जुमले जमले, अन रंगले थोडे...

Submitted by सुर्या--- on 29 April, 2021 - 05:32

काही नवे काही जुने,
मित्र जमले धाब्यावर...

जुमले जमले अन रंगले थोड,,
आठवणीतल्या थांब्यावर...

जुमल्यांसंगे पिण्यासाठी,
बिअर, व्होडका, व्हिस्की आणि रम...

चाखण्यामध्ये चकली, चणे, चिकन
आणि भरपूर असा गम...

पॅक बनले, चिर्स झाले,
घोट मारले झमाझम...

कॉलेज life, गर्लफ्रेंड, नोकरी, लग्,,
विषय निघाले तंद्रीतच...

नशा डोक्यात भिनली तशी,
गाडी अडखळली मंदीतच...

जग आता फिरत होते गोल गोल भारी,
मित्र होते हवेतच, काय सांगू च्या मारी...

राजापासून मंत्र्यांपर्यंत सर्वच विषय चिंतेचे,
सर्वांची मते मिळाली, होतेच थोड्या गर्तेचे...

पोट भरून झाल्यावर वेळ होती pack to finish ची,
पुन्हा एकदा चिर्स झाले... अन वेळ झाली जाण्याची...

एकाचे चार दिसू लागल्यावर,
मित्र जमले कॉउंटरवर...

जुमले जमले अन रंगले थोडे,
आठवणीतल्या थांब्यावर...
© SURYAKANT_R.J.

Group content visibility: 
Public - accessible to all site users