आठवणी

Submitted by पल्ली on 17 May, 2009 - 03:42

जुन्या आठवणींच्या खुणा
काळाच्या ओघात पुसट होतात.
आपणही कधी माणुस होतो,
माणसं कशी विसरुन जातात?
बालपणीचे संदर्भ वेलीवरच्या कळ्या
तेव्हाची ती फुलं, भरुन वाह्यच्या परड्या.
वहीत जपुन ठेवलेलं एक मोरपीस
मैत्रीचं पिंपळपान नक्षी आलेली जाळीस.
मूठभर दिलेला एक खाऊ
टप्पल मारुन पळालेला भाऊ...
आंब्याच्या आढीत घुसुन बसणं,
अंगभर सांडलेल्या रसानं दरवळणं.
गवताच्या ढेरांवरची घसरगुंडी
एक पायरी सोडुन मारलेली उडी.
लग्न कार्यालयांत उगीच धावायचं
फुलांचे हार पळवुन मिरवत राह्यचं...
अनंत अशा आठवणींची
सजवुन रांगोळी मनाच्या दारात
निरखत बसते खूपवेळ
वार्‍यानं तीही मिटताना
उघड्या डोळ्यांनी पहात बसते वेळ्-अवेळ......

गुलमोहर: 

डॉ.मुजफ्फर सलीम शेख

बोहोत खूब! " मुझे कोइ लवटा दे बचपन क सावन
वो कागज की किश्ती वो बारिश का पानी"
या गीता ची आठ्वण झाली.

पल्ली खुप मस्त किती सुंदर लिहीलयस ग .
जुन्या आठवणींच्या खुणा
काळाच्या ओघात पुसट होतात. >>कि अधिकाधीक गडद होत जातात ग.तु मात्र आठवणी गडद केल्यास हेच खर, खुप छान जमलिय.

Happy Happy Happy Happy ही खरी पल्ली आहे. एकदम ओरिजनल. मोरपिशी निरागस. ती तशीच राहो आजन्म !!

you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com

खूप छान. लहानपण आठवले. धन्यवाद.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

लहान पण देगा देवा......अस वाटतय..
खुप मस्त आहे.

पल्ली,
फारच छान, समोर बालपण उभे केलेस.
माझ्या एका कवितेतील कांही ओळीना उजाळा मिळाला.

गाव इवले बालपणीचे,
जन्म भूमी ती अजुन स्मरते.
घडलो तिथे मी संस्कारातून,
तिच शिदोरी अजून पुरते.

सवंगडी ते साधे भोळे,
त्यांच्या संगे जडले नाते.
बाळ गुराखी गोकुळातले,
जणू खेळण्या आले होते.

जे.डी. भुसारे

अग , आताच जगून गेलीस ना ते बालपण ? की गेलं ते तिथेही पुन्हा तुझ्या मागेमागे.... एक इवलसं बोट पकडून.... कोवळ्या पल्लीच. (तुझ्या बरोबर अहो-जाहो करावसं वाटतच नाही. दोष तुझाच. )
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

पल्ले मस्तंच गं कविता...
अजूनही खूप आठवणी जोडून कविता फुलव की थोडी. Happy

बालपणींचा तो बालकवि
खुणावतो ग इथं, पल्लवि |

पल्लाबाई, सुरेख..............
तुझ्या आठवणींचा पल्ला कसला मस्त आहे गं !

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" ही कविता म्हणजे वहीत जपुन ठेवलेलं एक मोरपीसच! सुंदर! "

आभारी.... सर्वांची. मला कुणी अहो-जाहो केलं की फार अवघडल्यासारखं होतं. आपण देवाला अरे देवा , आईला अगं आई, जवळच्या प्रत्येकाला एकेरीत असंच म्हणतो ना. म्हणुन कौतुका, जे तुला सुचेल / आवडेल ते म्हण. जे.डी. भुसारे तुमची कविता छान आहे. दक्षे, वाढवली असती पण मग कदाचित कंटाळवाणी झाली असती. पुढच्या ग ट ग ला बालपणच्या आठवणींवर बोलु. बहारीन वरचे लेक्चर नको Wink विशल्या, तुझे दगड कमी पडतायत. अलिकडे कविता पडेनाशी झालीय. सर्वांचे मनापासुन आभार. (प्रत्येकाचे स्वतंत्र नाव न घेता) Happy

पल्ले....काय सुरेख लिहीलंयस ग....देवराई पिक्चर आठवला Happy

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

सुरेख आहे ! आवडली ! Happy
*******************************************
ज्योतिर्मय मूर्ती तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा, दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा
होवो जीवन विकास वसुधेची राख लाज, हे दिनमणी व्योमराज

आवडली. मस्तच!! Happy
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

सुरेख गं! Happy

आपणही कधी माणुस होतो,
माणसं कशी विसरुन जातात?>>अगदी !

पल्ली,
खुपच सुरेख कविता!!
देवजाणो कधी परत ते बालपण येईल...:(

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

अतीव सुन्दर्.मला माझ्या बाल पणात घेऊन गेलीस.

<<अनंत अशा आठवणींची
सजवुन रांगोळी मनाच्या दारात
निरखत बसते खूपवेळ
वार्‍यानं तीही मिटताना
उघड्या डोळ्यांनी पहात बसते वेळ्-अवेळ......>>

फार हृदय स्पर्शी आहे,खरच आठवणी अशाच उडून जाताना आपणच साक्षी दार होतो!!!