Submitted by _आदित्य_ on 11 May, 2021 - 14:12
पावसाचा.. तोल गेला..
सावराया.. चंद्र आला..
ह्या विजांचे, चांदण्यांचे..
भान नाही.. पावसाला !
गंधणारा.. धुंद वारा..
गारव्याचा.. हा शहारा !
रंग ओले.. त्यात ओला..
रंगलेला.. देह सारा !
सांज आली.. सांज गेली..
ती अजुनी.. चिंब ओली !
का सुटेना.. मिठी वेड्या..
पावसाने.. मारलेली !
- आदित्य
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर कविता.!
सुंदर कविता.!
धन्यवाद रुपाली !
धन्यवाद रुपाली !
"पहिला पाऊस"
"पहिला पाऊस"
अशी सांज अजाण वयाची... अलवार क्षितिज कुसुंबी
मनात निवळे ओढ... चढे ढगांस साज नारिंगी
सावल्या गर्द होतांना... रस्ता ठिपक्यांचा व्हावा
सांडित सडा ग्रीष्माचा... अलगद पहिला पाऊस यावा
खिडकीतून दिसते सर... मन भिजून चिंब कोरडे
रात्रीच्या प्रहरांत जागा... पाऊस वाजवी चौघडे
कौलांवर उभा कोसळे... ही रात्रही सोबत गळे
वीज चमके, उरी कोसळे... मन दचकून व्हावे खुळे
उषेच्या कोवळ्या कांतीला... ओल सोनेरी जडविलीं
जपल्या पाऊली गरतीच्या... ही सृजन स्पंदने जागली
- (भालचंद्र धनावडे)