Submitted by नंबर१वाचक on 7 March, 2021 - 06:09
माझं आणि कवितेच फारसं जमत नाही
बरंच काही सुचतं पण पुढे काहीच होत नाही ..
रणरणतं ऊन.. आंब्याचा मोहोर
मोगऱ्याचा वास.. वाळ्याचं पाणी ..
उकाड्याने जीव हैराण होतो..
म्हणून मी काही लिहीतच नाही
बरंच काही सुचतं पण पुढे काहीच होत नाही ..
गुलाबी थंडी.. धुक्यातली पहाट
शेकोटीची ऊब .. पानांवरच दव
उगवणारा सूर्य .. गरम गरम चहा
बरंच काही सुचतं पण पुढे काहीच होत नाही ..
निळ्याबिळ्या आभाळात, करडे करडे ढग
काळेभोर डोंगर..हिरवेगार रान
पांढरेशुभ्र झरे .. प्रफुल्लीत मन
बरंच काही सुचतं..
कागद पेन घेऊन मी खिडकीत बसते. .
ओघळणाऱ्या पागोळ्यांना बराच वेळ न्याहाळते ..
डोक्यात शब्दांचे थैमान सुरु असते.. मेंदूच्या चिंधड्या उडतात
सगळे शब्द डोळ्यांवाटे वाहून जातात
कागद नुसताच ओला होतो..
मग मात्र पुढे काही सुचत नाही..
माझं आणि कवितेच फारसं जमत नाही..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला नक्की सांगता येणार नाही
मला नक्की सांगता येणार नाही तुम्ही कोण आहात...सुरवातीला अस वाटाल की
विराज कवी (कविता आणि बरच काही कार्यक्रमात आईकल्या होत्या त्याच्याकडून ) याची कविता आहे!
तो असल्याच कविता करतो
या प्रकाराला काय म्हणतात, शप्पथ मला माहीत नाही॰
मग खूप दिवसांच्या नंतर वैभव जोशी ची "हाय काय नाय काय" ही कविता वाचनात आणि दुस्तूरखुद्द वैभव जोशीच्या मुखातून आइकली!
मला सुद्धा अशी कविता लिहायला आवडेल पण
काय की जमतच नाही....
मुद्दा:- _अतिशय आवडली_
पोस्ट करून एक आठवडा झाला, मला
पोस्ट करून एक आठवडा झाला, मला वाटलं कोणी वाचलीचं नाही की काय.. का वाचली पण कोणाला आवडलीचं नाही बहुतेक..
पण अगदी वाई्ईट अश्या तरी कमेंट याव्या अशी अपेक्षा होती..
एकमेव आणि पहिलीचं कमेंट आली.. सकारात्मक.. आणि प्रगल्भ व्यक्तीकडून...
थँक्यू व्हेरी मच.
या कविता प्रकाराला काय म्हणतात माहिती नाही.. मी जसं सुचलं तसं लिहीलं
मला वाटलं कोणी वाचलीचं नाही
मला वाटलं कोणी वाचलीचं नाही की काय.. का वाचली पण कोणाला आवडलीचं नाही बहुतेक..>>> कविता खरचं आवडली..
कविता वाचली तेव्हा गडबडीत प्रतिसाद दयायचा राहून गेला होता.
कथा, कादंबरी, कविता, चित्रकला
कथा, कादंबरी, कविता, चित्रकला प्रत्येक प्रांतात हातखंडा आहे तुमचा रूपाली.. तुम्हाला आवडली म्हणजे जमलीये
खूप धन्यवाद
खूप मोठ्या मनाने कौतुक केलतं
खूप मोठ्या मनाने कौतुक केलतं तुम्ही माझं.. खरंतर माझ्या अंगी एवढी पात्रता नाही. इथे सर्वांचं लेखन वाचूनच शिकतेयं.. आणि प्रयत्न करतेयं..!
कविता मला वाचायला आवडतात कारण त्यामुळे बरेचं नवीन शब्द माझ्या शब्दसंग्रहात जमा होतात. अजून छान लिहित रहा... पुढील लेखनास खूप शुभेच्छा..!