स्वप्ने !

Submitted by _आदित्य_ on 7 May, 2021 - 23:46

कल्पतरूच्या फांदीवरले छोटेसे घरटे..
अन त्यात तुझी स्वप्ने !
रे त्यांना नाही तुफान अथवा
तप्त उन्हांची जाण..
ते नाजूक, हळवे, मुके, भाबडे,
गोंधळलेले प्राण !
तू त्यांच्यापाशी जाऊन,
घे पंखांखाली त्यांना..
मायेची उब मिळूदे,
निर्धास्त होउदे त्यांना!
मग मोठी होतील स्वप्ने,
अन स्वप्न पाहतील स्वप्ने..
ती आकाशातून मुक्त उडाया
तयार झाली असता,
दे पंख तयांना त्यांचे..
कर पूर्ण स्वप्न स्वप्नांचे !
मग दूर निळ्या अवकाशी,
मनमुक्त विहरतील स्वप्ने !
डोळ्यांत तुझ्याही पाणी
हलकेच आणतील स्वप्ने !

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults