अपराधी कोण? - भाग 4

Submitted by ShabdVarsha on 26 April, 2021 - 05:40
 ShabdVarsha,अपराधी कोण?

अपराधी कोण ? ( भाग 4 )

शनिवारचा दिवस होता.
दुपारचे बारा वाजले होते.आई किचनमध्ये, मानवी फोनवर तर मयंग हॉलमध्ये टिव्ही बघत बसला होता.
मानवी दरवाजाकडे बघून जवळपास ओरडलीच...
"शशांक तुम्ही असे अचानक? मला कळवलं देखील नाही."
"हो माझं काम झालं. म्हटलं चला सर्वाना सरप्राइज द्यावं." शशांक आत येत म्हणाला व मयंगच्या बाजूला बसला.
एकही शब्द न बोलता...
"तुम्ही दोघे इतके गप्प का?" मानवी शशांकला पाणी देत म्हणाली.
"काही नाही मनु,  बस असच थकलोय थोडा,न बाकी काही नाही."
"ठीक आहे." मानवीने खांदे उडवले.
मयंगला अगोदरच थोडी कल्पना होती शशांक बोलणार नाही...
... पण ज्या वेळेस बोलेल तेव्हा प्रश्नाच्या तोफा घेऊन उभा राहील.
   जवळपास तासाभराने मानवीने शशांकला उठवले.  तो फ्रेश होऊन हॉलमध्ये आला. तितक्यात साहिलही आला
"शशांक तू कधी आलास?"
"बराच वेळ झाला."
"साहिल दादा अगदी वेळेवर आला आहेस.आम्ही जेवयलाच बसणार होतो,आता तु पण बस मी बाबांना घेवून येते."
"ठीक आहे मनू. "
जेवणे झालीत.
मानवी व आई सर्व कामे आवरून थोडावेळ आराम करण्यासाठी निघाल्या.
"साहिल, मयंग जरा रूम मध्ये ये." शशांक जरा रागातच बोलला.
साहिल,शशांक व मयंग तिघे मयंगच्या रूम मध्ये गेले.काही क्षण तिथे शांतता पसरली.
"काय चुकलं आमचं मयंग सांगशील? का असा वागलास? मी तुला जातानाच सांगून गेलो होतो काहीही प्रॉब्लेम असेल तर कॉल कर."
शशांकची सरबत्ती चालू झाली.
"Sorry Sorry !!!!! शशांक,साहिल मला माफ करा.मी चुकलो. नकळत पणे माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला असता."
   "अरे!!! असं झालं तरी काय? साहिल सांगत होता रश्मी तुला कंपनीजवळ भेटली.ती काही बोली का?"
  शशांकचा रागाचा पारा चढला होता.मयंग हलक्या स्वरातच बोलला...
"मी त्या दिवशी घरी येण्यास निघालो तर गेट वर रश्मी भेटली.तिनेही मला बघीतले मी म्हटलं आता बघून न बोलता निघून कसे जावे.मी बोलण्यासाठी पुढे झालो तोच आमच्या कंपनीत असणारा विराज तिथे आला. तो रश्मीचा होणारा नवरा आहे.रश्मीनेच मला त्याची ओळख करूण दिली व मला लग्नासाठी आमत्रिंत देखील केले..."
हे सर्व बोलत असतांना मयंगचे अश्रु थाबायचं नाव घेत नव्हते.
"तिच्यासाठी इतकं सोप होतं का सर्व? ती ज्या पद्धतीने विराज बद्दल सांगत होती ते ऐकूण मला जाणवलं ती तेव्हाच मला विसरली.मला वाटलचं नाही ती तीच रश्मी आहे जिच्यासोबत मी दोन वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो. तिच्या सोबत मी संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याची स्वप्न रंगवले होते ...." मयंग तिथेच थांबला...
"म्हणजे तु केवळ यासाठी असं केलसं का मयंग?"
"नाही शशांक तिचं लग्न ठरलय हे चार महिन्यापूर्वीच आपल्याला तिने स्वतःहून सागितले होते.म्हणून तर आम्ही वेगळे झालो .
परंतू त्या अगोदर कित्येक वेळा मी तिला सांगितलं मी बोलतो तुझ्या बाबांशी तर ती बाबा नाही ऐकणार म्हणायची. कारण तुझ्याकडे चांगली नोकरी नाही. मी तिला किती समजावले हे तुम्हाला चांगले माहीत आहे. तिला कित्येक वेळा बोललो हव तर मी माझ्या बाबांशी बोलतो ते येतील तुझ्या घरी.तरी तिने एेकले नाही, नंतर मलाच वाटले खरचं नसेल मान्य तिच्या घरी.मी तिला काहीही करूण तीन महिने थांब सांगितले तिने त्यालाही बाबा नाही ऐकत म्हणून स्पष्ट नकार दिला. कदाचीत माझ्याकडे नोकरी नाही म्हणून नकार असावा तिच्या घरच्यांचा .म्हणून मी कसातरी सावरत होतो यातून पण पूर्ण पणे बाहेर पडणे मला अवघड होत होते तिच्या आठवणी माझ्या मनाला पोखरत होत्या...."
"त्या दिवशी मला वाटलंच नाही ती तीच रश्मी आहे जिच्यावर माझं जिवापाड प्रेम होतं. मला जाणवलं ती खूष आहे तिच्या आयुष्यात मी नसलो तरी कुठलाच फरक पडत नाही. तीच गोष्ट मला खूप खटकली.
मला जाणून घ्यायचं होतं रश्मी खरचं आनंदी आहे का? का फक्त मला त्रास होवू नये म्हणून ती आनंदी असल्याचं ढोंग करत होती.
बरीच अशी विचारपूस करूण मला समजलं विराज हा तिच्या आई बाबांची पसंती नसून तिची स्वत:ची पसंती आहे.रश्मीला एक श्रीमंत मुलगा हवा होता.हे ऐकताच माझ्या पाया खालची जमीन सरकली. मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं रश्मी असं करेल...
माझं मन तर म्हणायचं हे सर्व खोटं आहे परंतू नंतर मी नीट विचार केला रश्मी खूपदा बोलली होती तिला अस घर हवं अशी नोकरी हवी बंगला हवा कार हवी घरात नोकर देखील हवा म्हणजे आयुष्यात तडजोड नको .यातली नेमकी माझ्याकडे चांगली नोकरी नव्हती .त्यावर मी हसून दिलं होतं आणि वचन दिलं होतं मी तिला काहीही कमी पडू देणार नाही.
या दोन वर्षात तिने एकदा ही तिच्या बाबांची माझी भेट करून दिली नाही मी कित्येक वेळा आग्रह करून देखील .
बस हीच गोष्ट मला सलत गेली मी खूप विचार केला रश्मीने असं का केलं मी तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो ...
दुसरी गोष्ट मला खटकली ती रश्मीच्या नवऱ्याचं म्हणजे विराजचं आमच्या कंपनीत काम करणं! त्याच्या असल्याने मला रोज जाणवलं असतं केवळ चांगली नोकरी उशिरा भेटल्याने व माझ्यापेक्षा श्रीमंत मुलगा भेटला म्हणून रश्मीने मला नकार दिला.
याच गोष्टीचा मला खूप वैताग आला.
गेल्या चार महिन्यापासून तिला विसरण्याचा प्रयत्न करतोय तिने आज हृदयावर घाव केला.
मला नोकरी का उशिरा मिळाली ? रश्मीचं खरचं माझ्यावर प्रेम होतं का?असे नको नको ते प्रश्न मला सतावत गेले...
शरीरावर झालेली प्रत्येक जखम भरून निघते, पण मनावर  झालेली जखम मात्र कधीच मिळून येत नाही."
मयंग आता शांत झाला होता परंतू त्याचे अश्रू काही शांत होत नव्हते .......

क्रमश:
- शब्दवर्षा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मनूप्रिया
@अज्ञातवासी
मनस्वी आभार !!

छान...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.!