Submitted by चंदन सोनाये on 18 April, 2021 - 02:05
तगमग
काय कराल माणुसकीचे,
नाही उरला जिथे माणूस,
आहे जोवरी जीव जगात,
करा माणुसकीची मशागत...
आज आहे बोलत जो,
कशावरून राहील उद्या,
द्यायचे बाकी ठेवू नका,
आजची सारे प्रेम द्या...
दोन गोड शब्द थोडा वेळ,
यापरीस हवे असते काय कोणास,
हे ही नसेल शक्य तर,
काय अर्थ राहिला जीवनास...
स्वार्थ ठेवून थोडा बाजूला,
कर मदत कधी कोणाला,
दुसऱ्यांसाठी मोडा मनाला,
करा आनंदी कोण्या जीवाला...
एकदा गेला तो जीव मग,
काय करू शकाल नंतर,
करायचे काही जाता राहून,
राहील मनाची मग तगमग...
@चंदन सोनाये
१८ एप्रिल २०२१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
आजकाल अशीच परिस्थिती आहे.. सर्वत्रच
सुंदर कविता
सुंदर कविता