तातडीची मदत हवी आहे.

Submitted by बोकलत on 28 April, 2021 - 05:01

कल्याणमध्ये खालील औषधाची तातडीने गरज आहे. कोणाला माहिती असल्यास कृपया 8779402763 या नंबरवर कळवा.
IMG_20210428_142537.jpgIMG_20210428_142507.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बोकलत, मी दोन तीन ठिकाणी चौकशी केली, म्हणजे खाजगी हॉस्पिटल जिथे माझ्या मम्मी पप्पांची ट्रीटमेंट झाली होती, आमचे फॅमिली डॉक आणि मेडिकल वाला, सगळ्यांचे म्हणणे हेच आहे की सध्या ही औषधे फक्त सरकारी रुग्णालयात मिळत आहेत. शक्य असल्यास मुंबईत शोधा कारण ठाणे अन उपनगरात स्टॉक येतच नाहीये.

शुभेच्छा☺️

बालीश वाटेल पण कल्याणमधील कोणी नगरसेवक किंवा आमदार ओळखीचे असल्यास त्यांना सांगा.आमच्या बिल्डींगमधल्याने तेच केले.रेमडिसीवर मिळवले.

स्थानिक नगरसेविकाकडे चौकशी करा. फोन लगेच उचलला जात नाही पण सातत्याने फोन लावा.
अशी वेळ कोणावर येऊ नये पण रूग्णाला सरकारी इस्पितळातच भरती करावे.

मला एक इमेज इथे टाकता येत नाहीये.माझी बहिण सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये जॉब करतेय..तिच्याकडून मिळालेली माहिती आहे.

आमच्या बिल्डींगमधल्या एका राजकीय कार्यकर्त्याने सांगितलेली माहिती अशी आहे -

राज्य सरकारच्या नियमानुसार राज्यातील प्रत्येक कोव्हिडं रुग्णालय (#सरकारी आणि #खाजगी ) जिथे आपले रुग्ण ऍडमिट आहेत त्यांच्या नातेवाईकांनी इंजेक्शन मिळवण्यासाठी आता गोंधळून घाबरून जाण्याची गरज नाही.

इंजेक्शन मिळवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे :

१. आपल्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

२. जिल्हाधिकारी कक्षातून सगळ्या सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलला Annexure A & B असे फॉर्म मिळालेले आहेत.

३. त्यानुसार आपले हॉस्पिटल किंवा आपले Treating Doctor आपल्या पेशंटच्या चालू कंडिशन वरून नक्की किती रेमडेसिविर लागतील हे ठरवून आपल्याकडून केवळ Annexure B हा फॉर्म भरून घेतील (Annexure A हॉस्पिटल स्वतः भरेल).

४. असे करून Annexure A आणि B हे दोन्ही भरलेले फॉर्म हॉस्पिटल स्टाफ स्वतः ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्याला इंजेक्शन मिळावे ह्या हेतूने आपल्या इतर कागदपत्रांसाहित (कॉविड रिपोर्ट, HRCT Report, हॉस्पिटल चे प्रिस्क्रिपशन,आधार कार्ड इ.) जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्याची व्यवस्था करेल इतकंच नाही तर याचा follow up सुद्धा हॉस्पिटल स्टाफ यांच्याकडेच असेल.

५. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकदा आपली इंजेक्शन ची request आल्यावर ते 60% प्रमाणे आपला कोटा FDA अधिकारी आणि रेम्डीशिवर चे अधिकृत विक्रेता यांचे मार्फत आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करतात.

६. आणि म्हणूनच आपण कोणीही त्रास घेऊ नका जो काही त्रास घ्यायचा आहे तो हॉस्पिटलचा स्टाफ घेईल.

७. ईथुनपुढे जर हॉस्पिटलमधून तुम्हाला रेमडेसिविर आणण्यासाठी त्रास देत असतील तर खाली दिलेल्या फोन नंबर वरून त्यांची लेखी आणि तोंडी तक्रार जिल्हाधिकारी यांना करावी.

माहितीसाठी / तक्रारीसाठी हेल्पलाईन खालीलप्रमाणे :

१. मुंबई जिल्हा - 022-22664232

२. मुंबई उपनगर : - 022-26556799 , 26556806

३. ठाणे जिल्हा : - 022-25301740 022-22027990

४. रायगड जिल्हा : - 02141-222118 02141-222097

वरती जरी रेमडेसिविरचा उल्लेख असला तरी रविवारी मी टॉसिलीझुमॅबसाठीच चौकशी केली होती ज्यावर त्यांनी ही माहिती पुरवली होती.

मी सिप्लाच्या टोलफ्रीवर कॉल केला असता ४ दिवसाचा वेटींग टाईम असल्याचा रेकॉर्डेड मेसेज ऐकवत होते.

दुपारी हा मेसेज वाचला तेव्हां आलेले सगळे व्हॉटसअ‍ॅप फॉर्वर्डस चेक केले. पण ते आपोआप डिलीट झालेत बहुतेक. Sad
एका मधे औषधे मिळत नसतील तर फोन नंबर्स दिलेले होते. पण ते पुण्याचे होते.
पुन्हा एकदा शोधून पाहते.

बोकलत यांच्या या आवाहनानुसार या औषधांचा तुटवडा झालेला आहे.
कोविड मधे उपयोगी पडणा-या औषधांबद्दलचे मेसेजेस व्हायरल होताहेत तस तसा औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे.
रूग्णांची वाढती संख्या हे प्रमुख कारण आहे. काळाबाजार हे दुसरे आणि तिसरे महत्वाचे कारण म्हणजे अनावश्यक जागृतीमुळे गरज नसताना लोक औषधांचा साठा करून ठेवत आहेत. यामुळे तुटवडा होण्याला हातभार लागत आहे.
तरी उद्देश कितीही चांगला असला तरी औषधांची माहिती देणारे मेसेजेस पुढे पाठवू नयेत ही विनंती. जी गोष्ट डॉक्टरने लिहून द्यायची आहे त्या माहितीचा सर्वसामान्यांना उपयोग नाही.

हो तुटवडा आहे.
आज ८०० डोस टॉसीलीझुमॅब महाराष्ट्राला मिळाल्याची बातमी आहे. पण वाटणी कशी होते बघावे लागेल.

उद्देश कितीही चांगला असला तरी औषधांची माहिती देणारे मेसेजेस पुढे पाठवू नयेत ही विनंती. जी गोष्ट डॉक्टरने लिहून द्यायची आहे त्या माहितीचा सर्वसामान्यांना उपयोग नाही.>>> +1111 सहमत

कोविड helpline guidebook

बोकलत, वरच्या लिंकमधील एक्सेल फाईलचा काही उपयोग झाला तर बघा. आत्तापर्यंत डोंबिवली कल्याणमधील आप्तांसाठी मदत शोधताना जमा केलेला डेटा या फाईलमध्ये सॉर्ट करुन सेव्ह केला आहे. इतरही कुणाला त्याचा उपयोग झाला तर उत्तमच

या मेसेज मध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन करून काही उपयोग झाला तर पहावा.

Chaitrali
*IMPORTANT*

Guys if any one is admitted in hospital for corona (covid 19) and doctor demanded for injection
1. remdesivir 100
2. Actimera 400
then please contact me.

The doctor ask us to arrange for the injection and it is not easily available in the market. Both injections are very costly. So if you need this injections then contact me.. I know exact place where you can find it out.
I will share the contact details with address
Take care

Deep shah
8097253459
8999375256
Contact Numbers for Remdesivir :

Hetero International & Cipla

Pankaj Thakur : +91 8433946055
Bhavesh Shah : +91 9821044912
Rudra : +91 9833809177
Subhadeep Sinha : +91 9393922434

Distributors for Remdesivir

1. Nexus : +91 9664400575
2. Royal : +91 9820344456

Supply strictly to Patients only after verifying prescription.

[05/07, 10:29 pm] +91 97682 83810: If any needs Hetero Remdesivir, please Email- covifor@heterohealthcare.com
Whatsapp- 9320985814
Call Helpline--
18001034696
[05/07, 11:06 pm] +91 97682 83810:

धन्यवाद कविन, तुम्ही दिलेली फाईल ऍक्सेस होत नाहीये. ओनरला रिक्वेस्ट सेंड केली आहे असा काहीतरी मेसेज येतोय.
धन्यवाद रानभुली.

बोकलत धन्यवाद एरर लक्षात आणून दिल्याबद्दल. फाईल ॲक्सेस सेटिंग्ज बदलून लिंक कोणालाही ॲक्सेस होईल असे बदल केले आहेत

पुढे काय झालं ? मिळाली कि नाही औषधे ? वरच्या फोन क्रमांकांचा उपयोग झाला का ?

ओळखीतल्या दहा बारा जणांचे प्राण वाचले. एकाला वानवडीच्या कमांड हॉस्पिटलमधे वेळेत हलवले. त्याचे नशीब जोरावर म्हणून व्हेंटीलेटर, ऑक्सीजन सगळे मिळाले. विशेष म्हणजे आम्ही ज्याला फोन लावले तो १५ दिवसांच्या सुटीवर आहे (तरी काम करतोच आहे). फोन बंद ठेवत असतो. त्या दिवशी रात्री दोन वाजता त्याने फोन चालू केला आणि आम्हा लोकांचा त्याच वेळेत फोन गेला.

राजकारण्यांना फोन केल्यावरही कुठेच बेड उपलब्ध होत नाही. एकाला अथक प्रयत्नानंतर निमशहरी भागात खासगी हॉस्पिटलमधे बेड मिळाला. पण असुविधांमुळे जीव गेला. आयुर्वेदीक / होमिओपॅथी डॉक्टरांनी टाकलेल्या हॉस्पिटलमधे प्रभावी उपचार होत नाहीत.

बोकलत, ट्विटर वर # महा कोव्हि ड वर सर्च करा. व तिथे ही लिहा. लवकर मदत मिळेल.