NoBrokerHood society management app बद्दल माहिती हवी आहे

Submitted by vt220 on 20 March, 2021 - 13:24

आमच्या सोसायटीमधे NoBrokerHood society management अ‍ॅप वापरायचे ठरवत आहेत. सध्या एक वर्ष फुकट असल्याने जास्त चौकशी न करता सगळे अ‍ॅप सुरू करत आहेत.
ईथे कुणाला ह्या किवा तत्सम अ‍ॅपचा काही अनुभव आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या सोसायटीचे अकाउंटस लिहिणारे कोण आहेत त्यांचा सल्ला घ्या. कारण त्यांना हवी असलेली डॉक्युमेंटस त्यातून मिळायला हवीत. पेमेंट रिसिट्स, बिल्स आणि वाउचर्स शिवाय इन्वेस्टमेंट पावत्या.
बाकी app चांगले असले तरी त्याचा उपयोग काय हे महत्त्वाचे. शिवाय वार्षिक फी घेणारेत. सभासदांना काय उपयोग वगैरे. ( म्हणजे सर्वच टेक्नो नसतात.)
दुसरा मुख्य मुद्दा मेंबर्स किती.