डोळ्यांखालील काळी वर्तुळे कशी घालवावीत?

Submitted by सान्वी on 17 February, 2021 - 13:04

डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी काही उपाय असल्यास सुचवावा. पूर्ण8 तास झोप घेते आहे रात्री. परंतु ही सर्कल्स काही जात नाही. मध्ये काही क्रीम्स पण लावून पाहिल्या परंतु काही फरक पडला नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पुरेशी झोप घेणं फक्त पुरेस नाही त्याचबरोबर तणाव आणि स्क्रिन टाईम रिड्यूस करणं हे देखिल तितकेच गरजेच आहे.. पी.सी. लॅपटाॅपवर जास्त वेळ काम कराव लागत असेल तर चश्मा बनवून घ्या.. मोबाईलचा Brightness कमी ठेवा..

जर extreme level असेल म्हणजे त्वचा पूर्ण काळी पडली असेल आणि ड्राय होऊन सुरकत्या पडल्या असतील तर कोणतीही क्रिम किंवा रेमडी अप्लाय करुनसुद्धा थोडासाच फरक पडेल पूर्णतः जाणार नाहीत..

तरीही खालील उपाय करु शकता..

१. काकडीचे काप किंवा रस वीस मिनिटे रोज लावा..

२.बटाट्याचे काप किंवा किससुद्धा उपयोगी आहे.. बटाट्यात नॅचरली ब्लिचिंगचे कन्टेट असतात. डाग फेड करण्यासाठी आणि ग्लो येण्यासाठी काळ्या वर्तुळाबरोबरच संपूर्ण चेहर्यावरसुद्धा अप्लाय करू शकता.. चार आठवड्यामध्ये फरक जाणवू लागेल.

३.पिकलेला टाॅमेटासुद्धा फायदेशीर ठरू शकतो.

४.ग्रीन टी बॅग फ्रिजमध्ये ठेऊन थंड झाल्यावर डोळ्याखाली वीस ते पंचवीस मिनिटे ठेऊन नंतर थंड पाण्याने धुवा.

५.मध आणि अॅलोव्हॅरो जेल (शक्यतो पंतजली) मिक्स करून हलक्या हाताने मिश्रण लावावे आणि वीस मिनिटानंतर धुवावे..

६.बदाम तेलाने हलक्या हाताने (खरंतरं बोटाने) रोज मालिश करावी.

७. गुलाबजलाने रोज रोज रात्री झोपताना हलक्या हाताने मालिश करावी‌.

ह्यातले उपाय करून पाहा लगेच फरक पडेल ही आशा ठेऊ नका. रोज नियमित करालं तर नक्कीच फरक जाणवेल..

फास्ट रिझल्ट पाहिजे असेल तर मग लेजर ट्रिटमेंटशिवाय पर्याय नाही पण आयईल नाॅट रिकमेंड धिस काॅज हे खुपच खर्चिक आहे आणि परत परत करावं लागू शकतं आणि प्लस आयसाईट कमी होण्याचे चान्सेससुद्धा असतात (टोटली डिपेन्ड अपाॅन स्किन टाईप). सो इतकी रिस्क शक्यतो घेऊ नका..

काही अजून टिप्स.

वारंवार डोळे चोळू नका.

पावडर क्रिम किंवा काहीही चेहर्यावर अप्लाय करताना डोळ्याजवळ हात फिरवू नका त्याऐवजी एकाच बोटाचा हलक्याने वापर करा.

भरपूर पाणी प्या.

ताजी फळे काकडी, गाजर, पालेभाज्या आहारात समावेश करा.

रोज किमान दिवसातून तीन वेळा थंड पाण्याने चेहरा धुवा.

डोळ्यांची उघडझाप आणि डोळे फिरवून थोडं डोळ्यांना रिलॅक्स करा.

जास्त उन्हात फिरू नका.. गरजेच असेल तर सनसक्रिन लावत जा आणि घरी आल्यावर लगेचच चेहरा धुवा..

होप सो हे तुम्हाला उपयोगी पडेल.

बहुतेक हिमोग्लोबिनचे रक्तातले प्रमाण कसे आहे त्यावर हे अवलंबून आहे. बाह्य गोष्टींनी तात्पुरता फरक पडतो. आतून निरोगी होणं गरजेचं आहे. तज्ज्ञांकडून लोह व इतर बाबी तपासून घ्या ते जर व्यवस्थीत असेल तर मगं डर्मेटॉलॉजिस्टला दाखवू शकता.

घरच्यांकडून जेनेटिकली भेट मिळाले असतील तर ते कधीही पुर्णपणे जाणार नाहीत. सोनम-आलिया अशा बऱ्याच अभिनेत्रींना आहे हा इश्यु . सो बाहेर जाताना बेस्ट जुगाड हा कंसिलर वापरणे हाच असेल.
नैसर्गिक घटक म्हणुन रोजहिप ऑइल , आल्मन्ड ऑइल आणि कुंकुमादी तेल यांचा वापर करू शकता.
क्रिम वापरायच्या असतील तर अल्फा अर्बुटीन, कोजीक ऍसिड आणि नायसिनामाईड यांचा समावेश असलेल्या क्रीम्स वापरा. यातील पहिले दोन घटक मेलॅनिन इनहिबिटर म्हणून कामी करतात. लगेच फरक तर कशानेच पडणार नाह. स्किनकेअर मध्ये बराच संयम ठेवावा लागतो. वरील गोष्टींवर स्वतः व्यवस्थित गूगल सर्च करून मगच ठरवा काय वापरायचे ते. चांगला स्किनचा डॉक्तर भेटायला आणि तो तुम्हाला सूट व्हायला नशीब लागते तरी तुम्ही एखाद्याचे कन्सल्टेशन घ्यालच ही अपेक्षा आहे.

मला खालील उपायाने फायदा झाला म्हणजे १००% नाही पण वरती अजय चव्हाण यांनी म्हंटले आहे त्याप्रमाणे खुप गडद काळे सर्कल्स आणि सुरकुत्या होत्या त्यात सुधारणा होऊन आता गडद छटा कमी झाली आहे आणि सुरकुत्या जवळपास पुर्ण गेल्या आहेत. तर उपाय असा

१ टेबल स्पुन कुकुमादि तेल
४ टेबल स्पुन ऍलोवेरा जेल
१२-१५ टेबलस्पून आवडिचे इसेंशियल ऑइल (मी गुलाब आणि लवेंडर एकत्र करून वापरले)
एका वाटीत घेऊन एकत्र फेटायचे. व्यवस्थित फेटले गेले की केशरी रंगाचे तेल ऍलोवेरा जेल मध्ये मिक्स होउन जेल अपारदर्शक पिवळ्या क्रीम सारखे दिसायला लागते. ते एका बाटलीत भरून, रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून पुर्ण चेहर्यावर क्रीम सारखे लावायचे. डोळ्यांच्या अवतीभवती मधल्या बोटाने लावुन अर्धा मिनिट मसाज करायचा. मला धुळीची ऍलर्जी असल्याने डोळ्यांभोवती पफीनेस आणि काळेपणाचा त्रास गेली बरेच वर्षे आहे तरीही वरील क्रीमच्या नियमीत वापराने दोन महिन्यांत फायदा जाणवला. त्या मुळे हा उपाय चांगला आहे हे खात्रीने सांगू शकते.
ह्या क्रीम मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे कुमकुमादि तेल. ते बर्याच ब्रॅंड स चे मिळते आणि किमतीतही खुप फरक आहे. पण जास्त किंमत म्हणजे चांगली क्वालिटी असं गृहीत धरू नका. आयुर्वेदात लिहिलेल्या फाॅर्म्युल्यानुसार हे तेल २६ घटकांना दुधात उकळून नंतर त्यात तिळाचे तेल मिसळून दुध पुर्ण पणे आटवुन तयार केले जाते. ह्या २६ पैकि दहा घटक दशमुल ह्या नावाने एकत्र मिळतात त्या मुळे अस्सल कुमकुमादि तेल हे दशमुल + उर्वरित १६ घटक एकत्र करुन क्षीरपाक विधि (वरती सांगितलेली पद्धत) ने तयार केले गेलेले आहे ह्याची खात्री करुन घ्या.

नुसत्या बाह्य उपचारांनी फरक पडत नाही...पडला तरी तात्पुरता पडतो...पोटातून औषध घ्यावीच लागतात...खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पचन नीट न होणे , गर्भाशयाची संबंधित तक्रारी ,मानसिक ताण तणाव अशा अनेक गोष्टींमुळे डार्क सर्कल्स येऊ शकतात...नानाविध तेल,मलम,cream,घरगुती फेस पॅक हे सगळे वरवरचे उपाय आहेत....एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून या सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत..चार दिवसात नितळ त्वचा,आठ दिवसात पिंपल्स गायब,एक आठवड्यात 3 kg वजन कमी असे शेकडो व्हिडिओ youtube वर पाहायला मिळतील ..पण त्यात किती तथ्य आहे हे अनुभव घेतल्यावरच कळते..असो..तुमचे डार्क circles लवकर कमी हाउदेत या शुभेच्छा

तारूण्यपीटिकांचे डाग जातात असे वाचून जायफळ उगाळून कपाळावर आणि गालावर एक दोन ठिपके लावले होते मी कॉलेजात असताना. प्रचंड आगआग झाली होती. डोळ्याखालची त्वचा आणखीन नाजूक असते. तिथे असले काही ' आजीबाईचा बटवा' प्रकार करून बघू नका .

सान्वी ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. नियमित पुरेशी झोप आणि व्यायाम पण गरजेचे आहे. बाकी वरील उपाय पण करा. पण काहीही लावताना डोळ्याखाली अजिबात जोरात चोळायचे नाही अगदी हलक्या हाताने लावावं.
अजून एक, तुम्ही बारीक असाल तर ते जास्त दिसतात सो वजन वाढवण्याचा प्रयत्न करा. ( अर्थात हेल्दी पध्दतीने. फास्ट फूड ने नाही) थोडं वेट गेन झालं की appearance कमी होतो.