पाटलीन बाईंनी आज दात नाही घासले...

Submitted by सुर्या--- on 29 April, 2021 - 04:54

सुचना:- कवितेचा हेतू मनोरंजनात्मक असून, यामध्ये कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. कृपया कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व.

पाटलीन बाईंनी आज दात नाही घासले,
दुर्गंधी खूप आली जेव्हा आ त्यांनी वासले,

रात्रीमध्ये पोरांची किरकिर फार झाली,
नवऱ्याच्या ही शिव्या खाऊन पाटलीन धन्य झाली,
सकाळ होता होता त्यांना झोप नाही आली,
कामासाठी जायाला घाई खूप झाली,

तोंडावर पाणी मारून पावडर लिपस्टिक थापली,
भरजरी साडी नेसून जाण्या सज्ज झाली,
जाता जाता रस्त्यामध्ये गाडी puncture झाली,
lift साठी रस्त्यामध्ये गाडी उभी केली,

मागून आला गावामधला हुशार सायकल वाला,
काहीच नाही म्हणून बाईंनी त्यालाच हात केला,
सायकल वाला खुश झाला मनामध्ये हसू लागला,
हुशारीने त्याने मग चौकशी ही केली,

आळस देण्या बाईंनी आ मग वासले,
वास घेऊन त्याचे मग गतप्राण झाले,
पाटलीन बाईंनी आज दात नाही घासले,
दुर्गंधी खूप आली जेव्हा आ त्यांनी वासले,
© SURYAKANT_R.J.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता वाचून हसू नाही आले पण तुमचा मशेरी प्रतिसाद वाचून हातातली कॉफी पडता पडता राहिली.. इतका हसलो...
-----त्या निमित्ताने का होईना कवितेचे सार्थक झाले.