कोरोना,निवडणूक आयोग, आणि न्यायालय।

Submitted by ashokkabade67@g... on 27 April, 2021 - 03:22

कोरानान भारतात आपले रौद्ररुप दाखवत अनेकांचे बळी घेतले ,तर आरोग्य सेवेलाच आक्सिजनवर नेऊन ठेवले कुठे आँक्सिजन नाही तर कुठे बेडच शिल्लक नाही तर ईंजक्षणची अभावी ईंजेक्षणचाच काळाबाजार सुरु आहे दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप करत आहेत तर विरोधीपक्ष राजकारण करीत आहे, देशातील जनता मात्र वाऱ्यावर दैवाधिन आहे.
अशा भयानक स्थितीत न्यायालयाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला फक्त आणि फक्त निवडणूक आयोगाला जबाबदार धरत कानपिचक्या देत फटकारल आहे.तस पाहिले तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असुन वापर करण्याची प्रबळ ईच्छाशक्ती असेल तर खुपच अधिकार आयोगाला आहेत,पण सरकार कुणाच का असेना सिबिआय असो वा ईडी,वा असो निवडणूक आयोग प्रत्येक सरकार या संस्थेचा गैरवापरच करत आलेल आहे. निवडणूक आयोगाने सरकारचे हस्तक असल्याप्रमाणेच गेल्या सात वर्षात काम केले आहे अनेक निवडणुकीत गैरप्रकार झालेत तक्रारी ही झाल्यात पुढे कारवाई मात्र शुन्यच आणि यामुळेच प्रत्येक भारतीय नागरिकाचा न्यायालयावरच विश्वास आहे आणि अनेकवेळा तो सार्थही ठरला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने कोरोनाबाबत भाष्य करतांना निवडणूक आयोगाला धारेवर धरले.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणुका एक वा जास्तीत जास्त दोन टप्प्यात घेणे शक्य असतांनाही उगाच अनेक टप्पे करत का आणि कुणाच्या सोईसाठी लांबवल्यात हा प्रश्न आहेच. न्यायालयाने मणुष्यवधाचा गुन्हा का दाखल करु नये असा प्रश्न ही उपस्थित केला आहे,पण याला फक्त निवडणूक आयोगच जबाबदार आहे का? तर खरतर निवडणूक काळात कोरोना भयंकर रुप धारण करत असतांना प्रत्येक पक्षाला आणि नेत्याला निवडणूक ज्वर चढला होता पण कोरोनाचे भयानक रुप ज्याला भाजप पप्पू म्हणते त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपल्या सभा रद्द केल्यात पण त्यालाही वेळच लागला होता तोवर कोरोनाने भयंकर रुप धारण केले होते. खरतर न्यायालयाने फक्त निवडणूक आयोगालाच जबाबदार नधरता निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक पक्षाला,व मोठमोठ्या सभा घेणाऱ्या नी रोड शो करणाऱ्या प्रत्येक नेत्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कोरोनाच्या महामारीच्या प्रसारासाठी आणि कोरोनामुळे मरण पावलेल्या प्रत्येक भारतीयिच्या म्रुत्युसाठी जबाबदार धरुन त्यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यास भविष्यात अशा कठीण काळात सत्ताधारी व विरोधी पक्षांनी कसे वागावे याचा धडा मिळेल.आणि निवडणूक आयोगालाही स्वताच्या जबाबदारीची जाणीव होईल।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कोर्टाच्या हाताला खाज सुटली आहे

मोदी शहा आता त्याला राज्यसभेचे पद , राज्यपाल पद वगैरे आमिष दाखवेल , मग ते कोर्ट थंड पडेल

राम मंदिर निकाल दिलेला जज कुठेतरी लोकपाल झाला म्हणे , रिटायर झाल्यावर लगेच म्हणे

लोकसत्ता च्या अग्रलेखात बोबड्याची बोबडी वळवली आहे. असा माणुस त्या पदावर असेल तर काय होऊ शकते तेच दिसले.

फक्त निवडणूक आयोगाला दोष देता येणार नाही. सगळी जबाबदारी कुणावर तरी ढकलायची आणि मुख्य गुन्हेगार मोकळेच.

मेगा सुपर स्प्रेडर कुंभमेळा याला परवानगी कशी मिळाली, कुणी दिली ?
https://www.freepressjournal.in/india/despite-hundreds-of-devotees-testi...

गेले काही दिवस दररोज ३५०,००० नवे रुग्ण तयार होत आहेत, आणि २५०० लोक प्राणास मुकत आहेत. मृतांचा आकडा (जाहिर केलेल्या आकड्यांपेक्षाही) अनेक पटींनी जास्त आहे. पण आज २७ एप्रिल, शाही स्नान झाले... किती हजार/ लाख सहभागी झाले?

https://www.freepressjournal.in/viral/twitterati-enraged-at-kumbhs-last-...

परिस्थिती बिघडत असल्याचे अनेक इंडिकेटर्स मिळाले होते. पण संपुर्ण दुर्लक्ष केले. who cares?
कोरोना ची दुसरी लाट टाळता येणे शक्य नव्हते पण थोडी जागरुकता ठेवली असती तर त्याची दाहकता कमी करणे सहज शक्य होते.

काल भारतात ३ लाख ६२ हजार इतकी उच्चांकी बाधीत वाढ झाली आहे तर ३२८५ इतकी जगातील सर्वात जास्त मृत्यु देखिल भारतात झाले आहेत.

आय.आय.टी. खरगपूर मधील संशोधकांनी काढलेल्या अनुमाना नुसार १५ मे २०२१ पर्यंत दुसर्‍या लाटेचा उच्चांक होईल त्यावेळॅस रोजची बाधीत वाढ साडेचार लाखांच्या घरात असेल. त्यानंतर लाट ओसरू लागेल.

एकंदरीत भाजप्यांना अन फेकुला बंगाल मधे १००+ सिट्स मिळण्याशी कारण.. त्यानंतर ते तृणमुलचे आमदार पी.एम. केअर फंडातील रकमेने विकत घेऊन बंगाल ताब्यात घेतील. सामान्य जनता मरेल कोरोना....कोरोना.... करत.... हु केअर्स..!