विषय खूप सिंपल आहे
शाहरुखच्या गालावर डिंपल आहे
जेव्हा ती कळी खुलते
तेव्हा तो लाजलाय हे कळते
मायबोलीवर सुद्धा हे दाखवायला एक स्माईली आहे
अग बाई ईश्श 
तसे तर मायबोलीवर ईतरही काही स्माईलीज आहेत,
राग आला की तो असा देऊ शकतो 
हसायला आले की असे दात दाखवू शकतो 
जास्तच आले तर असे जबडे फाडू शकतो 
त्याहून अनावर झाले तर गडाबडा लोळू शकतो 
एखादी व्यक्ती आवडली तर तिला असे स्मितहास्य देऊ शकतो 
जास्तच आवडली तर असा डोळाही मारू शकतो 
पण ते तिला नाही आवडले तर लगेच हा दिवा
दाखवत हलक्यातच घ्या हं म्हणू शकतो
तरीही तिने रागच दिला तर असे उदास होऊ शकतो 
किंवा आपल्याला काही कळलेच नाही असेही दाखवू शकतो 
पण जगात काय ईतकेच ईमोशन्स आहेत का? यापेक्षा जास्त भाव तर मायबोलीकरांच्या लाडक्या स्वप्निल जोशीच्या चेहर्यावर दिसतात.
मग आपल्या खर्या आयुष्यात तर कित्येक असतील.
तर ते व्यक्त करायला तितक्याच विविध ईमोशन्सच्या स्माईली नको का?
जसे की माझा अजून एक धागा आलेला बघून कोणाला कपाळ बडवावेसे वाटले तर ती भावना व्यक्त करायची सुविधा मायबोलीने पुरवायला नको का? 
तिथे व्हॉटसप दर तासाला एक नवीन स्माईली एक नवीन ईमोजी मार्केटमध्ये आणतेय, मायबोलीकर तरी कधीपर्यंत आहे त्यातच समाधान मानणार.
प्रशासन आपली मागणी मान्य करेल तेव्हा करेल. पण तोपर्यंत आपल्याला कोणकोणत्या स्माईली हव्यात हे तरी आपण या धाग्यात गोळा करूया..
चला तर मग.... माझी पहिली मागणी.. जी कोणालातरी मागणी घालताना कामी येऊ शकते.. मला डोळ्यात बदाम बदाम बदामवाली स्माईली हवी आहे 
तळटीप - विषय मायबोली आयडी रानभुली यांनी सुचवला आहे 
>>मला दंडवत >--<० इमोजी हवी
>>मला दंडवत >--<० इमोजी हवी आहे.<<
सध्या हि चालवुन घ्या...
ती म्हणजे हव्या त्या यूजरला
ती म्हणजे हव्या त्या यूजरला "इग्नोर" करणे
>>>>
हि स्माईली नक्की देणार कशी?
नाक मुरडताना दाखवायचे का?
Like, Thumbs up/down, इमोज्या
Like, Thumbs up/down, इमोज्या आणि स्टीकर्स असलेल्या ठिकाणी लोक कौतुकाचे, टोमण्याचे दोन शब्द लिहायचा पण कंटाळा करता असा अनुभव आहे.... सगळे कसे रेडिमेड पाहिजे लोकांना!
तुमच्या भावनांना पूरक अश्या काही निवडक इमोजींना हरकत नाही पण उगा त्यांचा भडीमार नको
ज्यांना ज्या स्माईल्या हव्या
ज्यांना ज्या स्माईल्या हव्या आहेत, त्यांनी तसे भाव चेहऱ्यावर आणुन त्याचे फोटो किंवा व्हीडीओचे GIF बनवून पोस्ट करा, हाकानाका.
:चंमतग मुळे भडकलेली बाहुली:
:चंमतग मुळे भडकलेली बाहुली:
ही मला अॅप्लीकेबल होईल.
वरची प्रतिक्रिया वाचून हे
त्यापेक्षा असं केलं तर उपलब्ध इमोजींपेक्षा वेगळ्या भावना मनातच येऊ देऊ नयेत. अंथरूण पाहून पाय पसरावेत तसं इमोजीज बघून भावना पसराव्यात.. आज न उद्या इमोजीज हातात खेळू लागतील मगं उडवूया .
:p
कानफट सडकुन शेकणारी बाहुली
कानफट सडकुन शेकणारी बाहुली हवीय.
ज्यांना ज्या स्माईल्या हव्या
ज्यांना ज्या स्माईल्या हव्या आहेत, त्यांनी तसे भाव चेहऱ्यावर आणुन त्याचे फोटो किंवा व्हीडीओचे GIF बनवून पोस्ट करा,
>>>>>>>
हे मी ऑर्कुटवर नवीन असताना केलेले. मराठी सिंगल, मराठी गर्ल बॉय अश्या समूहांवर मुलींना इम्प्रेस करायला असलं काहीबाही करायचो
हसायचे होते, राग द्यायचे होते, आश्चर्यचकीत झाल्याचे होते, रात्री झोपायला जाताना म्हणून टाकायला डोळे मिटून झोपलेले फोटो काढले होते...
उत्खननात सापडले तर पोस्ट करतो...
लोक कौतुकाचे, टोमण्याचे दोन
लोक कौतुकाचे, टोमण्याचे दोन शब्द लिहायचा पण कंटाळा करता असा अनुभव आहे....
>>>>>>
हे मात्र खरे आहे, फेसबूक लाईक्समध्ये आता केअर सुद्धा एड केले आहे.. पण त्या जागी काळजी घे या दोन शब्दांनी जास्त बरे वाटते.
माबोची :इश्य: बाहुली ही इश्य
माबोची
बाहुली ही इश्श ऐवजी आरशात बघितल्यावर गालाला हे काय लागलंय बघून कन्फ्युजून तोंडांचा चम्बु झाल्यासारखी वाटते.
त्यापेक्षा असं केलं तर उपलब्ध
त्यापेक्षा असं केलं तर उपलब्ध इमोजींपेक्षा वेगळ्या भावना मनातच येऊ देऊ नयेत >> अरे बाप रे! स्थितप्रज्ञस्य का भाषा!!
मायबोलीने आता अधिकृत युनिकोड
मायबोलीने आता अधिकृत युनिकोड इमोजी वापरायला हरकत नाही. बहुतांश सोशल मिडीया प्लाटफॉर्मवर आता त्याच वापरल्या जातात. मायबोलीवर मात्र अद्यापही त्यातली एखादी इमोजी वापरली कि Error येतेय.
हो ना
हो ना
व्हॉटसपपोस्ट ईथे स्माईली न काढता पोस्ट केली तर एर्रर येते
यामुळे हा प्रॉब्लेमही सुटेल
नुसत्या स्माईल्या
नुसत्या स्माईल्या देण्यापेक्षा , एक दोन शब्दात भावना लिहून दाखवलेली आवडते. उलट म्हणूनच मायबोली मला जास्त आवडते. नकोत स्माईल्या वाढवायला. हेच माबोचं वेगळेपण असुदेत. उदा: कपाळावर हात मारून घेणारी स्मायली नुसती बघण्यापेक्षा 'तुमचा प्रतिसाद वाचून कपाळबडवती योग आला' हे कसं भारदस्त वाटतं.
माबोची Blush बाहुली ही इश्श ऐवजी आरशात बघितल्यावर गालाला हे काय लागलंय बघून कन्फ्युजून तोंडांचा चम्बु झाल्यासारखी वाटते. >> अगदी. मला जेव्हा स्मायली कुठून द्यायची माहीत नव्हती आणि प्रतिसादात कधी पाहिली की थोबाड रंगवलंय अस वाटायचं .
Tik Tok चालू करा आता. किती
Tik Tok चालू करा आता. किती छान दिवस होते.
व्हॉटसपवरच्या इमोजी इथे आहेत
व्हॉटसपवरच्या इमोजी इथे आहेत: https://emojipedia.org/whatsapp/
यातील हव्या त्या इमोजीवर राईट क्लिक करून "Copy image address" करायचे. आणि प्रतिसादात ती इमेज देण्यासाठी
<img src="EMOJI_PATH"/>
हे लिहून EMOJI_PATH ऐवजी आपण वर कॉपी केलेला इमोजी address पेस्ट केला कि झाले :)
(No subject)
---------------------------------------------------------
सुंदर स्मायली!!! धन्यवाद अतुल.
❤️
❤️
✨ ✨ ✨
✔️ ✔️ ✔️
धन्यवाद करेक्टाय एकदम
(No subject)
img src="https://emojipedia.org/cowboy-hat-face/"
माकाचु?
माकाचु? वरची स्ट्रिंग देऊन मागे < आणि पुढे /> ना?
(No subject)
.
@वावे, तुम्ही Copy link
@वावे, तुम्ही Copy link address त्या ऐवजी Copy image address करा. तुमच्या इमोजीसाठी तो हा आहे:
https://emojipedia-us.s3.dualstack.us-west-1.amazonaws.com/thumbs/72/wha...
पण ऋन्मेऽऽष यांनी काहीतरी
पण ऋन्मेऽऽष यांनी काहीतरी वेगळे व इंटरेस्टिंग केले आहे :)
(No subject)
वावे, फोन वरून लॉंग इन असाल
वावे, फोन वरून लॉंग इन असाल अन मोझीला फायरफॉक्स असेल तर Copy image location करा.
क्रोम असेल तर नाही येत करता.
(No subject)
img src=" https://emojipedia.org/lying-face/ "/
ही लिंक आहे. दोन Double Inverted Commas मधे लिंक दिसावी म्हणून मुद्दाम स्पेस ठेवली आहे. आणि Trigular Brackets काढून टाकले आहेत. स्पेस काढल्यावर खालीलप्रमाणे दिसतं.
Edge Browser वापरतो.
ओह.. मोझिला नाहीये.. क्रोमच
ओह.. मोझिला नाहीये.. क्रोमच आहे. नंतर लॅपटॉपवरून करून बघते!
मोबाईलवर माहित नाही कसे करता
मोबाईलवर माहित नाही कसे करता येईल. मी हे क्रोम डेस्कटॉप वरून केलेय.
निरुदा हि लिंक ट्राय करा:
https://emojipedia-us.s3.dualstack.us-west-1.amazonaws.com/thumbs/120/wh...
Pages