीये त्यामुळे टीव्हीवर आला तर बघेन. पण वाॅंटेड इतका नक्कीच नाही आवडणार असं वाटतंय.