मृत्यू

Submitted by Rudraa on 15 April, 2021 - 13:19

सहवास हवाय ,
मलाही आज तुझा.....
कधी होशील साथीदार ,
त्याचं एका क्षणासाठी तु माझा..

देतोस आलिंगण,
जेंव्हा केंव्हा तू कोणाला .....
करतोस बंधनमुक्त म्हणे ,
प्राक्तनातून सुखःदुखःला...

भेटतोस एकदाच,
तरिही होतोस इतका जवळचा.....
देऊन जातोस अनेकांना ,
नजराण्यात काळोख आक्रोशाचा .....

बघता बघता संपवतोस ,
जणू सगळ काही....
जळतात शब्द, विरतात भावना,
उरतो एकचं प्रश्न काय आहे आणि काय नाही?.....

भेटशील का मलाही ,
त्याच एका क्षणासाठी .......
विचारायचेत प्रश्न ,
सोडायच्यात कित्येक गुढ़ गाठी...
रुद्रा ......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहीतेस रूद्रा...
पण विषय असे 'मृत्यू, 'जीवनाचे चक्रव्यूह', 'स्मशान', असेच का?
खूप negative का? आपण लिहिलेले शब्द, काव्य कागदावर उलटल्यावरही आपल्याला त्या भावनांमधून लगेच विलग होता येत नाही. मन व्यापतात काही काळ...
अर्थात हे माझं वैयक्तिक मत... कोणी काय लिहावं हा त्याचा प्रश्न...
हलकं घ्या पण लिहीत रहा..