केवळ अनपेक्षित !

Submitted by साद on 20 March, 2021 - 05:27

एखादी इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी काय करावे लागते ? याचे एका शब्दातले उत्तर आहे – प्रयत्न. प्रयत्न करून अपेक्षित गोष्ट मिळाली नाही तर काय करावे? अधिक प्रयत्न, कठोर प्रयत्न ! हे एक साधारण तत्व झाले.

जरा समाजात नजर टाकून पाहू. विविधता हे समाजाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रयत्न आणि यश या मुद्द्यावरून आपण समाजाची एक सोपी विभागणी करू शकतो. कशी ते पहा :

१. काही माणसे मनापासून झटून प्रयत्न करतात आणि त्यांना यश मिळते. हे झाले अपेक्षित यश
२. तर काही माणसे किरकोळ किंवा पाटी टाकल्यागत प्रयत्न करतात. तरीसुद्धा त्यांना यश मिळते. हे झाले अनपेक्षित यश.

आता याच्या अगदी उलट परिस्थिती पाहू:

१.काही जणांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना अपयशच पदरी येते. हे झाले अनपेक्षित अपयश.
२. तर काही जणांनी अगदी किरकोळ प्रयत्न करून त्यांना अपयश आले तर ते अपेक्षित अपयश.

अशा यशापयशाच्या अनेक गाथा समाजात दिसतील. आपणही त्यापैकी कुठल्या तरी गटात कधी ना कधीतरी असतो. त्यापैकी अपेक्षित यश सोडून देऊ. पण अनपेक्षित यश वा अपयश हा नक्कीच चर्चेचा विषय होतो. तोच मनात ठेवून हा धागा काढतोय.

surprised-face-female-2018.jpg

येऊद्या तुमच्या आयुष्यातले किस्से - केवळ अनपेक्षित यश अथवा अपयशाचे !

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरपूर आहे...
1 . 2007 ला नोकरी ते 2015 पर्यन्त.. ( भरपूर पैसा नो स्ट्रगल )
2. मुलिसाठी नोकरी सोडली. नवर्याचा बिझनेस . काम कमी ( bad फेझ )
3. 2015 ते 2018 हलाखीची परिस्थिति. मुलीचे लेफ्टओव्हर भरडी वगैरे खाऊन काढलेले उपाशी दिवस. तब्बल 2 वर्षे.
थकलेली emi ची रक्कम.
जवळच्या लोकांनी साथ सोडली.
डॉक्टर कड़े आजरपणात जायला रिक्शा चे जास्तीचे 10 रु खिशात नसणे. म्हणून 6 महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन 2 किमी दुपरच्या चांदणयात चालत जाणे.

4. 2018 दिसम्बर लोनावळा प्रोजेक्ट. 3 महिन्यात घरी वापसी.
5. 2019 बिझनेस थंबवून दोघानी नोकरी पत्करली.
6. 2020 कोविड मुळे नोकर्या गेल्या.
7. Emi चा डोंगर आणि मुलीच्या स्कुलची फी .
8. परत इंटीरियर चालू केले. प्रोजेक्ट मिळायला लागले. पुढील 4 महिन्यात गाड़ी घेऊ.

( डोळे उघडून समजलेल्या गोष्टी। )

1. वाइट वेळेत जवळच्या mansankdun अपेक्षा ठेवू नए. 99 टक्के लोक साथ सोडतात.
2. लाइफ पार्टनर आणि त्याहीपेक्षा 10% जास्त विश्वास स्वता वर ठेवणे.
3. खुप म्हणजे खुप जास्त खंबिर राहणे. जेणेकरून तुमचा पार्टनर स्ट्रॉन्ग राहिल.
4. सर्व छान च होईल हा मंत्र रोज जपणे.
5. स्वतावर विश्वास असावा.
6. ही वेळ जाईल या वर श्रद्धा ठेवा.
7. काही झालं तरी आत्महत्या हा उपाय नाही.
8. मेहनतीला पर्याय नाही.

अनिश्का,
खूप छा न !
>>>> 7. काही झालं तरी आत्महत्या हा उपाय नाही.
8. मेहनतीला पर्याय नाही. >>>>

+७८६

अनिष्का बऱ्याच कठीण, हलाखीच्या प्रसंगातून गेलात आणि धैर्याने, नेटाने वर आलात. कौतुक.

अनिष्का बऱ्याच कठीण, हलाखीच्या प्रसंगातून गेलात आणि धैर्याने, नेटाने वर आलात. कौतुक.+१११
Big hug अनिष्का Happy

अनिश्का,
खूप छा न !>>> +१.

खुप म्हणजे खुप जास्त खंबिर राहणे. जेणेकरून तुमचा पार्टनर स्ट्रॉन्ग राहिल.>>> हे जास्त आवडलं!

अनिष्का बऱ्याच कठीण, हलाखीच्या प्रसंगातून गेलात आणि धैर्याने, नेटाने वर आलात. कौतुक.>>>+१

अनिष्का तुम्हाला हॅट्स ऑफ. ग्रेट आहात. कौतुक करावं तेव्हड कमीच आहे. जेव्हा मी नवीन होतो तेव्हा अमानवीय धाग्यावर आपल्यात जरा तणाव निर्माण होऊन एक दोन शब्द माझ्याकडून निघाले होते त्याबद्दल मी माफी मागतो.

सर्वाना thanks
बोकलत माफी कसली. मी तर मुद्दाम मज्जा घ्यायचे तुमची. आणि तुम्ही ही तितकेच न चिडता उत्तर द्यायचात.
एक मात्र खरं की माबो वरील बऱ्याच लोकांनी मला माझ्या कठिण काळात ( ज्याना मी हार्डली भेटले एसेन ) त्यांनी हिम्मत द्यायचे काम केले. आज हा धागा वाचून मला पटकन लिहावे वाटले. मी फार इथे लिहित नाही वा मो मध्ये असते. मला असं वाटते की सर्व जण थोड्या फार प्रमाणात फेस करत असतात. त्यांनी ही इथे लिहावे.
म्हणजे त्यांना थोड़े रिलीफ मिळेल आणि बाकी लोकांना इंस्पिरेशन...

अनिष्का खरंच ग्रेट आणि धीराची आहेस.
4. सर्व छान च होईल हा मंत्र रोज जपणे.
5. स्वतावर विश्वास असावा. >>> हे कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. खूप आवडली ही वाक्ये.

अनिष्का बऱ्याच कठीण, हलाखीच्या प्रसंगातून गेलात आणि धैर्याने, नेटाने वर आलात. कौतुक.>>>+११११११२
हे आजच वाचलं. खरंच खुप कौतुक अनिश्का. धीराची आहेस खरी.

मी पण आजच वाचलं.
खुप धीराच्या आहात अनिश्का तुम्ही, खुप कौतुक आणि खुप खुप शुभेच्छा!

1) नवीनच मुंबई मध्ये आलो होतो.
आणि अंधेरी वरून लोखंडवाला मित्र कडे बस नी पहिल्यांदाच गेलो.
Double decker bus
तिकीट घेतली पण सवय नसल्या मुळे खाली टाकून दिली .
उतरताना टीसी उभा ..
खिशात तर तिकीट नाही
नवीन च मुंबई मध्ये .
भांबावून गेलो.
तेवढ्यात पटकन माझ्या मागे असणाऱ्या व्यक्ती एक तिकीट माझ्या हातात दिले तुझे तिकीट आहे खाली पडले होते ..असे सांगून तो पटकन निघून गेला
टीसी ल पण त्याने स्वतःचे तिकीट दाखवले नाही.
काही सेकंदात हे घडले.
मी वाचलो.
हा अनपेक्षित प्रसंग होता.
ना ओळख त्या व्यक्ती ची पण मदत करून गेला.
आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आले पुढे काहीच उपाय दिसत नसताना अचानक कोणत्या ना कोणत्या व्यक्ती नी मदत केली.
अशा व्यक्ती नी पण मदत केली ज्यांच्या शी माझे कधीच पटत नसे .
आणि अशा लोकांनी दूर केले कठीण प्रसंगात ते माझे जवळचे होते.
लोक कधी कशी वागतील काही सांगता येत नाही.

>>>अनिष्का बऱ्याच कठीण, हलाखीच्या प्रसंगातून गेलात आणि धैर्याने, नेटाने वर आलात. कौतुक.>>> +९९९

>>>अनिष्का बऱ्याच कठीण, हलाखीच्या प्रसंगातून गेलात आणि धैर्याने, नेटाने वर आलात. कौतुक.>>> +९९९

अनुष्का ह्यांनी त्यांच्या आयुष्य मधील जे प्रसंग सांगितले आहेत
त्या वरून असे वाटते त्यांच्या आयुष्यात अचानक अडचणी आल्या आहेत
खूप चढ उतार आहेत आणि ते अगदी टोकाचे.
आणि ज्यांच्या कडून अपेक्षा केली जाते तेव्हाच आपली माणसं साथ सोडतात.
हा खूप मोठा अपेक्षा भंग असतो.
सतत पराभव पण मनावर विपरीत परिणाम करतो.
आणि अशा लोकांच्या स्वभावात कायम स्वरुपी बदल होतो.
जसे ते लहान पना पासून असतात त्या पेक्षा वेगळा स्वभाव बनतो.
दीर्घ कालीन मनावर परिणाम होत असतो.
शांत असणारा व्यक्ती अग्रेसिव बनतो .
तापट असणारा शांत बनतो.

कोणावर पण विश्वास ठेवणारा नंतर कोणावर च विश्वास ठेवत नाही.

अनिश्का, ग्रेट !!
अश्या चढ उतारांशी लढून तुम्ही टिकून राहिलात.

धाग्याचे शीर्षक केवळ अनपेक्षित आहे म्हणून एक सांगू ईच्छितो, की आयुष्यात असे चढऊतार कधीच अनपेक्षित समजू नयेत. किंबहुना ते अपेक्षित समजूनच कायम त्यांच्याशी लढायची तरतूद करून ठेवावी.
चांगली असो वा वाईट, वेळ कधीही बदलू शकते.
ती देखील क्षणात.

अनिष्का बऱ्याच कठीण, हलाखीच्या प्रसंगातून गेलात आणि धैर्याने, नेटाने वर आलात. कौतुक. >> +११

वेळ कधीही बदलू शकते. >> खरय.

शेवटी तुम्ही खंबीर असणे, पॉझिटिव असणे खुप महत्वाचे.