हमसे आया ना गया, तुमसे बुलाया ना गया .......

Submitted by इकेबाना on 17 April, 2021 - 10:25

हमसे आया ना गया, तुमसे बुलाया ना गया .......

ऑस्ट्रियातली इन्सब्रुक शहरात संध्याकाळचे ६ वाजले होते, सूर्यास्त झाला असल्याने अंधार पसरायला लागला होता. शहरातील मध्यवर्तीचा भाग दिव्यांनी उजळून निघाला होता. शहराच्या मधून वाहणारी नदी आता गोठली होती पण त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हॉटेलच्या पाटीयो वर लोक मस्त एन्जॉय करत होते.
सौमित्र आणि शाल्मली अश्याच एका हॉटेलच्या पाटीयोत बसले होते. समोर दोघांच्या ग्लासमध्ये वाईन होती. टेबलावर ठेवलेल्या दिव्याचा मंद प्रकाश त्या ग्लासेस मधल्या वाईनच्या रंगात मिसळत होता. सौमित्र आणि शाल्मलीनि ग्लासेस उचलले आणि एकमेकांना चियर्स म्हणत वाईनचा आस्वाद घेतला " आपल्या सुंदर भविष्यासाठी चियर्स" म्हणत ग्लास एकमेकांच्या ग्लासना नाजूकपणे टेकवले..
दोघेही समोरासमोर न बसता बाजूबाजूला एकमेकांना लगटून बसले होते जणू समोर बसण्याएव्हढा दुरावाही त्यांना आता सहन होत नव्हता. दोघेही एकमेकांकडे अत्यंत प्रेमाने बघत होते " सर असे काय बघता... नको ना मला कसे तरी होतंय " शाल्मली सौमित्रच्या खांद्यावर डोके घुसळत लडिवाळपणे उद्गारली. सौमित्राने तिच्याकडे खोट्याखोट्या रागाने बघितले " आता तरी सर नको म्हणू ... एव्हढा चांगलं सौमित्र नाव आहे, सौमी म्हण किंवा फक्त तुला आवडतं तसे नुसतं मित्र म्हण... मला अनु आणि रियाने सगळं सांगितलंय" असे म्हणत दोघे खळखळून हसले. त्या ऑस्ट्रियातल्या थंडीत ती त्याची "शाल" होती तर तो तिचा हृदयातला "मित्र". सौमित्राने शाल्मलीचा हात घट्ट धरला होता. गेल्या काही दिवसात घडलेल्या प्रसंगाने त्या दोघांचे आयुष्य पार बदलून गेले होतं. दोन महिन्यांपूर्वी त्यांना जर का कोणी त्या दोघांच्या ऑस्ट्रियामधल्या हनिमून बद्दल सांगितले असते तर त्यांनी वेड्यातच काढले असते. ते आठवून सौमित्र मिश्कीलपणे म्हणाला "पण काहीही म्हण, .... आपल्याला थोडा उशिराच झाला नाही का शाल ....." शाल्मली लटक्या रागाने "थोडा ... ह्याला थोडा म्हणतात ... तोही तूझ्यामुळे, पूर्णपणे तुझीच चूक होती" "फक्त माझीच का म्हणून तुझीपण चूक ...हा हा हा " सौमित्रने दिलखुलास हसत तिला जवळ ओढले " पण जाऊन दे, म्हणतात ना देर आये दुरुस्त आये" तो खोटाखोटा राग, गालावर खुललेले गुलाब त्यादिवशी त्या वाईनच्या ग्लासात विरघळून गेले. आणि अजून एक गोष्ट त्या वाईनमध्ये विरघळून गेली... ती म्हणजे आयुष्यातून निसटून गेलेली ती १५ वर्षे

पंधरा वर्षात खूप काही बदलले होते. वर्गातली सगळी मुले करियर आणि जीवनाच्या प्रवासात विखुरली होती. चारपाच जण अजूनही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यातील कोणीतरी फेसबुक/व्हाट्सअँप ग्रुपची टूम काढली आणि MJ-२००२ नावाचा ग्रुप तयार झाला आणि मग मित्र मैत्रिणींची शोधाशोध सुरु झाली. बरेचसे जण सापडले आणि मग दर आठवड्याला महिन्याला सगळ्यांचे फोन, ईमेल ची देवाणघेवाण सुरु झाली. अनु बंगलोरच्या कंपनीत कामाला होती आणि दोन मुलांची आई होती, रिया दिल्लीला होती ...बाकीचे असेच पुणे मुंबई बंगलोर चेन्नई तर काही सिंगापुर,लंडन . शाल्मली आता अमेरिकेत सियाटल शहरात स्थाईक झाली होती. काही महिन्यातच सगळ्यांचे भेटायचे अशी चर्चा सुरु झाली. अनु, रिया आणि शाल्मली घट्ट मैत्रिणी तेव्हा त्यांनाही भेटावेसे वाटत होते. जेव्हा सगळ्यांनी येत्या दिवाळीच्या सुट्टीत एका दिवशी भेटायचे ठरवले तेव्हा अनु आणि रियानी शाल्मलीला येण्यासाठी गळ घातली. शाल्मलीच्या सुट्ट्या उरल्या होत्या आणि दिवाळी उरकून डिसेम्बरमध्ये परत परत येता आले असते जेव्हा बाकी सगळे ख्रिसमसची सुट्टी घ्यायचे. शाल्मलीनि रजा टाकली, भारताबाहेर राहणाऱ्या बाकीच्या लोकांनीपण यायचे ठरवले होते. त्यामुळे सगळ्यांनी भेटून धमाल करायची असे ठरवले होते.आणि सगळ्या ग्रुप मध्ये भेटल्यावर कायकाय करायचे याच्यावर चर्चेला उधाण आले. थोड्या कुरबुरी रूसवेफ़ुगवेपण झाले पण दोन गोष्टीबद्दल संपूर्ण संमती होती. एक तर कॉलेजला जायचे आणि त्यांच्या तेव्हाच्या हिरोला म्हणजे सौमित्र सरांना भेटायचे. रियाने लिंकडीन वरून माहिती काढली की सर भारतातच आहेत आणि चक्क मुंबईतच आहेत. ते आता इन्फोसिस मध्ये VP होते आणि अजूनही तसेच हँडसम आहेत. तिने सरांना विचारले, ते त्या दिवशी मुंबईतच असणार होते आणि त्यांनाही सगळ्यांना भेटायला आवडले असते. सगळी तयारी झाली होती, सगळे जण भेटायला अगदी आतुर झाले होते. कॉलेजमध्ये जाऊन आल्यावर एका हॉटेलमध्ये पार्टी रूम बुक केली होती.
शाल्मली भारतात पोचली, एक दिवस विश्रांती घेतली आणि पार्टीची तयारी सुरु केली. सगळे ठरल्याप्रमाणे कॉलेजवर भेटले,आपल्या जुन्या वर्गात गेले, कॉम्पुटर सेन्टरमध्ये गेले, छान छान फोटो काढले आणि मग सगळे हॉटेल मध्ये गेले. सौमित्रला यायला थोडा उशीरच झाला पण सर आल्यावर परत सगळे जण फॉर्मात आले. सौमित्रने सगळ्यांशी हस्तांदोलन केले. शाल्मली आणि सौमित्रनी एकमेकांकडे पाहिले आणि शेकहॅण्ड केला. दोघांची नजर आणि हात जरा जास्तच रेंगाळले. पार्टी संपल्यावर रात्री सगळे आपापल्या घरी निघाले. सौमित्राने शाल्मलीला ड्रॉप करायची ऑफर दिले आणि तिने ती लगेच मान्यही केली.

M S कॉलेजच्या आवारात आज खूप गर्दी होती. नवीन वर्ष सुरु होत होते, त्यामुळे मुलामुलींचे घोळके आवारात जागोजागी दिसत होते. कॉलेजात बरेच कोर्सेस होते पण त्यातला सगळ्यात एक नंबर होता BCM कोर्स त्याच्याकरता कॉलेज मुंबईत पहिल्या दहामध्ये गणला जात होतं. हा कोर्स केला की चांगल्या सॉफवेअर कंपनीमध्ये नोकरी पक्की समजली जायची त्यामुळे कॉलेजच्या पहिल्याच दिवशी सगळी मुलं हवेत तरंगत होती. आठ वाजता पहिलं लेक्चर होत. त्यामुळे सगळी मुलं दिलेल्या वर्गात जाऊन बसली होती. तर दुसरीकडे शाल्मली स्वतःलाच शिव्या देत आपली स्कुटर ढकलत होती. आदल्यादिवशी बाबानी पेट्रोल भरण्याविषयी सांगितले पण होते पण ती विसरली. ती सकाळी छानपैकी तयार झाली, तिचे कुरळे केस तिने नुकतेच प्लम स्टाईलमध्ये कापले होते. तिला आवडणारी जीन्स आणि लेमन कलरच्या टॉप मध्ये अतिशय सुरेख दिसत होती. ठरल्याप्रमाणे वेळेवर घरातून निघाली आणि कॉलेजपासून ५ मिनिटावर असताना स्कुटरचे पेट्रोल संपले. तरी बर जवळच पेट्रोल पंप होता. स्वतःला शिव्या देत तिने कशीबशी स्कुटर तिथपर्यंत ढकलत नेली, पेट्रोल भरले आणि कॉलेजला पोचली. पार्किंगमध्ये स्कुटर लावून ती धावतच कॉलेजात शिरली आणि समोरून येणाऱ्या माणसावर धडकली. तिच्या हातातील हावरसॅक आणि मोबाईल खाली पडला. आधीच कॉलेजचा पहिला दिवस, त्यात उशीर झालेला आणि त्यात अशी लागलेली धडक त्यामुळे शाल्मलीची जणू सटकलीच. "बघून चालत येत नाही का? डोळे दिलेत की नाही देवाने ?" तिने समोरच्या व्यक्तीला ना बघताच फैलावर घेतले, तो तरुण मुलगा बिचारा काहीच म्हणाला नाही, उलट स्वतःच सॉरी म्हणाला, तिला तिचा मोबाईल उचलून दिला. "फर्स्ट ईयर स्टुडंट ना ... कुठची डिव्हिजन ... हा इथून पुढे रूम १-१२ " असे तिला सांगून मंद स्मित करत निघून गेला. शाल्मलीला फारसा विचार करायला वेळच मिळाला नाही कारण पहिलं IT Fundamental च लेक्चर सुरु होऊन ३० मिनिटे झाली होती. ती धावतच वर्गात शिरली, प्रोफेसर ना सॉरी म्हणून आत जाऊन बसली. आतमध्ये बसल्यावर जरा तिला शांतपणे स्वास घ्यायला, सावरायला वेळ मिळाला. थोड्या वेळात लेक्चर संपले आणि दुसरे लेक्चरर यायला ५ मिनिटे होती तेव्हढ्यात तिने स्वतःला सावरले, पाणी प्यायले, केस नीट केले ... आणि आधीच्या लेक्चरच्या नोट्स साठी मैत्रिणीशी पाठीमागे बोलत होती तेव्हढ्यात वर्गात शांतता पसरली. दुसरे लेक्चरर आले होते ..म्हणून ती नीट सरळ होऊन बसली आणि पुढे बघते तर काय..... तिला आश्चर्याचा धक्का बसला. ते लेक्चरर दुसरे तिसरे कोणी नसून काही मिनिटांपूर्वी तिला धडकणारा तरुण होता. लेक्चरर स्वतःची ओळख करून देत होते.. सौमित्र रेगे BE, MCA झाल्यावर TCS सारख्या मोठ्या कंपनीमध्ये ६-७ वर्ष काम सध्या प्रोजेक्ट मॅनेजर पदावर आणि कॉलेजमध्ये सध्या लेक्चरर मिळत नव्हता आणि शिकवायची आवड म्हणून गेस्ट लेक्टरर म्हणून येत होता. सौमित्राने वर्गावरून नजर फिरवली, शाल्मली लपायला प्रयत्न करत होती पण तरी शेवटी दोघांची नजरानजर झालीच. त्याने त्याचे मंद स्मित कायम ठेवले होते पण शाल्मलीला शरमल्यासारखे झाले. आज आपण आपल्याच लेक्चररला झापले, आता आपले काही खरे नाही, काहीही करून त्यांना सॉरी म्हटले पाहिजे असा विचार करून ती मध्ये १५ मिनिटाची सुट्टी होती त्यात लेक्चरर रूममध्ये घाईघाईत यायला निघाली. ती लेक्चरर रूम मध्ये पोचल्यावर तिला कळले की सौमित्र तिथे थांबत नाहीत, लेक्चर संपल्यावर लगेच ऑफिसला निघून जातात. तो तशीच हळहळत परत आली. दुसऱ्या दिवशी काही करून त्यांना गाठायचे असे ठरवून आली. लेक्चर संपल्यावर सौमित्र लगेच वर्गाबाहेर आला. शाल्मली पाचव्या सहाव्या बेंचवर होती, त्याला गाठायला ती उठली पण बाकी सगळी मुले मध्ये दंगा करायला लागली होती आणि तिला पटकन बाहेर पडता आले नाही. आजतरी आपण सौमित्रला सॉरी म्हटलेच पाहिजे ह्या विचारात ती धावतच वर्गाबाहेर पडली आणि परत एकदा कोपऱ्यावर कोणाशीतरी बोलत असलेल्या सौमित्रावर जाऊन आदळली. सौमित्र दचकलाच पण शाल्मली परत शरमिंदी झाली. "आपण नेहेमी असे एकमेकांवर आदळत का असतो ?" सौमित्र मिश्कीलपणे म्हणाला. शाल्मलीला इकडे मेल्याहून मेल्यासारखे झाले. "नाही सर मी तुम्हाला कालच्या प्रसंगाबद्दल सॉरी म्हणायलाच येत होते. " शाल्मलीला शब्द सापडत नव्हते, मिळाले तरी ओठातून फुटत नव्हते. सौमित्र मात्र मान खाली घालून घाबरलेल्या शरमिंदी झालेल्या शाल्मलीकडे हसत बघत होता.
त्या दिवशी सौमित्र आणि शाल्मली दोघेही शांतपणे झोपू शकले नाहीत. त्यांना राहून राहून गेल्या दोन दिवसातल्या त्यांच्या भेटी आठवत होत्या. सौमित्र, तरुण देखणा होताच, शांत स्वभाव ,ओठांवर मंद स्मित जे शाल्मलीच्या डोळ्यासमोर सारखे येत होते. त्याची बोलण्याची अदा, एखादा कठीणातला कठीण विषय सोप्पे करून सांगायची कला तिला खूप आवडली होती. शाल्मलीचे ते पहिल्या दिवशीचे रूप, रागावल्यामुळे आणि धावत आल्यामुळे लाल झालेला तिचा चेहरा, धपापत असलेले उर, खाली पडलेले सामान उचलताना डोळ्यावर आलेले कुरळे केस. हे सगळे जणू एखाद्या पिक्चर प्रमाणे सौमित्र मनांतल्या मनात परत परत बघत होता.
कॉलेजची लेक्चर प्रॅक्टिकल सुरु झाली, असाइनमेंट , परीक्षा ह्यात शाल्मलीचा वेळ कसा जायचा कळत नव्हते. सौमित्रपण त्याच्या नोकरीतल्या प्रोजेक्टमध्ये, लेक्चरमध्ये बिझी होता. पण दोघांना हुरहूर असायची ती त्या रोजच्या लेक्चरची जेव्हा ती दोघे एकमेकांना डोळेभरून बघायची जणू साठवून घ्यायची. ती त्याच्याबद्दल अजून माहिती काढायची. त्याला मदन मोहनची गाणी आवडायची, त्याला गोड़ आवडायचे. त्याला कधीही अमेरिकेला जाणे शक्य होते पण घरात म्हातारी आजी होती. तिला टाकून त्याला जायचे नव्हते. हे जेव्हा शाल्मलीला समजले तेव्हा तिच्या मनात त्याच्या बद्दलचा आदर अजून वाढला. मुलांना सौमित्रचे शिकवणे आवडायचे , तरुण असल्याने कपडे मुलांना आवडतील असेच घालायचा त्यामुळे तो तर मुलांच्या गळ्यातला ताईत झाला होता. सौमित्र सर म्हणजे त्यांचे हिरो होते. आणि शाल्मलीला तर तो त्याहीपेक्षा अधिक वाटायचा. त्याच्यासाठीही शाल्मली नुसती स्टुडंट नव्हती. म्हणता म्हणता दिवस कसे गेले कळलेच नाही, म्हणतात ना चांगले दिवस पटकन जातात. आज बोलू उद्या बोलू असे म्हणून दोघांनी एकमेकाला त्यांच्या भावना कधी सांगितल्या नाहीत.
शाल्मलीला कधी डिग्री मिळाली कधी नोकरी मिळाली कळलेच नाही. शाल्मली तश्या सगळ्या घडामोडी सौमित्राला येऊन सांगायची त्याचा सल्ला घ्यायची. नोकरी लागल्या लागल्या शाल्मलीला ४-६ महिन्यात अमेरिकेत १ वर्ष जायची संधी मिळाली. पुढे काय करू? अमेरिकेत जावे का? सरांचा सल्ला घ्यावा म्हणून सौमित्राला भेटली. त्यादिवशी दोघे तिच्या करियर मिळालेल्या संधीविषयी बोलत होते पण दोघांचे डोळे, दोघांची मने एकमेकाला काहीतरी वेगळेच विचारात होते. तिचे डोळे त्याला सांगत होते " मित्रा अरे मला थांबवा ना , फक्त एकदा थांब म्हण, फक्त एकदा , मी नाही जाणार" तर त्याचे तिला विचारात होते " मी तर तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे, ... माझ्या भावना कळतील का तिला , ... ती थांबेल का? तिचे घरातले काय म्हणतील? सगळ्यांना जुगारून माझ्याबरोबर द्यायची हिम्मत करशील?" पण दोघांना एकमेकांविषयी असलेल्या भावना कळत होत्या पण दोघांपैकी कोणीच मनातले बोलू शकले नाही. सौमित्राने शाल्मलीला बेस्ट लक देण्यासाठी हात मिळवला आणि बराच वेळ तसाच हात हातात ठेवून ते बोलत होते जणू दोघांनाही हात सोडण्याची इच्छा नव्हती. दुसर्याने नाही म्हटले तर आपण एकमेकांना गमावून बसू ह्या एका अनामिक भीतीमुळे ते त्यांच्या मनातल्या भावना ओठावर आणू शकले नाहीत. मनातले मनातच राहून गेले, उरली ती फक्त खंत…………

पार्टी संपून निघेपर्यंत रात्रीचे १० झाले होते, सौमित्र गाडी चालवत होता. दोघांमध्ये एका विचित्र शांतता होती , कुठून बोलायला सुरवात करावी कोणी करायची हा मोठा प्रश्न होता. शांतता भंग करण्यासाठी सौमित्राने रेडिओ FM लावला. सौमित्राने बोलायला सुरवात केली " कशी आहेस ? घरी सगळे कसे आहेत? तू अगदी बदलली नाहीस, पूर्वी होतीस तशीच आहेस "
शाल्मलीने सुद्धा बोलायला सुरवात केली "मी मस्त , सिएटल ला असते, आई बाबा मी अमेरिकेला गेल्यावर २-३ वर्षातच गेले . दादा पुण्यात असतो. तुमच्या साठी तुम्हाला आवडणारी वाईन आणली आहे. तुम्हीपण नाही बदलला, फक्त केसात थोडी चांदी आली आहे , बाकी तुम्ही कसे आहेत ? घरी कोणकोण असते "
" आज्जीला जाऊन ९ वर्ष झाली. मी इथेच मुंबईत एकटाच असतो बाकी कोणी नाही . तुझ्या घरी सियाटलला कोणकोण ?"
"मीपण एकटीच आहे, लग्न नाही केलं मी "
रेडिओ वर जुनी गाणी चालू झाली होती आणि यादोंक कारवा च्या कार्यक्रमात चक्क त्याच्या आवडीची मदन मोहनची गाणी लावत होते "तुम जो मिल गये हो, तो ये लगता है, के जहाँ मिल गया " चे सूर गाडीत भरले आणि जणू दोघांच्या मनात भावनांचे वर्षानु वर्ष धरून ठेवलेले बांध फुटले.

मरिन ड्राईव्हच्या एका हॉटेल मध्ये शाल्मली आणि सौमित्र बसले होते."घरी जायच्या ऐवजी थोडी कॉफी घेऊया का ? थोडे बोलत बसुया" सौमित्राने तिला विचारले. शाल्मलीने हसून उत्तर दिलं "नो प्रॉब्लेम, जाऊया की, आपण दोघेही कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही किंवा आपली घरी कोणी वाटही पाहत नाहीये ". हवा चांगली होती तेव्हा दोघे बाहेरच बसले होते. दोघांनी कॉफी घेतली होती." "एका विचारू शाल्मली " शाल्मलीने डोळ्यानेच अनुमती दिली "तू अमेरिकेतून परत का नाही आलीस ?". शाल्मलीने काही सेकंड उत्तर दिले नाही ,ती तिच्या हातातल्या ग्लासकडे बघत जणू मानाने पाठी जात होती.
" आयुष्य किती विचित्र असतं नाही सर, मला ज्या कंपनीत कामाला पाठवले होते त्यांनी माझे काम बघून तिथेच नोकरीची ऑफर दिली, खरेतर खरेतर मला जायचेपण नव्हते. गेले तरीही लगेच परत यायचे होते, ना लाजता सांगते , तुमच्यासाठी यायचे होते सर , पण मग हाही विचार आला की मी परत आले आणि तरीही तुम्ही मला विचारले नाहीत तर ? तुमच्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत हे तुम्ही कधी सांगितलेच नाहीत. कदाचित तो फक्त माझ्या मनाचा खेळ होता का? तुम्हाला मी फक्त स्टुडंट वाटत होते का ? तेव्हा मी असा विचार केलं की मी ऑफर घेते आणि पुढच्या वर्षी भारतात आले की तुम्हाला भेटीन, कदाचित त्यावेळी तुम्ही मला विचारले असते . दोन वर्षांनी मी आले होते तुम्हाला भेटले पण होते पण दुर्दुवाने तेव्हासुद्धा तुम्ही काहीच बोलला नाहीत. मग मी माझ्या मनाची समजूत काढली आणि अमेरिकेचे ग्रीन कार्ड घेतले. परत कधी ना येण्यासाठी, तो विषय मी मनातून काढून टाकला पण पूर्णपणे कधीच विसरू शकले नाही. माझ्या मनात आयुष्याच्या जोडीदाराची जागा रिकामीच राहिली कारण तिथे मी फक्त तुम्हालाच बघू शकत होते, माझ्या मनात प्रियकराची प्रतिमा फक्त तुमचीच राहिली,"
शाल्मलीचे डोळे पाणावले होते .. सौमित्राने तिच्या हातावर थोपटले
"मी एक विचारू सर? तुमच्या मनात माझ्याविषयी काय भावना होत्या ? ज्या मला जाणवत होत्या त्याच की अजून काही ? तुम्ही का कधी मला विचारले नाहीत? मी आले होते, तुमच्या एका शब्दाची वाट बघत होते , का नाही थांबवलेत मला ? तुम्ही लग्न का नाही केलेत ?"
आता पाळी सौमित्राची होती " माझ्या मनात तू त्याच दिवशी भरली होतीस ज्या दिवशी आपण एकमेकांवर धडकलो होतो. पण विचार कर मी तुझ्यापेक्षा निदान १० वर्षांनी मोठा होतो? मी तुझा शिक्षक होतो, मी तुला विचारले आणि बाहेर पसरले असते तर समाज काय म्हणाला असता? तुझ्या घरच्यांनी मला वयामुळे नाकारले तर ? तुझ्या मनात माझ्याबद्दल फक्त आदर असला तर? ह्या भीतीने माझी तुझ्याशी बोलायची कधी हिम्मतच झाली नाही. खूप वाटायचे की एकदा विचारून टाकावे पण दर वेळेस उद्या विचारीन पुढच्या वेळेस विचारेन असे आजचे मरण उद्यावर ढकलत गेलो. पण मनात फक्त तुझीच प्रतिमा होती, मनाने फक्त तुलाच आपले मानले होते, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची मी कल्पनाच करू शकत नव्हतो."
सौमित्राने शाल्मलीचे हात हातात घेतले. दोघांचे डोळे ओलावले होते , परत एकदा ते एकमेकांशी बोलत होते फरक फक्त एव्हढाच होता आता दोघांच्या भावना एकमेकाला कळल्या होत्या. त्यांना त्यांची चूक पुरेपूर समजली होती . मनात आलेल्या भावना त्यांनी वेळीच व्यक्त केल्या असत्या तर त्यांच्या आयुष्याची १५ वर्षे वाचली असती, १५ वर्षे जी त्यांनी एकट्याने काढली, १५ वर्षातला प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र जी त्यांनी एकमेकांच्या विरहात काढली. १५ वर्षात त्यांनी ढाळलेले पोरके अश्रू , एव्हढी प्रचंड मोठी किंमत त्यांनी दिली होती.

पण अजूनही वेळ गेली नव्हती, आता त्यांना कोणी रोखू शकत नव्हते. सौमित्र आणि शाल्मली रात्री ११.३० वाजता हॉटेल मधून घरी निघाले, वाटेत सिद्धिविनायक मंदिर लागले. मंदिराचे दरवाजे बंद होते पण दोघांनी गाडी थांबवून, खाली उतरून नमस्कार केला. दोघांची खात्री होती की बाप्पानी त्यांना मनोमन आशीर्वाद दिला होता. दोघे परत गाडीत बसले आणि दोघांनी अनु रियाला झोपेतून उठवून त्यांचा निर्णय सांगितला. दोघांनी सौमित्रच्या घरी जायचे ठरवून गाडी स्टार्ट केली. सौमित्राने रेडिओ चालू केला आणि दोघे लागलेले गाणे ऐकून परत भावुक झाले. जणू त्या गाण्याच्या प्रत्येक शब्दात त्यांच्या जीवनाचे सार मांडले होते. सौमित्र उजव्या हाताने गाडी चालवत होता , ... रेडिओवर तलत मेहेमूदच्या रेशमी आवाजात गाणे चालू होते.

हम से आया न गया तुम से बुलाया ना गया
फ़ासला प्यार में दोनों से मिटाया ना गया

वो घड़ी याद है जब तुम से मुलाक़ात हुई
एक इशारा हुआ दो हाथ बढ़े बात हुई
देखते देखते दिन ढल गया और रात हुई
वो समां आज तलक दिल से भुलाया ना गया
हम से आया न गया
दोघांनी एकेकांकडे बघितले, शाल्मली अमेरिकेला जायच्या आधी आधी भेटायला अली होती तेव्हाचा प्रसंग दोघांच्या डोळ्यासमोरून जात होता. ती चूक किती महाग पडली हे त्यांना आज कळले होते, सौमित्राने आपल्या उजव्या हाताने शाल्मलीचा दावा हात घट्ट धरला होता त्यावर हळूचकन ओठ टेकवले

क्या ख़बर थी के मिले हैं तो बिछड़ने के लिये
क़िस्मतें अपनी बनाईं हैं बिगड़ने के लिये
प्यार का बाग बसाया था उजड़ने के लिये
इस तरह उजड़ा के फिर हम से बसाया ना गया
हम से आया न गया

एकटेपणाच्या त्या जळणाऱ्या रात्री, वाळूसारखे हातातून निसटून गेलेले ते क्षण त्यांना आठवत होते ... गाण्याचे एक एक कडवे जणू त्यांच्या जीवनावर आधारित असावे तसे लिहिले होते,

याद रह जाती है और वक़्त गुज़र जाता है
फूल खिलता है मगर खिल के बिखर जाता है
सब चले जाते हैं फिर दर्दे जिगर जाता है
दाग़ जो तूने दिया दिल ने मिटाया ना गया
हम से आया न गया ...

दोघांनाही आता ते शब्द सहन होत नव्हते, त्यांच्या मुक्या प्रेमामुळे, आपल्या भावनांना व्यक्त ना केल्यामुळे त्या दोघांनी भर जवानी विरहात काढली होती, ती चूक आता निस्तरायची होती.

सौमित्रालाही आता भावना अनावर झाल्या होत्या , त्याने गाडी थांबवली. शाल्मलीने सौमित्राचा हात घट्ट धरला होता, ती गाडीत थोडी त्याच्या बाजूला सरकली आणि त्यांनी आपल्या मुक्या भावना आजही मुक्यानेच व्यक्त केल्या ...ओठानी ओठांची भाषा ओळखली होती... एकही शब्द ना उच्चारता
शाल्मलीने त्याचा डावा हात हातात घट्ट धरला होता ..... कधीही न सोडण्यासाठी

महेश इंदुमती वसंत बिळगीकर
ऑस्ट्रियातली इन्सब्रुक शहरात दुपारचे ६ वाजले होते, सूर्यास्त झाला असल्याने अंधार पसरायला लागला होता. शहरातील मध्यवर्तीचा भाग दिव्यांनी उजळून निघाला होता. शहराच्या मधून वाहणारी नदी आता गोठली होती पण त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हॉटेलच्या पाटीयो वर लोक मस्त एन्जॉय करत होते.
सौमित्र आणि शाल्मली अश्याच एका हॉटेलच्या पाटीयोत बसले होते. समोर दोघांच्या ग्लासमध्ये वाईन होती. टेबलावर ठेवलेल्या दिव्याचा मंद प्रकाश त्या ग्लासेस मधल्या वाईनच्या रंगात मिसळत होता. सौमित्र आणि शाल्मलीनि ग्लासेस उचलले आणि एकमेकांना चियर्स म्हणत वाईनचा आस्वाद घेतला " आपल्या सुंदर भविष्यासाठी चियर्स" म्हणत ग्लास एकमेकांच्या ग्लासना नाजूकपणे टेकवले..
दोघेही समोरासमोर न बसता बाजूबाजूला एकमेकांना लगटून बसले होते जणू समोर बसण्याएव्हढा दुरावाही त्यांना आता सहन होत नव्हता. दोघेही एकमेकांकडे अत्यंत प्रेमाने बघत होते " सर असे काय बघता... नको ना मला कसे तरी होतंय " शाल्मली सौमित्रच्या खांद्यावर डोके घुसळत लडिवाळपणे उद्गारली. सौमित्राने तिच्याकडे खोट्याखोट्या रागाने बघितले " आता तरी सर नको म्हणू ... एव्हढा चांगलं सौमित्र नाव आहे, सौमी म्हण किंवा फक्त तुला आवडतं तसे नुसतं मित्र म्हण... मला अनु आणि रियाने सगळं सांगितलंय" असे म्हणत दोघे खळखळून हसले. त्या ऑस्ट्रियातल्या थंडीत ती त्याची "शाल" होती तर तो तिचा हृदयातला "मित्र". सौमित्राने शाल्मलीचा हात घट्ट धरला होता. गेल्या काही दिवसात घडलेल्या प्रसंगाने त्या दोघांचे आयुष्य पार बदलून गेले होतं. दोन महिन्यांपूर्वी त्यांना जर का कोणी त्या दोघांच्या ऑस्ट्रियामधल्या हनिमून बद्दल सांगितले असते तर त्यांनी वेड्यातच काढले असते. ते आठवून सौमित्र मिश्कीलपणे म्हणाला "पण काहीही म्हण, .... आपल्याला थोडा उशिराच झाला नाही का शाल ....." शाल्मली लटक्या रागाने "थोडा ... ह्याला थोडा म्हणतात ... तोही तूझ्यामुळे, पूर्णपणे तुझीच चूक होती" "फक्त माझीच का म्हणून तुझीपण चूक ...हा हा हा " सौमित्रने दिलखुलास हसत तिला जवळ ओढले " पण जाऊन दे, म्हणतात ना देर आये दुरुस्त आये" तो खोटाखोटा राग, गालावर खुललेले गुलाब त्यादिवशी त्या वाईनच्या ग्लासात विरघळून गेले. आणि अजून एक गोष्ट त्या वाईनमध्ये विरघळून गेली... ती म्हणजे आयुष्यातून निसटून गेलेली ती १५ वर्षे

पंधरा वर्षात खूप काही बदलले होते. वर्गातली सगळी मुले करियर आणि जीवनाच्या प्रवासात विखुरली होती. चारपाच जण अजूनही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यातील कोणीतरी फेसबुक/व्हाट्सअँप ग्रुपची टूम काढली आणि MJ-२००२ नावाचा ग्रुप तयार झाला आणि मग मित्र मैत्रिणींची शोधाशोध सुरु झाली. बरेचसे जण सापडले आणि मग दर आठवड्याला महिन्याला सगळ्यांचे फोन, ईमेल ची देवाणघेवाण सुरु झाली. अनु बंगलोरच्या कंपनीत कामाला होती आणि दोन मुलांची आई होती, रिया दिल्लीला होती ...बाकीचे असेच पुणे मुंबई बंगलोर चेन्नई तर काही सिंगापुर,लंडन . शाल्मली आता अमेरिकेत सियाटल शहरात स्थाईक झाली होती. काही महिन्यातच सगळ्यांचे भेटायचे अशी चर्चा सुरु झाली. अनु, रिया आणि शाल्मली घट्ट मैत्रिणी तेव्हा त्यांनाही भेटावेसे वाटत होते. जेव्हा सगळ्यांनी येत्या दिवाळीच्या सुट्टीत एका दिवशी भेटायचे ठरवले तेव्हा अनु आणि रियानी शाल्मलीला येण्यासाठी गाळ घातली. शाल्मलीच्या सुट्ट्या उरल्या होत्या आणि दिवाळी उरकून डिसेम्बरमध्ये परत येता आले असते जेव्हा बाकी सगळे ख्रिसमसची सुट्टी घ्यायचे. शाल्मलीनि रजा टाकली, भारताबाहेर राहणाऱ्या बाकीच्या लोकांनीपण यायचे ठरवले होते. त्यामुळे सगळ्यांनी भेटून धमाल करायची असे ठरवले होते.आणि सगळ्या ग्रुप मध्ये भेटल्यावर कायकाय करायचे याच्यावर चर्चेला उधाण आले. थोड्या कुरबुरी रूसवेफ़ुगवेपण झाले पण दोन गोष्टीबद्दल संपूर्ण संमती होती. एक तर कॉलेजला जायचे आणि त्यांच्या तेव्हाच्या हिरोला म्हणजे सौमित्र सरांना भेटायचे. रियाने लीन्कदिन वरून माहिती काढली की सर भारतातच आहेत आणि चक्क मुंबईतच आहेत. ते आता इन्फोसिस मध्ये VP होते आणि अजूनही तसेच हँडसम आहेत. तिने सरांना विचारले, ते त्या दिवशी मुंबईतच असणार होते आणि त्यांनाही सगळ्यांना भेटायला आवडले असते. सगळी तयारी झाली होती, सगळे जण भेटायला अगदी आतुर झाले होते. कॉलेजमध्ये जाऊन आल्यावर एका हॉटेलमध्ये पार्टी रूम बुक केली होती.
शाल्मली भारतात पोचली, एक दिवस विश्रांती घेतली आणि पार्टीची तयारी सुरु केली. सगळे ठरल्याप्रमाणे कॉलेजवर भेटले,आपल्या जुन्या वर्गात गेले, कॉम्पुटर सेन्टरमध्ये गेले, छान छान फोटो काढले आणि मग सगळे हॉटेल मध्ये गेले. सौमित्रला यायला थोडा उशीरच झाला पण सर आल्यावर परत सगळे जण फॉर्मात आले. सौमित्रने सगळ्यांशी हस्तांदोलन केले. शाल्मली आणि सौमित्रनी एकमेकांकडे पाहिले आणि शेकहॅण्ड केला. दोघांची नजर आणि हात जरा जास्तच रेंगाळले. पार्टी संपल्यावर रात्री सगळे आपापल्या घरी निघाले. सौमित्राने शाल्मलीला ड्रॉप करायची ऑफर दिले आणि तिने ती लगेच मान्यही केली.

M S कॉलेजच्या आवारात आज खूप गर्दी होती. नवीन वर्ष सुरु होत होते, त्यामुळे मुलामुलींचे घोळके आवारात जागोजागी दिसत होते. कॉलेजात बरेच कोर्सेस होते पण त्यातला सगळ्यात एक नंबर होता BCM कोर्स त्याच्याकरता कॉलेज मुंबईत पहिल्या दहामध्ये गणला जात होतं. हा कोर्स केला की चांगल्या सॉफवेअर कंपनीमध्ये नोकरी पक्की समजली जायची त्यामुळे कॉलेजच्या पहिल्याच दिवशी सगळी मुलं हवेत तरंगत होती. आठ वाजता पहिलं लेक्चर होत. त्यामुळे सगळी मुलं दिलेल्या वर्गात जाऊन बसली होती. तर दुसरीकडे शाल्मली स्वतःलाच शिव्या देत आपली स्कुटर ढकलत होती. आदल्यादिवशी बाबानी पेट्रोल भरण्याविषयी सांगितले पण होते पण ती विसरली. ती सकाळी छानपैकी तयार झाली, तिचे कुरळे केस तिने नुकतेच प्लम स्टाईलमध्ये कापले होते. तिला आवडणारी जीन्स आणि लेमन कलरच्या टॉप मध्ये अतिशय सुरेख दिसत होती. ठरल्याप्रमाणे वेळेवर घरातून निघाली आणि कॉलेजपासून ५ मिनिटावर असताना स्कुटरचे पेट्रोल संपले. तरी बर जवळच पेट्रोल पंप होता. स्वतःला शिव्या देत तिने कशीबशी स्कुटर तिथपर्यंत ढकलत नेली, पेट्रोल भरले आणि कॉलेजला पोचली. पार्किंगमध्ये स्कुटर लावून ती धावतच कॉलेजात शिरली आणि समोरून येणाऱ्या माणसावर धडकली. तिच्या हातातील हावरसॅक आणि मोबाईल खाली पडला. आधीच कॉलेजचा पहिला दिवस, त्यात उशीर झालेला आणि त्यात अशी लागलेली धडक त्यामुळे शाल्मलीची जणू सटकलीच. "बघून चालत येत नाही का? डोळे दिलेत कि नाही देवाने ?" तिने समोरच्या व्यक्तीला ना बघताच फैलावर घेतले, तो मुलगा बिचारा काहीच म्हणाला नाही, उलट स्वतःच सॉरी म्हणाला, तिला तिचा मोबाईल उचलून दिला. "फर्स्ट ईयर स्टुडंट ना ... कुठची डिव्हिजन ... हा इथून पुढे रूम १-१२ " असे तिला सांगून मंद स्मित करत निघून गेला. शाल्मलीला फारसा विचार करायला वेळच मिळाला नाही कारण पहिलं IT Fundamental च लेक्चर सुरु होऊन ३० मिनिटे झाली होती. ती धावतच वर्गात शिरली, प्रोफेसर ना सॉरी म्हणून आत जाऊन बसली. आतमध्ये बसल्यावर जरा तिला शांतपणे स्वास घ्यायला, सावरायला वेळ मिळाला. थोड्या वेळात लेक्चर संपले आणि दुसरे लेक्चरर यायला ५ मिनिटे होती तेव्हढ्यात तिने स्वतःला सावरले, पाणी प्यायले, केस नीट केले ... आणि आधीच्या लेक्चरच्या नोट्स साठी मैत्रिणीशी पाठीमागे बोलत होती तेव्हढ्यात वर्गात शांतता पसरली. दुसरे लेक्चरर आले होते ..म्हणून ती नीट सरळ होऊन बसली आणि पुढे बघते तर काय..... तिला आश्चर्याचा धक्का बसला. ते लेक्चरर दुसरे तिसरे कोणी नसून काही मिनिटांपूर्वी तिला धडकणारा तरुण होता. लेक्चरर स्वतःची ओळख करून देत होते.. सौमित्र रेगे BE, MCA झाल्यावर TCS सारख्या मोठ्या कंपनीमध्ये ६-७ वर्ष काम सध्या प्रोजेक्ट मॅनेजर पदावर आणि कॉलेजमध्ये सध्या लेक्चरर मिळत नव्हता आणि शिकवायची आवड म्हणून गेस्ट लेक्टरर म्हणून येत होता. सौमित्राने वर्गावरून नजर फिरवली, शाल्मली लपायला प्रयत्न करत होती पण तरी शेवटी दोघांची नजरानजर झालीच. त्याने त्याचे मंद स्मित कायम ठेवले होते पण शाल्मलीला शरमल्यासारखे झाले. आज आपण आपल्याच लेक्चररला झापले, आता आपले काही खरे नाही, काहीही करून त्यांना सॉरी म्हटले पाहिजे असा विचार करून ती मध्ये १५ मिनिटाची सुट्टी होती त्यात लेक्चरर रूममध्ये घाईघाईत यायला निघाली. ती लेक्चरर रूम मध्ये पोचल्यावर तिला कळले की सौमित्र तिथे थांबत नाहीत, लेक्चर संपल्यावर लगेच ऑफिसला निघून जातात. तो तशीच हळहळत परत आली. दुसऱ्या दिवशी काही करून त्यांना गाठायचे असे ठरवून आली. लेक्चर संपल्यावर सौमित्र लगेच वर्गाबाहेर आला. शाल्मली पाचव्या सहाव्या बेंचवर होती, त्याला गाठायला ती उठली पण बाकी सगळी मुले मध्ये दंगा करायला लागली होती आणि तिला पटकन बाहेर पडता आले नाही. आजतरी आपण सौमित्रला सॉरी म्हटलेच पाहिजे ह्या विचारात ती धावतच वर्गाबाहेर पडली आणि परत एकदा कोपऱ्यावर कोणाशीतरी बोलत असलेल्या सौमित्रावर जाऊन आदळली. सौमित्र दचकलाच पण शाल्मली परत शरमिंदी झाली. "आपण नेहेमी असे एकमेकांवर आदळत का असतो ?" सौमित्र मिश्कीलपणे म्हणाला. शाल्मलीला इकडे मेल्याहून मेल्यासारखे झाले. "नाही सर मी तुम्हाला कालच्या प्रसंगाबद्दल सॉरी म्हणायलाच येत होते. " शाल्मलीला शब्द सापडत नव्हते, मिळाले तरी ओठातून फुटत नव्हते. सौमित्र मात्र मान खाली घालून घाबरलेल्या शरमिंदी झालेल्या शाल्मलीकडे हसत बघत होता.
त्या दिवशी सौमित्र आणि शाल्मली दोघेही शांतपणे झोपू शकले नाहीत. त्यांना राहून राहून गेल्या दोन दिवसातल्या त्यांच्या भेटी आठवत होत्या. सौमित्र, तरुण देखणा होताच, शांत स्वभाव ,ओठांवर मंद स्मित जे शाल्मलीच्या डोळ्यासमोर सारखे येत होते. त्याची बोलण्याची अदा, एखादा कठीणातला कठीण विषय सोप्पे करून सांगायची कला तिला खूप आवडली होती. शाल्मलीचे ते पहिल्या दिवशीचे रूप, रागावल्यामुळे आणि धावत आल्यामुळे लाल झालेला तिचा चेहरा, धपापत असलेले उर, खाली पडलेले सामान उचलताना डोळ्यावर आलेले कुरळे केस. हे सगळे जणू एखाद्या पिक्चर प्रमाणे सौमित्र मनांतल्या मनात परत परत बघत होता.
कॉलेजची लेक्चर प्रॅक्टिकल सुरु झाली, असाइनमेंट , परीक्षा ह्यात शाल्मलीचा वेळ कसा जायचा कळत नव्हते. सौमित्रपण त्याच्या नोकरीतल्या प्रोजेक्टमध्ये, लेक्चरमध्ये बिझी होता. पण दोघांना हुरहूर असायची ती त्या रोजच्या लेक्चरची जेव्हा ती दोघे एकमेकांना डोळेभरून बघायची जणू साठवून घ्यायची. ती त्याच्याबद्दल अजून माहिती काढायची. त्याला मदन मोहनची गाणी आवडायची, त्याला गोड़ आवडायचे. त्याला कधीही अमेरिकेला जाणे शक्य होते पण घरात म्हातारी आजी होती. तिला टाकून त्याला जायचे नव्हते. हे जेव्हा शाल्मलीला समजले तेव्हा तिच्या मनात त्याच्या बद्दलचा आदर अजून वाढला. मुलांना सौमित्रचे शिकवणे आवडायचे , तरुण असल्याने कपडे मुलांना आवडतील असेच घालायचा त्यामुळे तो तर मुलांच्या गळ्यातला ताईत झाला होता. सौमित्र सर म्हणजे त्यांचे हिरो होते. आणि शाल्मलीला तर तो त्याहीपेक्षा अधिक वाटायचा. त्याच्यासाठीही शाल्मली नुसती स्टुडंट नव्हती. म्हणता म्हणता दिवस कसे गेले कळलेच नाही, म्हणतात ना चांगले दिवस पटकन जातात. आज बोलू उद्या बोलू असे म्हणून दोघांनी एकमेकाला त्यांच्या भावना कधी सांगितल्या नाहीत.
शाल्मलीला कधी डिग्री मिळाली कधी नोकरी मिळाली कळलेच नाही. शाल्मली तश्या सगळ्या घडामोडी सौमित्राला येऊन सांगायची त्याचा सल्ला घ्यायची. नोकरी लागल्या लागल्या शाल्मलीला ४-६ महिन्यात अमेरिकेत १ वर्ष जायची संधी मिळाली. पुढे काय करू? अमेरिकेत जावे का? सरांचा सल्ला घ्यावा म्हणून सौमित्राला भेटली. त्यादिवशी दोघे तिच्या करियर मिळालेल्या संधीविषयी बोलत होते पण दोघांचे डोळे, दोघांची मने एकमेकाला काहीतरी वेगळेच विचारात होते. तिचे डोळे त्याला सांगत होते " मित्रा अरे मला थांबवा ना , फक्त एकदा थांब म्हण, फक्त एकदा , मी नाही जाणार" तर त्याचे तिला विचारात होते " मी तर तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे, ... माझ्या भावना कळतील का तिला , ... ती थांबेल का? तिचे घरातले काय म्हणतील? सगळ्यांना जुगारून माझ्याबरोबर द्यायची हिम्मत करशील?" पण दोघांना एकमेकांविषयी असलेल्या भावना कळत होत्या पण दोघांपैकी कोणीच मनातले बोलू शकले नाही. सौमित्राने शाल्मलीला बेस्ट लक देण्यासाठी हात मिळवला आणि बराच वेळ तसाच हात हातात ठेवून ते बोलत होते जणू दोघांनाही हात सोडण्याची इच्छा नव्हती. दुसर्याने नाही म्हटले तर आपण एकमेकांना गमावून बसू ह्या एका अनामिक भीतीमुळे ते त्यांच्या मनातल्या भावना ओठावर आणू शकले नाहीत. मनातले मनातच राहून गेले, उरली ती फक्त खंत…………

पार्टी संपून निघेपर्यंत रात्रीचे १० झाले होते, सौमित्र गाडी चालवत होता. दोघांमध्ये एका विचित्र शांतता होती , कुठून बोलायला सुरवात करावी कोणी करायची हा मोठा प्रश्न होता. शांतता भंग करण्यासाठी सौमित्राने रेडिओ FM लावला. सौमित्राने बोलायला सुरवात केली " कशी आहेस ? घरी सगळे कसे आहेत? तू अगदी बदलली नाहीस, पूर्वी होतीस तशीच आहेस "
शाल्मलीने सुद्धा बोलायला सुरवात केली "मी मस्त , सिएटल ला असते, आई बाबा मी अमेरिकेला गेल्यावर २-३ वर्षातच गेले . दादा पुण्यात असतो. तुमच्या साठी तुम्हाला आवडणारी वाईन आणली आहे. तुम्हीपण नाही बदलला, फक्त केसात थोडी चांदी आली आहे , बाकी तुम्ही कसे आहेत ? घरी कोणकोण असते "
" आज्जीला जाऊन ९ वर्ष झाली. मी इथेच मुंबईत एकटाच असतो बाकी कोणी नाही . तुझ्या घरी सियाटलला कोणकोण ?"
"मीपण एकटीच आहे, लग्न नाही केलं मी "
रेडिओ वर जुनी गाणी चालू झाली होती आणि चक्क मदन मोहनची गाणी लावत होते "तुम जो मिल गये हो, तो ये लगता है, के जहाँ मिल गया " चे सूर गाडीत भरले आणि जणू दोघांच्या मनात भावनांचे वर्षानु वर्ष धरून ठेवलेले बांध फुटले.

मरिन ड्राईव्हच्या एका हॉटेल मध्ये शाल्मली आणि सौमित्र बसले होते."घरी जायच्या ऐवजी थोडी कॉफी घेऊया का ? थोडे बोलत बसुया" सौमित्राने तिला विचारले. शाल्मलीने हसून उत्तर दिलं "नो प्रॉब्लेम, जाऊया की, आपण दोघेही कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही किंवा आपली घरी कोणी वाटही पाहत नाहीये ". हवा चांगली होती तेव्हा दोघे बाहेरच बसले होते. दोघांनी कॉफी घेतली होती." "एका विचारू शाल्मली " शाल्मलीने डोळ्यानेच अनुमती दिली "तू अमेरिकेतून परत का नाही आलीस ?". " आयुष्य किती विचित्र असतं नाही सर, मला ज्या कंपनीत कमला पाठवले होते त्यांनी माझे काम बघून तिथेच नोकरीची ऑफर दिली, खरेतर खरेतर मला जायचेपण नव्हते. गेले तरीही लगेच परत यायचे होते, तुमच्यासाठी यायचे होते, पण मग हाही विचार आला की मी परत आले आणि तरीही तुम्ही मला विचारले नाहीत तर ? तुमच्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत हे तुम्ही कधी सांगितलेच नाहीत. कदाचित तो फक्त माझ्या मनाचा खेळ होता का? तुम्हाला मी फक्त स्टुडंट वाटत होते का ? तेव्हा मी असा विचार केलं की मी ऑफर घेते आणि पुढच्या वर्षी भारतात आले की तुम्हाला भेटीन, कदाचित त्यावेळी तुम्ही मला विचारले असते . दोन वर्षांनी मी तुम्हाला भेटले पण होते पण तेव्हासुद्धा तुम्ही काहीच बोलला नाहीत. मग मी माझ्या मनाची समजूत काढली आणि अमेरिकेचे ग्रीन कार्ड घेतले. परत कधी ना येण्यासाठी, तो विषय मी मनातून काढून टाकला पण पूर्णपणे कधीच विसरू शकले नाही. माझ्या मनात प्रियकराची प्रतिमा फक्त तुमचीच राहिली,"
शाल्मलीचे डोळे पाणावले होते .. सौमित्राने तिच्या हातावर थोपटले
"मी एक विचारू सर? तुमच्या मनात माझ्याविषयी काय भावना होत्या ? ज्या मला जाणवत होत्या त्याच की अजून काही ? तुम्ही का कधी मला विचारले नाहीत? मी आले होते, तुमच्या एका शब्दाची वाट बघत होते , का नाही थांबवलेत मला ? तुम्ही लग्न का नाही केलेत ?"
आता पाळी सौमित्राची होती " माझ्या मनात तू त्याच दिवशी भरली होतीस ज्या दिवशी आपण एकमेकांवर धडकलो होतो. पण विचार कर मी तुझ्यापेक्षा निदान १० वर्षांनी मोठा होतो? मी तुझा शिक्षक होतो, मी तुला विचारले आणि बाहेर पसरले असते तर समाज काय म्हणाला असता? तुझ्या घरच्यांनी मला वयामुळे नाकारले तर ? तुझ्या मनात माझ्याबद्दल फक्त आदर असला तर? ह्या भीतीने माझी तुझ्याशी बोलायची कधी हिम्मतच झाली नाही. खूप वाटायचे की एकदा विचारून टाकावे पण दर वेळेस उद्या विचारीन पुढच्या वेळेस विचारेन असे आजचे मरण उद्यावर ढकलत गेलो. पण मनात फक्त तुझीच प्रतिमा होती, मनाने फक्त तुलाच आपले मानले होते, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची मी कल्पनाच करू शकत नव्हतो."
सौमित्राने शाल्मलीचे हात हातात घेतले. दोघांचे डोळे ओलावले होते , परत एकदा ते एकमेकांशी बोलत होते फरक फक्त एव्हढाच होता आता दोघांच्या भावना एकमेकाला कळल्या होत्या. त्यांना त्यांची चूक पुरेपूर समजली होती . मनात आलेल्या भावना त्यांनी वेळीच व्यक्त केल्या असत्या तर त्यांच्या आयुष्याची १५ वर्षे वाचली असती, १५ वर्षे जी त्यांनी एकट्याने काढली, १५ वर्षातला प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र जी त्यांनी एकमेकांच्या विरहात काढली. १५ वर्षात त्यांनी ढाळलेले पोरके अश्रू , एव्हढी प्रचंड मोठी किंमत त्यांनी दिली होती.

पण अजूनही वेळ गेली नव्हती, आता त्यांना कोणी रोखू शकत नव्हते. सौमित्र आणि शाल्मली रात्री ११.३० वाजता हॉटेल मधून घरी निघाले, वाटेत सिद्धिविनायक मंदिर लागले. मंदिराचे दरवाजे बंद होते पण दोघांनी गाडी थांबवून, खाली उतरून नमस्कार केला. दोघांची खात्री होती की बाप्पानी त्यांना मनोमन आशीर्वाद दिला होता. दोघे परत गाडीत बसले आणि दोघांनी अनु रियाला झोपेतून उठवून त्यांचा निर्णय सांगितला. दोघांनी सौमित्रच्या घरी जायचे ठरवून गाडी स्टार्ट केली. सौमित्राने रेडिओ चालू केला आणि दोघे लागलेले गाणे ऐकून परत भावुक झाले. जणू त्या गाण्याच्या प्रत्येक शब्दात त्यांच्या जीवनाचे सार मांडले होते. सौमित्र उजव्या हाताने गाडी चालवत होता , शाल्मलीने त्याचा डावा हात हातात घट्ट धरला होता ..... कधीही ना सोडण्यासाठी ... रेडिओवर तलत मेहेमूदच्या रेशमी आवाजात गाणे चालू होते.
हम से आया न गया तुम से बुलाया ना गया
फ़ासला प्यार में दोनों से मिटाया ना गया

वो घड़ी याद है जब तुम से मुलाक़ात हुई
एक इशारा हुआ दो हाथ बढ़े बात हुई
देखते देखते दिन ढल गया और रात हुई
वो समां आज तलक दिल से भुलाया ना गया
हम से आया न गया

क्या ख़बर थी के मिले हैं तो बिछड़ने के लिये
क़िस्मतें अपनी बनाईं हैं बिगड़ने के लिये
प्यार का बाग बसाया था उजड़ने के लिये
इस तरह उजड़ा के फिर हम से बसाया ना गया
हम से आया न गया

याद रग जाती है और वक़्त गुज़र जाता है
फूल खिलता है मगर खिल के बिखर जाता है
सब चले जाते हैं फिर दर्दे जिगर जाता है
दाग़ जो तूने दिया दिल ने मिटाया ना गया
हम से आया न गया ...

महेश इंदुमती वसंत बिळगीकर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!

दोनदा कॉपी पेस्ट झाली आहे जमल्यास एडिट करा