दिगंत - २

Submitted by सांज on 16 March, 2021 - 05:40

“सो, काय प्लान आहे!”

स्टीरिंग वरचा हात गियर वर ठेवत संहिता ने रिया ला विचारलं.

बराच वेळ मॅप कडे पाहून आणि थोडेफार रिव्यूज वाचून रिया म्हणाली,

“आधी पुणे-सातारा रोड तिथून मग सरळ सातारा तिथून कोल्हापूर. दुपारचं जेवण कोल्हापूरला करु. मंदिराला भेट देऊ वाटल्यास. तिथून सरळ हुबळी. हुबळीला मुक्काम. मग सकाळी उठून होस्पेट, वगैरे करत दुपार पर्यन्त हम्पी! दॅट्स इट!”

“वॉव यार सुपरफास्ट रिया! Seems good. But, you know what.. I think, we should let this unplanned road trip be unplanned only. वाटेल तिथे थांबू. वाट्टेल ते करू. मोकाट सुटायचं ठरवलंच आहे तर फुल्ल ऑन सुटू. कुठे पोचण्याची घाई नको. आणि परतण्याची चिंता. लेट्स एंजॉय द जर्नी! What’s say?”

हातातला फोन बाजूला ठेवत, सीटवर मागे रेलत रिया म्हणाली,

“actually yar.. let’s do it! असंही या प्लॅनिंग आणि टाइमटेबल्सचा मलाही वीट आलाय. Let our souls wander for a while..”

“हम्म.. येस्स! बरं मी माझा फोन बंद ठेवलाय. चालू ठेवला तर तो वर्मा आणि ते ऑफिस मधले लोक जगू देणार नाहीत मला. तू काय करतेयस?” संहिता.

“मी ठेवेन चालू. लागेल आपल्याला जीपीएस वगैरे साठी. मला नाही येणारेत फारसे कॉल्स आय नो! मातोश्री करतील बट आय विल हॅंडल हर!” रिया.

“ओक्के देन! हियर वी गो..”

दोघींनी sunglasses चढवले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. कात्रजला डेअरीपुढे थांबून त्यांनी यथेच्छ लस्सी प्यायली. नाश्ता मात्र बनेश्वरच्या अलिकडे करायचं ठरलं. घड्याळात दहा वाजत आले होते. बायपास मागे सरून घाट लागला तशा दोघी त्यांच्या त्यांच्या विचारात जरावेळ गुंगल्या.

हे असं सगळं मागे सारून कुठेतरी निघून जाणं हा परिस्थिती वरचा उपाय नाही हे दोघींना माहीत होतं. पण असा एक ब्रेक मात्र नक्कीच गरजेचा होता. काही कोडी, काही समस्या केवळ थोड्याशा मोकळ्या हवेने आणि मनाला दिलेल्या हवापालटानेही निम्म्या हलक्या होतात, तसं काहीतरी.

मनात थोडंसं थ्रिल दाटलेलं असलं तरी आत कुठेतरी रिया प्रचंड उदास भासत होती. डोळ्यांतली सगळी स्वप्नं, उमेद सारं काही मागची दोन-तीन वर्षं तिने जिद्दीने केलेल्या अभ्यासात ओतलं होतं. क्षणाची उसंत नाही की वेगळा विचार नाही. तिच्या बाकीच्या मैत्रिणी जॉब, वीकएंड कल्चर, लग्न वगैरे गोष्टींमध्ये गुंग असताना ही मात्र झोप सोडून दिवसातले उरलेले सगळे तास पुस्तकांपुढे काढत होती. तेच तिचं विश्व झालेलं होतं. यूपीएससी म्हणजे अफाट अभ्यास इतकंच माहित असतं बर्‍याच जणांना. पण, तो अभ्यास अफाट असला तरी रोचक असतो. तो करता करता आपल्या आतली व्यक्ति घडत जाते. आपल्याही नकळत. इतिहास-भूगोलापासून विज्ञान, पर्यावरण, अर्थशास्त्र, राजकारण, राज्यशास्त्रापर्यंत कुठलाही विषय मग आपल्यासाठी वर्ज्य राहत नाही. त्या अभ्यासाची धुंदी चढत जाते. आपलं भान वाढत जातं. रिया तर अगदीच बुद्धिजीवी होती. यावर्षी पूर्वपरीक्षा-मुख्यपरीक्षा सगळं पार करत जेव्हा ती दिल्लीला संघ लोकसेवा आयोगात मुलाखत देऊन आली तेव्हा तिच्यासकट सार्‍यांच्याच तिच्या बाबतीतल्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण यश थोडक्यात हुकणं का काय ते ती आत्ता अनुभवत होती. यूपीएससीची तयारी हे जितकं बौद्धिक आव्हान आहे त्याहून अधिक ते मानसिक आव्हान आहे. अर्थात ती उमेद हरली नव्हती. पण, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची तेही आई-वडिलांना समजावून घेत, तर तिला थोडासा मोकळा श्वास आत्ता नक्कीच हवा होता. आणि तोच मिळवण्यासाठी ती क्षणाचाही विचार न करता लगेच संहिता सोबत निघाली.

संहिता आणि ती कॉलेज पासूनच्या मैत्रिणी. ग्रॅजुएशन नंतर रियाने वेगळी वाट निवडली पण संहिताने मात्र पुढे पोस्ट ग्रॅजुएशन केलं आणि आता ती मार्केटिंग क्षेत्रात चांगलाच जम बसवून असली तरी एक स्त्री, तेही अविवाहित म्हंटल्यावर वाट्याला ज्या काही नकोशा गोष्टी येतात त्या तिच्याही वाटेला येत होत्या आणि त्यामुळे ती हताश होत होती. पण, काही होवो हे असं पुन्हा ऐकुन घायचं नाही असं ठरवून, जाऊदे गेलीतर नोकरी म्हणत ती आज ड्रायविंग सीट वर बसली होती, स्वत:च्या केलेल्या कामावर आणि मेहनतीवर विश्वास ठेऊन..

थोड्या काळासाठी जगाला, जगण्याच्या अखंड चालू असलेल्या शर्यतीला मागे टाकत त्या निघाल्या होत्या मनातल्या क्षितिजांच्या शोधात..

कात्रज घाटातून बाहेर आल्यावर हायवेवर थांबून दोघींनी भरपेट नाश्ता केला. दोघीच तरुण मुली गाडीत पाहून वेगवेगळे लूक्स त्यांना मिळत होते. अशा लोकांच्या तोंडावर एक जबरी स्माइल फेकून त्या त्यांच्या वाटेला लागल्या.

विस्तीर्ण हायवे सुरू झाला. गाडी आता रियाने चालवायला घेतली.

संहिताने म्यूझिक ऑन केलं..

दोघींच्या डोळ्यांतलं समोर अस्ताव्यस्त पसरलेलं अवकाश त्या शब्दांवर ताल धरू लागलं..

Lately, I've been, I've been losing sleep
Dreaming about the things that we could be
But baby, I've been, I've been praying hard
Said no more counting dollars
We'll be counting stars
Yeah, we'll be counting stars..

दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. नेमकं गाणं लावल्यामुळे रिया संहितावर खुश होती. गाणं पुढे जाऊ लागलं तसा रस्ता भराभर मागे पडत होता आणि दोघींच्या डोक्यातले विचारही..

I see this life, like a swinging vine
Swing my heart across the line
And in my face is flashing signs
Seek it out and ye shall find

Old, but I'm not that old
Young, but I'm not that bold
And I don't think the world is sold
On just doing what we're told

गाण्यातले शब्द, संगीत आणि त्यांचा प्रवास सारं आता एक झाल्यासारखं भासत होतं.. Ryan Tedder च्या टिपेच्या सुरांत आपलाही आवाज मिसळत दोघीही आता मोठयाने गाऊ लागल्या..

I feel something so right
Doing the wrong thing
And I feel something so wrong
Doing the right thing
I couldn't lie, couldn't lie, couldn't lie
Everything that kills me makes me feel alive..

Said no more counting dollars
We'll be counting stars
Yeah, we'll be counting stars..

क्रमश:

सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users