वारांचे गणित

Submitted by मत on 8 March, 2021 - 21:11

वारांचे गणित

दिवसा मागून दिवस चालले ऋतू मागून ऋतू ..... हे कालचक्र अखंड चालत आहे. या सगळ्यांची सुरूवात कशी झाली हे बघणे मनोरंजक तसेच अवाक करणारे आहे. आपल्या पूर्वजांनी आकाशातील नक्षत्रे व ग्रह तारे यांचा अभ्यास करून अनेक गोष्टी शोधल्या.
पृथ्वी वरून आकाशात चंद्र, सूर्य व आपल्या सूर्यमालेतले इतर ग्रह फिरताना त्यांना दिसत होते. सूर्याच्या भ्रमणाचा मार्ग आकाशात सूर्योदय ते सूर्यास्त असा बघता येत होता. आपल्या सूर्यमालेतले ग्रह हे साधारणपणे याचं मार्गावर फिरताना दिसत होते. या सगळ्यांच्या मागे जे तारकामंडल होते ते स्थिर दिसत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रहांच्या गतिचा अभ्यास होत होता.

चंद्र हा सगळ्यात जास्त गतिने भ्रमण करतो हे लक्षात आले. एका नक्षत्रापासून सुरूवात करून पुन्हा त्या नक्षत्रात यायलासाधारण २७ दिवस चंद्राला लागत. या गतिला sidereal म्हणजे ताऱ्याच्या संदर्भातली गति म्हणतात. म्हणून ही पार्श्वभूमी २७ नक्षत्रांत (तारका समूह) विभागली गेली. ही गति व पुन्हा पहिल्या फेजमध्ये येण्याची गति यात फरक होता कारण या काळात पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरत असल्याने थोडी पुढे गेलेली असते. अमावस्ये पासून परत अमावस्येपर्यंत येण्यास चंद्राला साधारण २९-३० दिवस लागत. या गतिला synodic म्हणतात. व महिन्याला अमांत महिना म्हणतात. जो आपण व दक्षिण भारतात वापरतातो. उत्तरभारतात पौर्णिमांत कॅलेंडर असते.

संपूर्ण तारांगण जे ३६० डिग्री चे असते ते २७ नक्षत्रात वा — १२ राशि त विभागली गेले.
आता आपले वार शनिवार नंतर रविवार व त्या नंतर सोम, मंगळ ..... असे का येतात ते पाहू.

आपल्या पूर्वजांना मुहूर्त ही रोज लागणारी गोष्ट होती. पूजा, यज्ञ अशा अनेक गोष्टीत. त्यासाठी त्यांनी दिवस २४ होऱ्यात विभागला. यासाठी ग्रह गतिचा वापर केला गेला. मंद गति शनि पासून चंद्रापर्यंत रचना केली तर ती

शनि गुरू, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, चंद्र (नक्षत्रमंडळावर भ्रमण गति नुसार) अशी आहे.

प्रत्येक तासाला एक होरा दिला व त्याला होराधिपति म्हणत. पहिले सात तास झाल्यावर पुन्हा शनि पासून सुरूवात. अशा रीतीने २४ होराधिपति ठरले.

नंतर वार शोधण्यासाठी खालील सूत्र लिहिले गेले.

मंदात अधः क्रमेण स्युः चतुर्था दिनाधिपा।

सगळ्यात मंद शनि त्यापासून जर चौथा वार पाहिला तर तो सूर्य म्हणजे रविवार, त्यानंतर येणारा चौथा चंद्र म्हणजे सोमवार ...... असे वार ठरले. तुम्ही पुढचे मोजून पहा. खालील पिक्चर पहा

याला दुसरी पण पद्धत आहे, वरील क्रम १ ते २४ मोजला तर २५ वा म्हणजे दुसऱ्या दिवशीचा होरा सूर्य म्हणजे रविवार येतो. ४९ वा सोमवार .... मोजून पहा.

हे वार नक्की कधी सुरू झाले हे सांगतां येत नाही. इतर संस्कृतीतही नक्षत्र व ग्रहगणिताचा खूप अभ्यास होता. आपल्याकडे सूर्यसिद्धांत व वराहमिहिर इ च्या ग्रंथात अशी भरपूर माहिती आहे. काही मंडळी म्हणतात की काय करायचे हे माहित असून आपण आपले वार वापरावेत....आपल्या पूर्वसूरींचे कष्ट व त्यांनी संपादित केलेली माहिती जाणून घेणे मला तरी महत्त्वाचे वाटते. आकाशातल्या ग्रहांकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला हे नक्की.

शनि गुरू मंगळ सूर्य. रवि शुक्र बुध चंद्र. सोम
१ २ ३ ४. २ २ ३ ४. ३
२ ३ ४. ४ २ ३ ४. ५ २
३ ४. ६ २ ३ ४. ७ २ ३

दर चौथ्या जागेवर वार बदलतो शनि, रवी, सोम, मंगळ, बुध, गुरू, शुक्र असे वार निळतात.

4090DB0A-EC1B-47D3-8FDB-900D03048BD8.jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदात अधः क्रमेण स्युः चतुर्था दिनाधिपा। >> हेच सूत्र का लिहिले? वारांच्या क्रमाला काही वेगळा अर्थ आहे असं वाटत नाही. मग शनिवार नंतर चौथ्या गतीच्या फरकाचाच ग्रह/ तारा घेण्यात काय हशिल होतं/ आहे? सरळ चढत्या/ उतरत्या भाजणीने वेगानुसार वारांची नावे का नाही ठेवली?

नक्षत्रमंडळावर भ्रमण गति नुसार क्रमात मंगळ - सूर्य - शुक्र ह्यात सूर्य कसा येतो हे जरा समजावुन सांगता येईल का?
धन्यवाद.

अमितव
पृथ्वीवरून सर्व ग्रह व सूर्य हेनुस्त्या डोळ्यांनी भ्रमण करताना दिसत. पूर्वी पृथ्वी भोवती सूर्य फिरतो अशी समजूत होती. आणि डोळ्यांना दिसत होते. म्हणून सूर्य व चंद्र घेतले जात.
हाच श्लोक वापरला आहे कारण शनि सर्वात स्लो भ्रमण करतो . शनि गुरू मंगळ रवि सूर्य (-सूर्याचा रिलेटिव्ह वेग हा पृथ्वीएवढआाच असतो) , शुक्र बुध व चंद्र असा येतो. ग्रहांचा रिलेटिव्ह स्पीड बघितला तर कळेल.
शनि पासून सुरू करून हे ७ ग्रह ओळीने मांडत गेलोपुनरापवृत्ती करत तर २५ वा रविवार व ४९ वा सोमवार येतो
... असे शुक्रवारपर्यंत मोजण्यापेक्षा हा श्लोक शाॅर्टकट देतो.
गतिनुसार म्हणून हा क्रम .... तसा कुठलाही क्रम ठरवता आला असता

पूर्वी पृथ्वी भोवती सूर्य फिरतो अशी समजूत होती.
Submitted by मत on 10 March, 2021 - 22:43
>>
ही समजुत त्याकाळी भारतातही होती याचे काही संदर्भ मिळतील का?

एका नक्षत्रापासून सुरू करून पुन्हा तिथे परत येणे ही गति मोजली जात असे. २७ नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर ग्रह भ्रमण करतात.

पृथ्वी ऐवजी सूर्य का ते समजलं.
पण फक्त गतीनुसार क्रम असता तर ठीक होतं. पण त्यात तीन सोडून चौथा वार ह्या उड्या मारून रविवार, सोमवार येणार असतील तर रविवार, सोमवारचाच श्लोक बनवला असता तर आणखी सोपं गेलं असतं ना?
बाकी रविवार, सोमवार हे भारतीय परंपरेने शोधलेले वार आहेत का कसं? तसे असतील तर गुरू, शनी, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, सोम ह्या क्रमाने वार का नाही निवडले?
तसे नसतील तर ते मिळवायला (क्रम)/ लक्षात ठेवायला ही एक युक्ती आहे. रिव्हर्स इंजिनियरड युक्ती. बरोबर?

@अभिनव

सूर्यसिद्धांत या प्राचीन ग्रंथात पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा स्पष्ट उल्लेख आहे.
ग्रंथाचा काळ निश्चित नाही पण तो 700 AD च्या आधीचा आहे हे नक्की!

अमितव

ह्या क्रमात शनिवार ऐवजीरगुरूवार पासून सुरूवात केली तर पुढचा वार दाखवतो.
मुळात २४ तासानंतर जो २५ वा ग्रह येतो तो पुढचा वार असतो. कारण नवीनदिनवस सुरू त्याला दिनाधिपति म्हणत
ग्रीकांचा प्रभाव असावा

तुम्हाला त्यातील चौथ्या जागेवर वार येतो पुढचा हा पॅटर्न बघायचा बाकी नाही.
इतर ठिकाणी पण हा अभ्यास चालू होताच

सूर्यसिद्धांत या प्राचीन ग्रंथात पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा स्पष्ट उल्लेख आहे.
ग्रंथाचा काळ निश्चित नाही पण तो 700 AD च्या आधीचा आहे हे नक्की!
नवीन Submitted by सांज on 11 March, 2021 - 08:44
>>
+१
माननीय लेखक महोदय, 'सूर्य पृथ्वीभोवती फिरतो अशी भारतात समजुत होती' असा दावा करत आहेत. त्यांना संदर्भ विचारला होता तो काही त्यांनी अजुन दिलेला नाही उलट माझा प्रश्न स्किप करुन इतरच गप्पा चालू आहेत.

सूर्य - शुक्र ह्यात सूर्य कसा येतो हे जरा समजावुन सांगता येईल का? >> ह्यालाच अधिक स्पष्ट करायला सर्व ग्रह, सूर्य आणि चंद्र ह्यांची जी काही भासमान गती आहे त्यांची आकडेवारी दिलीत (रेडियन्स पर सेकंड, किंवा आकाशात कुठले एकक वापरतात त्यात), तर दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल.

अभि_नव यांचा प्रश्न पण योग्य आहे. ह्या क्रमात चौथ्याच स्थानावर वार का घेतले? सलग का नाही?

अभि_नव यांचा प्रश्न पण योग्य आहे. ह्या क्रमात चौथ्याच स्थानावर वार का घेतले? सलग का नाही?>>> बाकी या विषयातली काही माहिती नाही आणि वरच्या माहितीबद्दल काही मत नाही माझे कारण त्याबाबत अभ्यास नाही पण हा प्रश्न दोनवेळा वाचला आणि त्याचे गणिती उत्तर (अवकाश किंवा ग्रहगोल शास्त्रीय उत्तर नव्हे तर निव्वळ आकडेमोड) समजले तसे लिहीते. शनि हाच पहिले का धरला काउंटींगला त्याचे उत्तर मला माहिती नाही तो माझ्या उत्तराचा भागही नाही. मी निव्वळ चारच्या उड्या कुठून आल्या आणि चारचाच फरक का सलग का नाही याचे उत्तर मला जसे समजले तसे द्यायचा प्रयत्न करतेय

सर्वात आधी चारच्या क्रमांकाला जरावेळ बाजूला ठेवू आणि २४ तासांना ७ ग्रह त्या त्या तासाचे होराधिपती म्हणून कसे येतील ते गणित मांडून बघू
प्रत्येक तासाला एक होरा दिला व त्याला होराधिपति म्हणत. पहिले सात तास झाल्यावर पुन्हा शनि पासून सुरूवात. अशा रीतीने २४ होराधिपति ठरले.>>> हे जे लिहीलेय ते आकड्यांनुसार उतरवून बघू

शनि (१); गुरू (२); मंगळ (३); सुर्य (४); शुक्र (५); बुध (६); चंद्र /सोम (७)
शनि (८); गुरू (९); मंगळ (१०); सुर्य (११); शुक्र (१२); बुध (१३); चंद्र /सोम (१४)
शनि (१५); गुरू (१६); मंगळ (१७); सुर्य (१८); शुक्र (१९); बुध (२०); चंद्र /सोम (२१)
शनि (२२); गुरू (२३); मंगळ (२४); सुर्य (१); शुक्र (२); बुध (३); चंद्र /सोम (४)
शनि (५); गुरू (६); मंगळ (७); सुर्य (८); शुक्र (९); बुध (१०); चंद्र /सोम (११)
शनि (१२); गुरू (१३); मंगळ (१४); सुर्य (१५); शुक्र (१६); बुध (१७); चंद्र /सोम (१८)
शनि (१९); गुरू (२०); मंगळ (२१); सुर्य (२२); शुक्र (२३); बुध (२४); चंद्र /सोम (१)

(कंसातले आकडे हे दिवसाचा प्रहर्/होरा/तास दर्शवतात) २४ तास झाले की २५ वा तास म्हणजे दुसर्‍या दिवसाचा पहिला होरा म्हणता येईल.
बोल्ड केलेले होराधिपती आणि तासाचे आकडे बघितल्यावर त्यात एक पॅटर्न दिसतो तो असा:

दिवस क्रमांक १ होराधिपती क्रमांक १= शनि
दिवस २ होराधिपती क्रमांक शनिपासून ४ था = रवि/सुर्य
दिवस ३ होराधिपती क्रमांक सुर्यापासून ४ था = चंद्र/ सोम
दिवस ४ होराधिपती क्रमांक चंद्रापासून ४ था = मंगळ

म्हणून ग्रहांची क्रमवारी शनि ; गुरू; मंगळ; सुर्य; शुक्र; बुध; चंद्र /सोम अशी असली तरी नवीन दिवसाची सुरवात ४थ्या क्रमांकावर जो होराधिपती येईल त्यापासून होईल

प्रत्येक तासाला एक होरा - हे 24 भागीले 7 चे गणित जुळत असले, तरी संदर्भाशिवाय पटणे अवघड आहे. ह्याचे कारण पूर्वी कालमापन हे घटिका, पळे अश्या एकाकांमध्ये होते. 24 तास हे आजचे गणित झाले, तेव्हाचे नाही. बहुधा 60 घटिका म्हणजे 1 दिवस होता. त्यामुळे 24चे गणित त्यावेळी कुणी मांडले असण्याची शक्यता नाही. असल्यास संदर्भ द्यावा ही विनंती.

तास = होरा >> विकी वर वेगळीच माहिती आहे:
(संस्कृत आणि हिंदीत आहे, क्षमस्व)
कर्मफललाभहेतुं चतुरा: संवर्णयन्त्यन्ये, होरेति शास्त्रसंज्ञा लगनस्य तथार्धराशेश्च ॥ (सारावली)
विद्वान लोग होरा शास्त्र को शुभ और अशुभ कर्म फल की प्राप्ति के लिये उपयोग करते हैं। लग्न और राशि के आधे भाग (१५ अंश) की होरा संज्ञा होती है।