अदलाबदल

Submitted by सामो on 5 March, 2021 - 07:47

आत्ताच सुरेश कुलकर्णी यांची, एक वेगळा दिवस नावाची मस्त मजेशीर कथा वाचली. त्यावरुन मी अन्यत्र प्रकाशित केलेली कथा आठवली. माबोवर टाकली असल्यास , अजुन तरी मला सापडलेली नाही. तेव्हा परत टाकली गेल्यास माफ करा पण ९९% मी इथे ही कथा प्रकाशित केलेली नाही.
______________
कथा अर्थातच काल्पनिक आहे पण मला हे असं घडावं असं प्रचंड वाटतं. त्यामुळे माझे नाव मुद्दाम गुंफले आहे. या विषयावर एक इंग्रजी सिनेमाही पाहील्याचे स्मरते. त्या सिनेमात अर्थातच काही सुंदर अन कुचक्या मुली वगैरे मसाला होता. तो काही आणता आलेला नाही. पण बाकी प्रयत्न केलेला आहे. कथा लिहीताना कल्पनाशक्तीचा तुटवडा जाणवला. वाचकांनी अजुन कोणते प्रसंग गुंफता आले असते ते सुचवले/ फुलवून मांडले तर मस्त सामुदायिक brain-workout होईल.
.
हे असं होईल असे जरी त्या जिप्सी बाईने सांगीतलेले असले तरी होईपर्यंत तिचा विश्वासच बसला नसता. कसं शक्य आहे? पण सकाळी ती ऊठली काय शरीर अगदी पिसासारखं हलकं झालं होतं. आरशापर्यंत जाईपर्यत तिला अगदी नीट जाणवली ती म्हणजे चपळता, spring in steps, सळसळता जोम. आह्हा! आज सकाळचा सुगंधच वेगळा होता, प्रकाशही वेगळा होता जणू काही सर्व इंद्रिये पहील्यांदा सकाळ अनुभवत होती. आरशासमोर ती गेली अन तिला आश्चर्याचा धक्का बसला. जिप्सी स्त्रीने वर्तवल्याप्रमाणे खरच ती २७ वर्षांनी लहान झाली तर होतीच पण तिला-शुचिला, रियाचे म्हणजे तिच्या मुलीचे शरीर मिळाले होते. अफाट तजेला, सुडौल अन सडपातळ शरीर, सतेज त्वचाच नाही तर आजूबाजूचे
vibrations शोषून घेणारा सतेज मेंदूही.
.
इतक्यात तिची मुलगी रियाही ऊठून आरशासमोर आली होती अन ती शुचिसारखी ४२ वर्षाची झाली होती. शुचिच्या शरीरात तिला एकदम जडजड अन म्हातारं वाटत होतं. Happy का नाही दोघींचे मन्/आत्मे तेच राहीले होते पण शरीरांची अदला-बदल झालेली होती.
.
इतके दिवस न चुकता दोघी एकमेकींना ऐकवत - "Just walk in my shoes one day & you'll know how hard it is".
हा हा! आज तो "one day" उगवला होता. (जिप्सी बाईची कृपा). आज एका दिवसाकरता दोघी एकमेकींचे विश्व अनुभवू शकणार होता. दोघी एकमेकींच्या भूमिका निभावण्यास सज्जच नाही तर आतुर होत्या. दोघींनी चूपचाप एकत्र नाश्ता केला अन एकमेकींची नजर चुकवत आवरुन निघाल्या. शुचिने बॅकपॅक घेतली अन पटकन घराबाहेर पडली. खरं तर अगदी उसनं अवसान आणलं होतं तिने. कॉलेजमध्ये नक्की काय होतं आजकाल कुठे माहीत होतं तिला? पण 'जो होगा वो देखा जायेगा" या तिच्या आत्मविश्वासाच्या जोरावर ती जग जिंकायला अन रियाचे विश्व पहायला निघाली होती.
.
आखूड स्कर्ट-टीन-एजी टॉप अन टेनिस शूज, पाठीवर बॅकपॅक. काय उधाणल्यासारखा उत्साह होता आज.... कॉफी न घेताही. Can you believe - कॉफी न घेता!!! Now that's something. चालत ती शाळेच्या आवारात पोचली तोच कीराने धावत येऊन मीठी मारली अन चॅसिडीही दोघींना येऊन मिळाली. किती भरभरुन बोलत होत्या मुली. कालच संध्याकाळी स्काइपवरती गप्पा मारुनही, रात्रभर जणू मोठ्ठी काही दिवसांची गॅप पडल्यासारख्या बोलत होत्या अन या तारुण्याच्या खळखळत्या झर्‍याचे उडणारे तुषार, शुचिला मनस्वी आनंद देत होते. संपूर्ण प्रांगणावर असेच उत्फुल्ल दृष्य होते. ह्म्म्म मग काय आहे रडण्यासारखं, छान आहे की हे आयुष्य तिने मनात हसत म्हटले अन कीराला चटट्दिशी एक कॉम्प्लिमेन्ट देऊन टाकली.
.
तीघी वर्गात आल्यावर काही वेळातच शिक्षीका आल्या. अन बरच जडव्यागळ, अवजड काहीबाही लेक्चर देऊ लागल्या. तास तसा गंभीर होता, मध्येमध्ये त्या प्रश्न विचारत होत्या. नशीब हिला काही विचारले नाही :). ह्म्म्म! सगळच काही hunky dory नव्हतं, अभ्यासाचा ताण होता. महत्त्वाकांक्षा अन स्पर्धाही होती.
.
मधल्या सुट्टीत कोणी मुलगा येऊन तिला चिठ्ठी देऊन गेला तो काही बोलणार तोच तिने चॅसिडी बोलावते आहे असे सांगून पळ काढला. चिठ्ठी उघडली अन इतकी सुंदर कॅलिग्राफी होती. तिचे अन त्याचे नाव मध्ये नक्षी, बाजूला नक्षी. सुं-द-र! तिने भांबावून चॅसिडीला ती चिठ्ठी दाखवली अन चॅसिडी हसत म्हणाली- आजही जोसाया नी तुला दिली ना चिठ्ठी? तो इतकी मस्त मस्त कॅलिग्राफी तुला भेट म्हणून देतो अन तू आहेस की ना त्याच्याबरोबर डबा खातेस. You never hang out with him. He is soon gonna give up on you.
Phew! हीचा जीव भांड्यात पडतो. मुलगी व्रात्यपणा करत नाही, हाताबाहेर गेलेली नाही. अरे मग!! आहेत आपले भारतीय संस्कार काय लेचेपेचे आहेत काय?
.
मधल्या सुट्टीत डबा खाताना गप्पांना परत ऊत येतो.चॅसिडीला कुकींग तर कीरा ला फ्रान्स मध्ये जाऊन फॅशन डिझायनिंग करायचे असते. ही म्हणते- ..मी IT जाईन म्हणते किंवा मग neurologist बनेन पण नक्की नाही. यावर चॅसिडी सहज उद्गारते "You asian kid's parents do a lot of savings for college unlike ours. We have to go for a student loan." त्या उद्गारात कसलीही काळजी किंवा कडवटपणा तिला जाणवत नाही. पण तिच्या पोटात मात्र गलबलतं. त्यात बोलता बोलता हेही कळतं की दोघींच्या आया single parents आहेत अन त्यांना boy-friends आहेत. कीरा सुट्टीत डोनट शॉप मध्ये काम करणार आहे, तिने नुकतेच work permit मिळवले आहे. चॅसिडीने learner's licence मिळवला आहे अन ती कार शिकणार आहे.
त्या दोघींना तिच्या हातची तूप-साखर-पोळी अत्यंत आवडते हे रियाने सांगीतले असल्याने ती दोघींना वीकेन्ड ला नाश्त्याकरता आमंत्रण देते.
.
दिवस संपून घरी जाताना, परत एक मस्त गप्पाटप्पांचा round होतो अन आज घरी कोणती कोणती गाणी ऐकून एन्जॉय करणार आहेत हे तिला कळते. नशीब रियाने काही गाणी सहज बोलता बोलता तिला सांगीतलेली असतात त्यामुळे तिलाही input देता येते.
.
घरी आल्यावर मात्र शुचिला मानसिक थकवा जाणवतो. रियाही घरी येते. खरं तर दोघींनाही एकमेकींना सांगण्यासारख्या खूपशा गोष्टी असतात पण जास्त गप्पगप्पच असतात. खरच एकमेकींचं जग त्यांना वाटतं तितकं rosey नसून, त्यात स्पर्धा आहे, असुरक्षितता आहे, अन अर्थात गोडवा आहे हे दोघींना पटलेलं असतं. दोघी झोपायला जातात - आपापल्या "known devil" आयुष्याला हसत हसत सामोरे जायला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कल्पनाविलास छान फुलवला आहेस. एकदम 'माझा आत्मा तुझ्यात अन तुझा आत्मा माझ्यात' सारख.
आता सुरेश कुलकर्णी यांची कथा वाचलीच पाहिजे.