आज प्रेम हसला... मनात धसका बसला...

Submitted by सुर्या--- on 23 April, 2021 - 04:44

खूप दिवसांपासून मी पाठी होतो फिरत...
दाद नव्हती मिळत की... नजरेत नव्हतो भरत?
आज प्रेम हसला... मनात धसका बसला...
नाव गाव विचारलं तर गालात चपराक बसला...
गालावरती हात ठेवून तिथून पळ काढला...
आता ठरवलं मनामध्ये नको प्रेमाचे नाव...
दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरु लपाछपीचे डाव...
मला पाहून तीच हसणं...
अन क्षणात गायब होणं...
रोज नवे प्रयोग तिच्या नजरेत भरण्यासाठी...
जसे तिच्यासमोर बसणं...
कॉलेज मधून परतताना मागे मागे जाणं...
असाच एक दिवस मी पाठलाग तिचा केला...
hotel मध्ये तिने म्हणे lunch कुणासोबत केला...
डोक्यातून थोडा सटकलो...
अन समोर जाऊन उभा ठाकलो...
भाऊ तिचा मिलिटरीवाला...
आडवा पाडून जाम चोपला...
कंबरेवर हात ठेऊन घर कसबस गाठल...
घरी कळवलं, गाडीवरून मित्रानच पाडलं...
काही दिवस आराम करून... पुन्हा कॉलेज गाठल...
पुन्हा नाही होणार म्हणून sorry तिला म्हंटल...
माझ्या sorry ने आता मारला होता सिक्सर...
प्रेमाकडून गोड हासूने मिळालं होत उत्तर...
© SURYAKANT_R.J.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users