तुझ्या नकळत तुला चोरून नेऊ का ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 April, 2021 - 07:48

लगे हाथो जरासा चान्स घेऊ का ?
तुझ्या नकळत तुला चोरून नेऊ का ?

तिळाला लपवले आहे तुझ्यासाठी
तुझा आहे तुला देवून येऊ का ?

मलाही पाहिजे आहे तुझी ईदी
तुझ्या देशातल्या रोज्यास ठेऊ का ?

तसा प्रत्यक्ष नाही योग जुळला तर !
तुझे दर्शन तुला स्वप्नात देऊ का ?

कपाळावर कदाचित गोंदले माझ्या
तुझ्या नावे पुन्हा कुमकूम लेऊ का ?

कितीदा उठवले ताटावरुन भरल्या
नशीबा पोटभर जेऊन घेऊ का ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईदी म्हणजे ?
कितीदा उठवले ताटावरुन भरल्या
नशीबा पोटभर जेऊन घेऊ का ?>>> हा शेर विशेष आवडला.

जे रोजा ठेवतात त्यांना ईद ज्या दिवशी असेल त्या दिवशी इतरांनी काहीतरी बक्षिसी द्यायची

धन्यवाद आनंद, गणक

जे रोजा ठेवतात त्यांना ईद ज्या दिवशी असेल त्या दिवशी इतरांनी काहीतरी बक्षिसी द्यायची>>> हे माहिती नव्हतं. धन्यवाद.