अतिसंवेदनशील त्वचे साठी काळजी

Submitted by सन्मित on 1 March, 2021 - 10:11

माझी मोठी बहिण आहे, वय 45 वर्षे, तिची अतिसंवेदनशील त्वचा आहे, आधी ती चेहर्‍यावर lakme radiance fairness day cream वापरत होती 3 वर्षापासुन, अचानक त्या क्रीम ने तिला जळजळ व्हायला लागली, दूसरे काही सूट होत नाही, cetaphil ch moisture hi वापरुन पाहिले, काही फरक नाही, त्वचा चांगली राहण्यासाठी तिने काय उपाय केले पाहिजेत, इथे मी हा धागा टाकतोय कारण खरच खूप छान उपाय, सल्ले इथे मिळतात, धन्यवाद सर्वांचे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझीही त्वचा कुठल्याही क्रीम, मॉइश्चरायझर, ने जळजळते, डोळे तर चुरचूरतात त्याच्या फ्युम्स ने,
अगदी बेबी लोशन पण वापरून पाहिलं...

रोज सकाळी निरसं दूध चमचाभर चेहऱ्यावर लावणे
वेळ मिळेल तसं दुधात जायफळ,बदाम,हळकुंड सहाणे वर उगाळून, 10 min चेहऱ्यावर ठेवणे
रात्री पतंजली,खादी भांडार आणि आत्ता 1 महिना झाला Vaseline Aloe Gel , हे तिन्ही कोरफड जेल आलटून पालटून वापरते
इतकंच करणं मानवतं असल्या सेन्सिटिव्ह स्किनला Angry

अगदीच कुठली क्रीम वापरायची असेल तर आधी थोडं कोरफड जेल लावून त्यावर लावून पहायला सांगा
त्याने त्वचा जळजळत नाही
पण मला तेही चालत नाही माझे डोळे चुरचुरत राहतात

@धनवन्ती धन्यवाद , ताई ने हीच विको क्रीम आणि हिमालय हर्बल फैर्नेस क्रीम आणलीये, हिमालय ने पण २ दिवसातच जळजळ आणि चेहरा रेड झालाय

पण तिला त्वचेचे काही त्रास आहेत का?
त्वचा तेलकट /कोरडी असणे, खूप पिंपल्स असणे, डाग असणे इत्यादी?

नसतील तर कशाला काही लावयचंय?
काही विशिष्ट त्रास असेल तर त्यानुसार उपाय करा

वयोमानानुसार त्वचा कोरडी होत असेल तर अंगाला सगळीकडे शुद्ध घाणीवरून काढ्लेले तिळाचे किंवा खोबऱ्याचे तेल आंघोळी आधी किंवा झोपताना अंगाला लावणे , उन्हाळ्यात आंघोळ जास्त वेळा होत असेल तर दरवेळी अंगाला पुसटसा तेलाचा हात पुसणे

कोरड्या त्वचेमुळे कोंडा होत असेल तरी चेहर्यावर पुरळ उठतं - केस वारंवार गरम नसलेल्या पाण्याने धुणे, धुण्या आधी गरज असेल तर परत चांगल्या प्रतीचे खोबरेल तेल लावणे

घामोळ्याचा त्रास असेल तर चमचाभर खायचा सोडा मोठ्या बादलीभर पाण्यात घालून त्या पाण्याने आंघोळ करणे

जेवण /झोप नियमित असणे, आहारात ब जीवनसत्व पुरेसं आहे याची काळजी घेणे

उन्हात वावरताना टोपी /पूर्ण बाह्यांचा ओव्हरकोट वापरणे

@स्नेहमयी तिला असा जास्त त्रास नाही , आधी तिची स्किन खूप ऑईली होती नंतर तिला ३८ वर्षी डायबिटीस झाला , त्यानंतर खूपच स्किन कोरडी झाली , फार पिंपल्स आणि डाग नाहीत , आता थोडी निस्तेज वाटतेय त्वचा आणि थोड्या सुरकुत्या जाणवतंय

पण मी काय म्हणतो. क्रीम न लावताच त्वचा ठेवली तर........ असले काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत नां ?

स्नेहमयी, जेमबॉण्ड + १.

पालेभाज्या कच्च्या / किंचित वाफवून खाल्ल्याने त्वचेच्या काही तक्रारी/काही आजार यावर आराम मिळतो असा स्वानुभव आहे. पॉलीमॉर्फस लाईट इरप्शनवर मला पूर्ण आराम मिळाला आणि मी सांगितल्याने एकीला. आणि त्वचेला जरा टवटवी आली. पायावर एक लालसर चट्टा यायचा खाज कधी आग व्हायची. तो येणेही बंद झाले. यावर आधी त्वचा तज्ञांकडुन औषधं, उपाय करून झाले होते. पालेभाज्या एकदा वेगळ्या कारणासाठी कच्च्या खायला सुरू केल्या त्यात हा फायदा झाला.

फक्त एक दोघांचाच अनुभव असल्याने याला उपाय म्हणता येणार नाही पण तोटा नसल्याने कुणाची इच्छा असल्यास करून बघायला हरकत नाही.
मी सलाद सारखे पालेभाज्या धुवून, चिरून, हळद, मिरपूड कधी किंचित चाट मसाला, घालुन लिंबू पिळून खायचो / आताही अधुन मधून खातो . पालक, अंबाडी, घोळ आणि एक दोन पालेभाज्या इकडे मिळतात बहुतेक राजगिऱ्याची पाने वगैरे त्या.

स्मूदी करून पण घेता येईल.

पाणी किती पिते? त्वचा आतुन ओलसर असेल तरच बाह्य त्वचा टवटवीत दिसते. जेम्स बाँड इज राईट. त्या पेक्षा भरपूर पाणी, घरी बनवलेलेच ज्युस, नारळ पाणी आणी हो तिला ( बहिणीला ) सध्या तूर डाळ खाऊ देऊ नका, त्यापेक्शह मूग डाळ खाण्यात असु दे. आमच्या ऑफिस मध्ये एका मुलीला असाच प्रॉब्लेम झाला तर डॉ नी तिला तूर डाळ बंद करायला सांगीतली होती. मुगाने बराच फायदा झाला तिला.

@रश्मी. पाणी भरपूर पिते ती ,तूर डाळ वैगेरे जवळ जवळ खातच नाही ,मला वाटते डायबिटीस आणि मानसिक तणाव यामुळेच सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत

शतघौत घृत , युनायटेड फार्मसी किंवा सातार्‍यच्या आयुर्वेदिक अर्कशाळेचं मिळतं. अत्यंत अन-ग्लॅमरस पॅकिंग / बाटली असते.
पण अगदी सौ दुखोंकी एक दवा आहे.
पण लावून बाहेर जाता येणार नाही, तूपाचा वास येतो. अगदी कमी लावावं लागतं तूपावर पाणी असतं बाटलीत, तेही चांगलं असतं, ते न फेकता पायाला / टाचेला लावलं तर पायाच्या भेगा वगैरे एका दिवसात गायब झाल्या.

हो, शतधौत घृत ( म्हणजे १०० वेळा पाण्याने धुतलेले घरचे साजूक तुप ) डोळ्याखाली जे काळे येते त्या साठी आमच्या आमच्या आयुर्वेदीक डॉक्टरने लिहुन दिले होते. पण माझ्यात पेशन्स नसल्याने मी जास्त दिवस, म्हणजे रोज लावले नाही. हे तुप बाह्य उष्णतेवर चांगले आहे. खाण्यासाठी अजीबात नाही.

हे खाण्यासाठी नाहीच , त्वचा कोरडी पडणं ,उष्णता, भाजणं कापणं इ. वर बाह्य उपचार म्हणूनच

कैलासजीवन खाल्लं तर चालंतं

रोज वापरातल्या क्रिमने अचानक जळजळणे म्हणजे खालील दोन कारणे असू शकतात..

१. क्रिममध्ये असलेल्या घटकांत कंपनीकडून बदल करण्यात आले असावेत किंवा त्यांच प्रमाण बदललं असावं आणि ते आता सूट होत नसावं..(ही शक्यता तशी फार कमी आहे पण कधी कधी काही products upgrade करताना कंपनी असे छोटे छोटे बदल करु शकतात)

२. शरीरात होणारे बदल if not wrong महिलांमध्ये ४०शी नंतर अनेक बदल होतात..उदाहरण पिरीअडस थांबल्यामूळे हार्मोन्समध्ये होणारे बदल वैगेरे आणि काही बदलांमूळे सडन unknown alegries डेव्हलप होणे...

आता वर दिलेली कारणे चाचपडुन पाहणं तसं अवघडच आहे पण त्वचा चांगली राहण्यासाठी खालील उपाय करु शकता.

१. रोज सकाळी संत्री किंवा मोसंबीचा ज्युस पिणे.. ह्या फळांत vitamin C भरपूर प्रमाणात असते आणि त्वचेसाठी हे खुप फायदाच आहे..

२. भरपूर पाणी पिणे.

३. रात्री झोपताना हळदीच कोमट दूध पिणे.

४. पुरेशी झोप

५. दर चार दिवसांनी वाफ घेणे. (सोना कि़वा स्टीम बाथ घेणं जमलं तर अतिउत्तम.)

६. डाळीच्या पिठात हळद गुलाबजल मिसळून मिश्रण तयार करुन चेहर्यावर लावणे‌. (आठवड्यातून दोन वेळा)

६. ग्लिसरिनमध्ये थोडं गुलाबजल मिसळुन लावावे ह्याने त्वचा कोरडी पडत नाही आणि मुलायम होण्यास फार मदत होते..

टीप : आयब्रो केल्यानंतर ग्लिसरीन लावू नये..

जाई, वापरुन बघ. त्याने नुकसान व्हायची शक्यता कमी. मी जास्त वापरले नाही.

अजय, उपाय चांगले आहेत फक्त डाळीचे पिठ वापरायचे असेल तर ते मसूर डाळीचे वापरावे, चण्याचे नाही. त्याने चेहेरा आणखीन कोरडा होतो कारण बेसन तेल शोषुन घेते. मसूर डाळीचे पीठ अगदी लहान बाळांसाठी देखील चालते. मी माझ्या मुलीकरता वापरत होते ते.

She may be menopausal and is already middle aged. Focus should now be on health . Get all her tests done.

कोणतेही नवीन क्रिम/लोशन/लेप लावायच्या आधी ते सूट होते कि नाही याची patch test करून खात्री करून घ्या.
एकदा माझ्या बहिणीने मसूर डाळ घातलेला लेप मला चेहऱ्याला लावायला दिला होता. तो मला सूट झाला नव्हता.

जिद्दू, तुम्ही कैलास जीवन वापरले नाही का कधी? Uhoh त्याच्यात पण पाणी असते. आणी ते वापरता येते. तुप जर गरम केले तर पाणी उडेल. पण ते लोण्यासारखे फेटुन धुतले तर त्यात पाणी रहाणारच.

<<अगदी कमी लावावं लागतं तूपावर पाणी असतं बाटलीत>>
मी पण पाहिले आहे त्या तुपावर पाणी. ते पाणी सुद्धा औषधी असते.

कैलास जीवन मी नाही कधी वापरले पण ते आणि शतधौत घृत पुर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. पाणी वर येतेय म्हणजे क्वालिटी कंट्रोलचा प्रॉब्लेम दिसतोय कारण कमी वेळा धुवून शतधौत म्हणून विकल्यास असेच होणार. असो

सन्मित, तुम्ही लक्षणे सांगताय त्यावरून मला स्किन बॅरिअर खराब झाल्यासारखे वाटतंय. त्यांनी काही ट्रीटमेंट वगैरे घेतली होती का ? ते नैसर्गिकपणे नीट व्हायला वेळ घेते. मला ट्रेट क्रीम वापरल्याने तो त्रास सुरु झाला होता पण दुसऱ्या धाग्यात सांगितल्याप्रमाणे शतधौत(कोट्टाकल), स्नेल एस्सेन्स, सेरामाइड क्रीम, ह्यालारुणिक ऍसिड, विच हेझल एस्सेन्स यांचा उपयोग झाला/होतोय.

नाही जिद्दू ट्रीटमेंट कोणतीच घेतली नाही ,ती चेहर्‍यावर lakme radiance fairness day cream वापरत होती 3 वर्षापासुन, अचानक त्या क्रीम ने तिला जळजळ व्हायला लागली,

>>>पाणी वर येतेय म्हणजे क्वालिटी कंट्रोलचा प्रॉब्लेम दिसतोय कारण कमी वेळा धुवून शतधौत म्हणून विकल्यास असेच होणार.

त्या बॉक्स मधे माहिती पत्रक आहे, त्यात लिहिलय की पाणी असणार आहे वर आणि ते फेकू नका; ते पाणी सुद्धा औषधी आहे. त्यामुळे क्वालिटी चा प्रॉब्लेम वाटत नाही. आणि त्या पाण्याचा मला अतिशय उपयोग झाला

https://www.youtube.com/channel/UC5IXFGvaZMmCgaj8k9RhYoQ/search

यांचे व्हिडिओ मला आवडतात, मी काही केलेलं नाही अजून हे बघून पण तिकडच्या कमेंट्स वापरून बर्‍याच लोकांना फायदा झालाय असं वाटतय.
त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत बहुदा, संपर्क ही करता येइल स्पेसिफिक प्रॉब्लेम साठी

फेअरनेस क्रीम त्वचा खूप कोरडी करतात. आमच्या ऑफिस मध्ये त्वचा तज्ञ् आली होती ती सांगत होती. बीबी आणि cici क्रीम सुद्धा स्किन कोरडी करतात. तीन वर्ष सलग वापरल्याने कदाचित असे होत असेल. तज्ञाचा सल्ला घ्या.

स्नेहमयी, जेमबॉण्ड + १.>>>+१.
सन्मित,तुमच्या बहिणीला पाँडस कोल्ड क्रीम सूट होते का? त्वचा रुक्ष झाली असल्यास रात्री ते लावायचे.माझ्या आईने हा प्रयोग गेली १० वर्षे केला अगदी न चुकता.तिची कोरडी त्वचा मऊ दिसायला लागली.
३-४ वर्षापासून उन्हाळ्यात फक्त मी सनस्क्रीन लोशन लावते.कारण एके वर्षी उन्हाळ्यात गालावर आधी छान गुलाबी रंग आला होता,नंतर तपकिरी झाला.नंतर चेहरा चमचमायला लागला होता.एरवी तेलकटपणा टाळण्यासाठी फक्त पावडर वापरते.

@keya ,SBL chi cream silk and stay मागवली आहे, अणि काही facepack घरगुती लावणार रोज, बघुया काय होतय, एका ठिकाणी वाचले की एरंडेल तेल चेहर्‍याला लावा surukutyasathi

वरच्या च्यानेलमधल्या बाई एमडी आयुर्वेद आहेत आणि प्रॅक्टिसबी करत आहेत. त्यांचे स्वतःचे केस अकाली पांढरे दिसत आहेत. त्यांना माझे केस कमी वयातच पांढरे झालेत तरी सल्ला द्या म्हणून कॉन्टॅक्ट करू काय ? Wink
बादवे आपापल्या धंद्याची जाहिरात करायला यूट्यूब छान आणि बिनखर्ची माध्यम आहे फक्त थोडी बोलायची अक्कल पाहिजे आणि नेहमीचे थोडे जार्गन टाकले का लोकं होतातच इंप्रेस. बाकी कोणी कितीही काही करू आपल्या वैद्यशिरोमणी स्वागत तोडकरला जगात तोड नाही कुठे Proud

केस अकाली पांढरे होण्यामागे मॅलेनिन नावाचा घटक कारणीभूत असतो मॅलेनिनच्या प्रमाणामूळेच आपल्या केसांचा आणि डोळ्यांचा रंग ठरत असतो..

बाकी प्रदषण, अतिताणामूळेदेखिल केसं पांढरे होऊ शकतात..

ह्यावर रामबाण उपाय नाही.. कलर करणं हेच काय आपल्या हातात आहे‌‌. माझे स्वत:चे केसंदेखिल अकाली पांढरे झालेत. कलर करत असल्यामूळे त्यात अजूनच भर पडली आहे..

हिना मेहंदी लावणं त्यातल्या त्यात बरं आहे.. ही मेहंदी कशी तयार करायची हे सांगेन नंतर कधीतरी..

>>हिना मेहंदी लावणं त्यातल्या त्यात बरं आहे.. ही मेहंदी कशी तयार करायची हे सांगेन नंतर कधीतरी..

नक्की लिहा, नंतर कशाला लौकर लिहा

अकाली किंवा कसे , केस पांढरे होण्यामागे अनुवंशिकता पण असते.
माझी आजी (आईची आई) ८४ वर्ष जगली पण काळेभोर केस, एखाद दुसरा पांढरा सापडतोय का पहायचो.
काहीही विशेष करायची नाही.
माझी आई आणि मावशी - कधीतरी एखादा पांढरा दिसतो. केअर म्हणाल तर केसांसाठी लाइफ्बॉय हे सर्वोत्तम साबण आहे असा समज मावशीचा आहे .

माझी दुसरी आजी (वडिलांची आई) - हिचे बरेच पांढरे होते केस, पण केसांचा पोत, आणि क्ल्वालिटी खूप छान. वडिलांचे पण; माहीत नाही माझं काय होईल ते

ग्यारेंटेड होमिओपॅथिक क्रीमस आहेत Beckoment कंपनीची. पूर्वी वीसेक होती. आता काही ठराविक ठेवलीत.
ग्राफाइट
क्रिसान्थम
वगैरे
( जो काही विवक्षित त्रास असेल त्यासाठी औषध लावायचे. तीन दिवसांत फरक जाणवला पाहिजे. आणि त्रास कमी झाल्यावर मलम चोपडत राहायचे नाही. बंद करायचे. बरेच महिने इफेक्ट राहतो. आणि एका वेळी कोणतेही एकच औषध करणे. निरनिराळी औषधे एकाच वेळी अजिबात नाहीच.)

होमिओपथी क्रिम सर्वांना (suit ?)होतात का?
SBL silk stay cream? हे ब्युटी ट्रिटमेंट क्रीम असावे. म्हणजे एखादा सिझन वापरण्यासाठी केले असेल. औषधे ही नेमक्या रोगावर/त्रासावर गुण देतात. प्रश्न लागु होण्याचा असतो suit होण्याचा नाही. अथवा गुण दाखवत नाही.
लेखातला प्रश्न आहे ' त्वचा अति सेन्सटिव ' हा रोग नसून प्रवृत्ति दर्शवते. त्यावर औषध नसते. कोणती गोष्ट टाळल्यावर बरे वाटते हे शोधावे.
(( मी डॅाक्टर/वैद्य नाही.))