Submitted by चंदन सोनाये on 30 April, 2021 - 11:10
------
मीरा
------
पाहता प्रथम तुझ, मन गेले हरपून,
ठेविले तुज श्यामल, डोळ्यात माझ्या साठवून...
जगा साठी ईश्वर, जागा तुज मंदिरात,
मानिले मी सर्वस्व, ठेविले मज हृदयात...
सखा तूची बालपणी, प्राण सखा तारुण्यी,
भक्ती प्रेमात दिवानी, हरीची मी मीरा राणी...
जन्मा जन्मांतराचे अंतर, प्रेमाला कसले बंधन,
मनाचे येथे मिलन, प्रेम विश्वात मी रममाण...
विसरुनी अस्तित्व माझे, तव विश्वात मी रमली,
तुझ्याच कल्पनेत मी, माझी स्वप्ने वाहिली...
डोळे तुझे बोलती, स्पर्श तुझा सुखावती,
समजेल कोणा अपुले, स्वर्गीय प्रेम या धरती...
कोण नेईल दूर, तुज मज पासून,
कोण पुसेल छबी, तव मज हृदयातून...
म्हणतील आज जरी, मीरा ही प्रेम वेडी,
प्रेम अपुले आगळे, होईल अमर या जगती...
© चंदन सोनाये
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा