कलूआजी! - काही राहिलेल्या गोष्टी!

Submitted by अज्ञातवासी on 8 May, 2021 - 15:06

कलूआजी - याआधीची गोष्ट!

https://www.maayboli.com/node/78829

ही भयकथा आहे. ओके?
आधीच सांगितलेलं बरं. लोक दचकतात, आणि म्हणतात, आधी का नाही सांगितलं.
म्हणून मी आजकाल सांगूनच टाकतो. बाबारे ही भयकथा आहे. ऐकायची असेल तर ऐक.
माझ्या भयकथा हा माझा प्लस पॉईंट. खरं सांगू? या कथेतील सगळं वातावरण खरं असतं, पण तो शेवट रंजित करावा लागतो, तरच लोक घाबरतात.
नाहीतर फुसका बार काय कामाचा?
...आता काय सांगू, सगळं खरं आहे, तरीही मी कलूआजीच्या घराला तळघर होतं, हे सांगितलं नाही.
मागे मोकळी जागा होती ना, तिथेच एक छोटी खोली होती. ती खोली उघडली, की पायऱ्या लागायच्या...
खूप खूप खाली उतरलं, की पोहोचलोच तळघरात.
आणि या तळघरात, खरंच भीती वाटायची. पण उत्सुकताही...
सगळं तळघर पोत्यानी भरलेलं असायचं. साखरेची, गव्हाची पोती.
आणि ड्रमसुद्धा, रॉकेलचे भलेमोठे ड्रम.
जाम टरकायची खाली. रात्री ८ नंतर तर तिकडे फिरकायची हिम्मत सुद्धा व्हायची नाही.
दीपिका आणि मी, खेळायचो लहानपणी. जायचोही खाली.
पण सगळं सहाच्या आत.
दीपिका माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. माझी सगळ्यात जिवलग मैत्रीण.
तेजुमावशीची मुलगी. सुट्टीत मी मामाकडे गेलो, की तीही आलेलीच असायची.
मनसोक्त खेळायचो. वेड्यासारखं... भातुकलीपासून, तर विटी दांडूपर्यंत.
खोटं खोटं लग्न लावायचो आम्ही, मला खूप लाजल्यासारखं व्हायचं. मला आवडायचं नाही, पण दीपिकाला असच आवडायचं.
बाकीचीही मुलं असायची, पण आम्ही दोघे कायम सोबतच.
...पण एकदा तीन चार दिवस मामांनी मला जाऊच दिलं नाही खेळायला...
आणि चौथ्या दिवशी, सगळ्यांची नजर चुकवून गेलो दिपूकडे तर तिचं नाव काढताच कलूआजी रडली...
तेजुमावशी मुंबईला निघून गेली होती. दिपूला घेऊन... आठवण येत असेल ना आजीला खूप...
मलाही खूप आठवण आली. मग मी शेजारच्या सोनीबरोबर गट्टी केली.
एकदा मामा मामीला सांगत होता. मी बाजूलाच अंथरून घेऊन झोपलो होतो.
"ते जे काही आहे ना, त्यानेच जीव घेतला पोरीचा. या नीच बाया, सांगत नाहीत. पण आपल्याला दिसत नाही होय? अरुण, आणि आता दीपिका. सोन्यासारखी पोर. गेली ना. अर्धा चेहरा कुरतडलेला होता तिचा, अर्ध शरीर कुत्र्यांनी चावून चोथा केल्यासारखं होतं. उगीच नाही तेजु त्या दोघींकडे बोट दाखवत होती. आतातरी सुधरा म्हणा."
माझ्या डोळ्यासमोर अर्धवट कुरतडलेली दीपिका आली...
...आणि मी गपचूप पटकन डोक्यावरून चादर ओढून घेऊन डोळे घट्ट मिटून घेतले.
मग तळघराला कुलूप लावलं गेलं. पोते सुभ्याकडे जायला लागली.
कधी कधी कलूआजी जायची सफसफाईला खाली असं ऐकलं.
काळ गेला, मी दीपिकाला विसरलो, आणि तळघरालाही...
त्यादिवशी असाच कलूआजीला भेटायला गेलो मी.
आठवतय ना?
पण ती कलूआजी नव्हतीच... सरकत होतं ते होतं तीच भूत.
तिने माझ्यावर झेप घेतली. मी बाजूला झालो.
दार उघडत नव्हतं...
आता फक्त गोठ्याजवळून मागे मोकळ्या जागेतून उडी मारून जाऊ शकत होतो.
...मी त्याक्षणी मागच्या दाराकडे पळत सुटलो...
कलूआजी चांगलीच बिथरली...
"लब्बाड... आजीला गुंगारा देतो होय. येतेच थांब...चार पायांवर पळत..."
तीने पुढचे पंजे जमिनीवर टेकवले, आणि चार पायांवर पळावं, तशी प्रचंड वेगाने माझ्यामागे पळत सुटली.
मी गोठ्यापर्यंत पोहोचलो... मात्र या गडबडीतही एक गोष्ट माझ्या लक्षात आली.
...तळघराचं दार उघडं होतं..
फुटक नशीब माझं... गोठ्याची वरची कडी आणि मधली आडवी कडी, दोन्ही कड्या अडकवलेल्या होत्या.
...माझे हात थरथरत होते...
कलूआजी धावत माझ्यामागे येऊन थांबली...
"लब्बाड... किती दमवशील मला म्हातारीला. बघ आता तुझी बायकोच तुला शिक्षा करेल."
'बायको????'
...आणि कोनाड्यातल्या अंधारातून एक आकृती माझ्याकडे सापाच्या चपळाईने सरपटत आली.
अर्ध अंग चावून चोथा झालेलं, अर्धा चेहरा कुरतडलेला...जुनाट लक्तरं झालेला फ्रॉक... लहानपणी खेळतानाचा...
"मा...झा.... नव...रा..."
आणि त्याक्षणी तिने मला पायापासून तीक्ष्ण दातांनी कुरतडायला सुरुवात केली...

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Disclaimer आवडलं :- D
तुमची आपबिती जबरदस्त !!!
अश्या कथा तुमचं Home Pitch आहे अज्ञात...

बापरे!!! खूपच भयानक.
आमचाही वाडा आहे आणि त्याला तळघर आहे
आता तिथे जाताना भिती वाटेल.

@मामी - धन्यवाद! बदल केला आहे!
@गौरी - Lol धन्यवाद
@मनुप्रिया - खूप धन्यवाद! घाबरू नका, प्रत्येक तळघरात दीपिका नसते Wink

ही कथा ठीकठाक वाटली. मागच्या कथेमध्ये सरप्राईज एलिमेंट होता तो आधीच माहीत पडल्याने असेल वा शैली ओळखीची असेल की काय त्यामुळे उंचावलेल्या अपेक्षांना पासिंग पुरते मार्किंग अस वाटलं.

@जाई - धन्यवाद! पासिंग झाले तेही नसे थोडके Happy
@बन्या - काय करणार? शेवटी धारपांची पुस्तके वाचून थोडबहुत त्यांच्यासारखं लिहायचा प्रयत्न केला इतकंच. नवीन काही विचार करण्याची आमची पात्रता कुठली?
आपल्यासारख्या कृपावंत वाचकांची कृपा आहे, म्हणून आम्ही आहोत.
फक्त ती कथा इथे पोस्ट करू नका... विनाकारण कॉपीराईटचा भंग व्हायला नको.

मस्तच नी थरारक.

@मनुप्रिया - खूप धन्यवाद! घाबरू नका, प्रत्येक तळघरात दीपिका नसते Wink

पण रणवीर असु शकतो :))

फक्त ती कथा इथे पोस्ट करू नका... विनाकारण कॉपीराईटचा भंग व्हायला नको. >>> का रे ढेकणा ? ढापाढापी करताना कॉपीराईटचा भंग झाला तर चालतो का ? कथा पोस्ट केली तर काय ढापलंय हे कळेल म्हणून नको म्हणतोस का ?
स्वतःचं लिहून शाबासकी मिळव की दिवाभीता.
हजार आयडी काढायचे, स्वतःच स्वतःला प्रतिसाद द्यायचे, त्यातल्या काही स्त्रीआयड्या ख-या आहेत दाखवायला त्यांच्या नावाने भिकार कविता करायच्या. किती भिकारडे धंदे आहेत तुझे.
आणि हे धंदे कमी पडले की शक्तीराम , शशिराम, खान ९९ असले घाणेरडे आयडी घेऊन तू ज्यांचा द्वेष करतोस त्यांना शिवीगाळ करायची.

भैय्या पाटील, महाश्वेता, _श्रद्धा असले किती आयडी काढून ठेवलेत रे ढेकणा ?
अजून एक गोष्ट आहे. वेळ आली कि ती एक्स्पोज करूच.